वाघाळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शोषखड्डयाचा प्रयोग!

प्रत्येक गावातील घराघरात शोषखड्डयांचे प्रयोग झाले तर  जमिनीतील पाण्याची पातळी वाढायला वेळ लागणार नसल्याचे वाघाळे येथील एका शेतकऱयाने दाखवून दिले आहे.

प्रगतिशील शेतकरी रंगनाथ बापु गोरडे यांनी आपल्या राहत्या घरातील सांडपाणी एका पाईपद्वारे एक चौरस मीटरच्या शोषखड्डयात सोडले आहे. या शोषखड्डयाच्या मध्यभागी गोलाकार व मध्यभागी पोकळी राहिल असे बांधकाम केले गेले आहे. स्नानगॄह अथवा स्वयंपाक घरातील पाणी थेट खड्डयात इतरञ न पडता शोषखड्डयाच्या मध्यभागी पडून शोषखड्डयात टाकण्यात आलेल्या वीटा, दगड, वाळू यांच्या थरातून जमिनीत झिरपले जाते. गोरडे यांचे पाच जणांचे कुटुंब असून, या कुटूंबाने वापरलेल्या पाण्यापैकी जवळपास पस्तीस ते चाळीस लीटरहुन अधिक पाणी दररोज या शोषखड्डयात मुरत असल्याचे गोरडे यांनी 'शिरूर तालुका डॉट कॉम'शी बोलताना सांगितले.

एका घराच्या पाणी बचतीमुळे रोज ३५ ते ४० लीटर पाणी जमिनीत पुन्हा सोडले जात असेल तर गावागावातील प्रत्येक कुटूंबाने हा शोषखड्डयाचा प्रयोग यशस्वीरित्या केल्यास नक्कीच पाणी पातळीत वाढ होईल, असा विश्वासही गोरडे यांनी व्यक्त केला.

दगड, वाळू, विटा टाकून या शोषखड्डा पुर्णत: भरून घेतला जातो. त्यानंतर त्यात माती पडून तो बुजुन जाऊ नये म्हणून  कागद अथवा पोती टाकून तो पुर्णतः झाकून घेतला जातो अशी या शोषखड्डयाची रचना असते. शोषखड्यामुळे डासांची संख्याही कमी झाली आहे. वाढत्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जमिनीतील खालावलेली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी गावागावात ग्रामस्थांनी पुढाकार घेवून शोषखड्डयांची निर्मिती करणे गरजेचे आहे, असेही गोरडे यांनी सांगितले.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य