शिरूर - शिरूर तालुक्यात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा

भिर्रर्र … झाली… उचल कि टाक सेंकद 11 11 11 असा आवाज बैलगाडा शर्यतबंदीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरती परवानगी मिळाल्याने शिरूर तालुक्यात पुन्हा ऐकावयास मिळणार असल्याने, या बैलगाडा शर्यतींचा धुराळा आता पुन्हा गावोगावाच्या याञांमध्ये उडणार आहे.

या शर्यतींवर नोव्हेंबर 2008 पासून बंदी घालण्यात आल्यानंतर गावोगावाच्या याञांवर विरजण अले होते. या याञाकडे नागरिकांबरोबरच पाहुण्यांनीही मोठया प्रमाणात पाठ फिरविल्याचे चिञ पहावयास मिळत होते. 2008 पासून या शर्यतबंदीवर कोणताही निर्णय होत नसल्याने बैलगाडा मालक व शेतकरी यांच्यात मोठया प्रमाणात नाराजी होती. महाराष्ट्र शासनानेही शेतकरयांची ही बाब लक्षात घेवून न्यायालयात शेतकरयांची बाजू मांडण्याची तयारी दर्शविली होती. या शर्यतींना लवकरात लवकर परवानगी मिळावी म्हणून प्रसिध्द बैलगाडामालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर पाटील यांनी तालुक्यातील बैलगाडांमालकांसमवेत 7 जानेवारी 2013 रोजी शिरूर तहसील कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढला होता. त्यानंतर पाचुंदकर यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यामार्फत या शर्यती सुरू होण्यासाठी मंञालयीन पातळीवर शर्तीचे प्रयत्न केले.

गावोगावाच्या याञेंमधून शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी राज्य विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरती का होईना परवानगी मिळाल्यानंतर शर्यतींना आता सुरूवात होणार असून त्याचा धुराळा आता शिरूर तालुक्यात उडताना दिसणार आहे.

तालुक्यातील रामलिंग, रांजणगाव गणपती, पाबळ, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे व कान्हुर मेसाई या गावच्या याञेमधील बैलगाडा शर्यती या जिल्हयात प्रसिध्द असून, या याञांमध्ये बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार असल्याने तालुक्यातील शर्यतीप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही