गोलेगाव - कुत्री पाजते मांजरीच्या पिलाला स्वतःच दुध!

मांजराच्या जवळ चुकुनही जर कुत्रं गेल तर मांजर वसकन कुञ्याच्या अंगावर धावते. परंतु गोलेगाव (ता.शिरूर) येथे मात्र मांजरीच्या पिल्लाला कुत्री स्वतःच दुध पाजताना पाहून 'ऐसी कळवळयासी जाती करी लाभाविण प्रिती' या संतवचनाचा प्रत्यय येतो.

गोलेगाव येथील शुभम भेळचे मालक कैलास इसवे यांच्याकडे प्रिन्स नावाचा मांजर जातीचा बोका आहे. शेजारीच बिसमिल्ला चिकन सेंटरचे मालक अलिमहमद शेख यांच्याकडे स्वीटी नावाची कुत्री आहे. बोका लहान असल्याने गेल्या अनेक दिवसापासुन तो स्वतःची आई समजून या कुत्रीचे दुध पित आहे. कुत्रीही त्याला प्रोमाने जवळ घेत असल्याने सर्वत्र कुतुहल व्यक्त होत आहे.

- तेजस फडके

संबंधित लेख


वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य