गणेगाव खा. - कचरा डेपो म्हणजे शेतकयांच्या गळयात फास...

णेगाव खालसा येथील कचरा डेपोवरून तालूक्याच्या विविध राजकिय पक्ष व संघटनांमध्ये बरीच खलबते व चर्चा झाली. माञ, मुळातच गणेगाव खालसा व परिसरात कचरा डेपो आणणे म्हणजे येथील शेतकयांच्या व ग्रामस्थांच्या गळयात फास लटकवण्यासारखेच आहे.

गणेगाव खालसा, बुरूंजवाडी, वाघाळे, पिंपरी दुमाला, वरूडे, खंडाळे, कोंढापुरी ही गावे चासकमान कालव्याच्या लाभक्षेञात येत असून या गावांमधील अनेक शेतकऱयांनी लाखो रूपये खर्च करून वाघाळे व गणेगावच्या हद्दीत विहिरींसाठी जमिनी विकत घेऊन आपापल्या शेतांमध्ये पार्इप लाइन केल्या आहेत. गेली अनेक वर्ष आपल्या स्वत:च्या अस्तित्वासाठी व आपला चरितार्थ चालवण्यासाठी ही झगडणारा या परिसरातील बळीराजा चासकमानच्या पाण्यामुळे आज स्वाभिमानाचे जीवन जगत आहे. गणेगाव पासून पुर्वेस अवघ्या दोन ते तीन किलो मीटर अंतरावर कोंढापुरी येथे मल्हारतळे असून या तळयाच्या पाण्यावर हजारो एकर क्षेञ ओलिताखाली आले आहे. शेतकऱयांनी या चासकमान प्रकल्पाच्या पाण्याच्या जोरावर दुष्काळी व पिण्याच्या पाण्याला ही महाग असलेला हा परिसर फळबागा, ऊस, नगदी पिके, आदी द्वारे हिरवागार करून सोडला आहे. या परिसरातील तरूण पिढी ही मोठया प्रमाणात शेतीकडे वळली आहे. माञ, गणेगाव खालसा येथील कथित कचरा डेपो प्रकरणामुळे या परिसरातील शेतकरी वर्गाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कचरा डेपो या ठिकाणी झालाच तर आपण मोठया कष्टाने पिकवलेली शेती क्षणात नापिक होईल. चासकमानच वाहत पाणी गणेगाव, वाघाळे व वरूडे गावाच्या शिवारात प्रदुषित होईल. मोठया प्रमाणात रोगराई वाढेल व आपल जगण दुषित होईल अशी भिती या परिसरातील शेतकरी बांधवाच्या मनात निर्माण झाली आहे.

रांजणगाव महागणपती जवळच असलेल्या या परिसराला एक ऐतिहासिक, नैसगिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. गणेगाव येथे जागॄत अशा भवानी, मातेच्या मंदिराबरोबरच रांजणगाव येथील महागणपतीची बहिण ओझराई मातेचे ही या गावात मंदिर आहे. या मंदिराकडे येण्यासाठी नुकतेच पालखीमार्गाचे काम करण्यात आले आहे. त्याच बरोबर शाहु महाराजांच्या वंशजांच गाव म्हणूनही या गावाची आगळी वेगळी ओळख आहे. या परिसरात पक्षाचा राजा मोराच रांजणगाव गणपती, गणेगाव, वरूडे, वाघाळे, पिंपरी दुमाला, खंडाळे चिंचोली मोराची या गावांमध्ये मोठया प्रमाणात वास्तव्य आहे.

कचरा डेपो या ठिकाणी आल्यास या कचयाच्या प्रदुषणामुळे रोज पर्यावरणाचे किती नुकसान होईल याची मोजदाद ही करता यायची नाही. त्यामुळे हा गणेगावचा कथित कचरा डेपो या ठिकाणी न आणणे हिताचे ठरेल. तरच या परिसरातील सेतकरी ही टिकेल.

- प्रतिनिधी

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही