शिक्रापूर - शिक्रापूर-मलठण रस्त्याची अक्षरशः चाळण

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे दुरूस्तीचे काम अतिशय निकॄष्ठ दर्जाचे झालेले काम अतिशय चांगले झाले असल्याच्या वल्गना अधिकारी व ठेकेदार करत होते. माञ, पावसामुळे ठेकेदाराचे व अधिकारी वर्गाचे पितळ उघडे पडले असून या रस्त्यावर अक्षरश: खड्डयांची चाळण झाली आहे. साइडपट्टयावर गाळ साचल्याने वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे केवळ काही महिन्यांपुर्वीच रस्ता दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते. त्या वेळी हे काम निकॄष्ठ होत असल्याचे स्थानिक नागरिक व प्रवाशी अधिकारी व ठेकेदारांना समजावून सांगत होते. माञ, अधिकारी काम चांगले असल्याचेच बोलत होते. साइडपट्टयावर मुरूम टाकण्याऐवजी ठेकेदाराने माती टाकल्याने आज या साइड पट्टयांवर गाळच साचला असून प्रवाशांना विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरूनच वाहने चालवावी लागतात.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची पुन्हा दुरूस्ती करावी अशी मागणी प्रवाशी करत आहे.

- प्रतिनिधी

संबंधित लेख

  • 1