वाघाळे - शिवकालीन भुयारी खोलीचे प्रवेशद्वार!

पुणे जिल्हयातील अनेक ऐतिहासिक स्थळे स्थानिक नागरिकांच्या अडाणीपणामुळे,  दुर्लक्षामुळे  व शासकिय  उदासिनतेमुळे दुर्लक्षित राहिली आहेत. स्थनिक गाव कारभाऱयांनी जर शासनपातळीवर प्रयत्न केला तर जिल्हयातील अनेक गावांमधील दुर्लक्षित इतिहास जनतेसमोर येऊन पर्यटनाच्या माध्यमातून गावांच्या विकासास हातभार लागेल.

वाघाळे (ता. शिरूर) येथील शिवकालीन भुयारे, वाडे जुन्या, तळयाच्या बंधाऱयांच्या बांधकामाचे इतिहास संशोधकांकडून व पुरातत्व विभागाकडून सर्व्हेक्षण व्हावे, अशी मागणी इतिहास प्रेमी तरूण वर्गाकडून करत आहेत. गावामध्ये पांडवकालीन मंदिरे व भुयारे आहेत. जुनी भूयारे ही राजे युद्धाच्यावेळी वापरत असल्याचे वृद्ध जाणकार सांगतात. मात्र, गावातील भूयार किती खोल व किती लांबीचे आहे आहे, याबाबत कोणालाही सांगता येत नाही. भूयाराबाबत अनेकजण विविध प्रकारची माहिती सांगतात. परंतु, खरी माहिती उपलब्ध होत नाही.

या संदर्भात तळेगाव ढमढेरे येथील इतिहासतज्ञ अमित कोळपकर यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी वाडे, बुरूंज व भुयार ही शिवकालीन असल्याची पुष्टी दिली. वाघाळे हे गाव तीर्थक्षेञ रांजणगाव गणपती व पर्यटन स्थळ चिंचेली मोराची या दोन्ही गावांच्या मध्यभागी असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी व पुरातत्व विभागाने या परिसराचे सुशोभिकरण केल्यास पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सुशोभिकरण केल्यास पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

- प्रतिनिधी

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य