मांडवगण फराटा - शाळेच्या पहिल्या दिवशी पुज्यनिय कोण ?

दोन दिवसांपुर्वी एका वर्तमानपत्रात बातमी वाचयला मिळाली. 15 जुनला नवीन शैक्षणिक वर्षे चालू होणार. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्येची देवता मानणाऱया सरस्वती पुजनाने सुरु होणार. हे वृत्त वाचून मनात चलबिचल झाली आणि प्रश्न पडला. पुरोगामी महाराष्ट्राचे काय? सरस्वती पुजनाने शाळेचा पहिला दिवस जाणार ! व दुसऱया दिवसांपासून मुले शिकणार. ग--गणपतीचा--स--सरस्वतीचा. पण ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपले सर्व आयुश्य स्त्री शिक्षणांसाठी आणि दिन-दलितांसाठी आयुष्य खर्च केले, त्या सावित्रीबाई फुलेंचा विसर या लोकांना पडतोच कसा. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनाही प्रश्न पडतो की, नक्की आमच्यासाठी पुज्यनिय आणि वंदनिय कोण?

राज्य सरकारने विद्यार्थ्यांना अगोदरच इयत्ता आठवीपर्यंत नापास न करण्याचे आदेश दिले आहेत. पुढे मुलांच्या मनावर कोणते संस्कार होणार? हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांकडून सरकारला एवढीच विनंती आहे की, त्यांनी अद्यादेश काढावा की, शाळेचा पहिला दिवस सरस्वती पुजनाने नव्हे तर, सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पुजन करुनच झाले पाहिजे. काय महाराष्ट्र सरकार ही विनंती मान्य करेल काय? ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्या अंगावर शेणाचे गोळे, दगड, चिखल असे अनेक अन्याय मनुवाधांकडून सहन केले. अशी सावित्री या देशातच काय जगातही शोधून दाखवावी. आपले भाग्य की, सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रात जन्माला आल्या. तुम्हाला जर सरस्वती पुजनाने शाळेची सुरवात करावयाची असेल तर सरकारला माझी आणखी एक विनंती आहे, की सरकारने असाही अद्यादेश काढावा, की सावित्रीबाई फुले यांच्या नावे मिळणारी शिष्यवृत्ती बंद करुन सरस्वतीच्या नावाने दयावी. सावित्रीबाईंवर चालविणारे सर्व उपक्रम बंद करावेत.

माझ्यासारख्या विद्यार्थ्याला इतके उपरोधक लिहावे लागते आहे, कारण हे नाही हो सहन होत.... आमच्या सावित्रीबाईंची ही कुचंबना आणि हा अपमान. सावित्रीबाई हयात असतानाही त्यांना नागरिकांना त्रास दिला. आणि आत्ताही तेच. नाही सहन होत.... आज पुणे विद्यापिठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्याची मागणी होत असताना चालढकल का होते? विचारवंतानी याचा जरुर विचार करावा...

- सागर प्रल्हाद शेलार, (द्वितीय वर्षे बी.बी.ए.)

श्री वसंतराव फराटे-पाटील महाविद्यालय, मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे.

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य