सादलगाव - शिरूरच्या पुर्वभागात नदी प्रदुषणांचा गंभीर प्रश्न

शिरूर पुर्व भागातून भिमा-मुळा-मुठा अशी तीन नद्यांच्या संगम होऊन तो पुढे उजनी जलाशयाला मिळतो. शिरूर व दौंड तालुक्यातील असंख्य गावांना शंभर टक्के शेती बागाईत होण्यास वरदान ठरलेल्या वरील नद्या सध्या पुर्णपणे प्रदुषणाच्या विळख्यात अडकल्या असून, नदीमध्ये तरंगणाऱया पाणवनस्पतीमुळे हे प्रदुषण होत असल्याचे निर्दषणास येत आहे.

या नद्यांवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले असून, बंधाऱयांमध्ये प्रामुख्याने आक्टोंबर-नोव्हेंबरच्या दरम्यान पाणी अडविले जाते. याच दरम्यान ही पाण्यावर तरंगणारी व अत्यंत लहान असणारी पाणवनस्पती कालांतराने मोठी म्हणजे गोंडयाच्या स्वरुपात होते. काही ठिकाणी या वनस्पतीस नाकधरी, डहाळा, गोंडा नावाने ओळखली जाते. पाणी अडविल्यानंतर हीच वाढ झपाटयाने होऊन साठविलेले पाण्यावर ती आपला अंमल करते. वनस्पतीचे आयुष्य अंदाजे पाच महिन्याचे असून, कालांतराने पाण्यावर तीची सडण्याची प्रक्रिया सुरु होते. सडलेली अशी वनस्पती नदीतील साठविलेले पाणी खराब करण्यास सुरवात करते. पाणी दुर्गंधीयुक्त झाल्यानंतर त्यातील मासे मरण्यासही सुरवात होते. सडलेली वनस्पती हळूहळू तळाला जाते. पुन्हा उचमाळून वर येते. या सर्व प्रक्रिया दरवर्षी साठविलेल्या पाण्यावर होत असते.

पाणी प्रदुषणास अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून या वनस्पतीची नोंद घ्यावी लागेल. दरवर्षी पाणी प्रदुषणामुळे शिरूर पुर्व भागातील शेती व नागरिकांचे आरोग्यांचे प्रश्न निर्माण होत असून, याकडे शासणाने अथवा प्रदुषण महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या जर अशीच राहीली तर सर्व काही संपते की काय? अशी यामधील जाणकारांची प्रतिक्रीया आहे. हे नदी प्रदुषण मानवाच्या आरोग्याला धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणी हे जिवन आहे. पाण्याशिवाय प्राणीजिवनांचे असितत्व राहू शकत नाही. परंतु, पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी नद्यांमधील पाणी प्रदुषणांमुळे मानवाचे जिवनच संकटात आले आहे, असे म्हटंले तरी वावगे ठरु नये अशी स्थिती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. याला कारणही मानवच आहे. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी मानवाच्या मनामध्ये याविशयी मोठी जागृती होणे गरजेचे आहे. नदीप्रदुशणाला कारणीभुत ठरणाऱया या गोंडयामुळे नदीमधील जलचर प्राणीच्या असितत्वही धोक्यात आले आहे. या नदीमध्ये पुर्व आढळत असणाऱया मास्यांच्या असंख्य जाती शोधूनही सापडत नाही. या जाती नामशेश झाल्या आहेत. यामुळे यावरील मासेमारी पुर्णपणे संकटात आली आहे. पाणी खराब झाल्यानंतर ते शेतीसाठीही उपयुक्त राहत नाही. शेतीला वापरले तर शेती नापिक होईल अशी स्थिती या प्रदुशित पाण्यांमुळे होत आहे. पाण्यालाच नव्हे तर मानवी जिवनाला घातक ठरणारी वनस्पती सर्वनाश करेपर्यंत त्यावर विलाज होत की नाही? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

- संपत कारकूड

संबंधित लेख