शिरूर - नेता होणं कायं सोपं हायं?

ला वाटयचं खासदार-आमदार व्हायला काय लोकांच्या पुढं पुढं करायचं. घरोघरी जाऊन हात जोडायचे. सभा घेऊन आश्वासणे दयायची पण अता लोकसभेच्या निवडनूकीची चाहुल लागली आणि पेपर, टीव्ही चॅनलवर मान्यवरांच्या चर्चा सुरू झाल्या. विविध पक्षांचे प्रतिनिधी विश्लेषन करताना दिसत आहे.

1947 साली देश स्वंतत्र झाला व 26 जाने1950 रोजी खऱया आर्थाने देशात लोकशाही नांदू लागली. पहिली सार्वत्रिक निवडणुक झाली व 1956 नंतर भारतीय राज्य घटनेनुसार काम सुरू झाले. त्या वेळी खासदार झालेल्या नेत्यांचा खर्च माझ्यामते नाममात्र ही असेल. आजचा खर्च पाहीला तर चक्कर आल्या शिवाय राहनार नाही. पुर्वी पासून दूरदॄष्टी असलेल्या लोकांचा भारत हा देश आहे. माहीती तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की सॅटेलाईटच्या माध्यमातून पुर्ण देशाचा नकाशा फक्त स्क्रिन टच करून पाहता येतो. प्रत्येक प्रगल्भ नेता त्याच्या मतदार संघातील प्रात्येक व्यक्तिचा आर्थिक विकास न पाहता प्रात्येक गाव, वाडी, वस्ती मधील घरातील प्रात्येकाची कुडंली जवळ बाळगनारा आहे. भारतातील नेत्यांकडे आपल्या मतदार संघाच्या विकासाचे नियोजन तयार आहे. त्याचे कारण एकच निवडणुकी अगोदर आमचे नेते मतदारसंघाचा तेथील नागरिकांचा संपर्क वाढवतात.

ग्रामपंचायत सदस्यापर्यत सर्वांचा समावेश करून समस्यांचा व त्यांनी कलेल्या व करावयाच्या कामाचा तपशिल लोकशाहीच्या नियमानुसार जनतेसमोर मांडला पाहिजे. कामाचा हिशेब मांडला तर जनता खरी मालक आहे हे लक्षात येईल. देशाच्या लोकशाही नियमानुसार प्रतिनिधीला त्याचा सर्वैच्च अधिकाराचा म्हणजे मतदानाचा वापर करून योग्य निर्णय घेतल्याशिवाय राहत नाही.

मित्रांनो, या लेखातून एकच सुचवायचे आहे .डोळे उघडून तुमच्या परीसराचे निरीक्षण करा व विचार करा. तुमच्या नेत्यांनी तुमचा गाव‚ वाडी वस्तीवर गेल्या पाच वर्षात काय सुधारना केल्या आहेत. सुधारणा केल्या नसतील तर त्यांची जागा त्यांना दाखवून द्या. किती दिवस वाट पाहायची चांगल्या सुविधांची. जर गाव‚ वाडी‚ वस्ती मुख्य प्रावाहात आणायचे असतील तर रस्ते मुख्य रस्तांना डांबरीकरण नव्हेतर कॉंक्रीटीकरणाने जोडले पाहीजे. पाणी‚ शौचालये‚ या सूविधा शिवाय कुठलीही व्यवस्था पुर्ण होत नाही. याशिवाय अर्थ व्यवस्था चांगली राहण्यासाठी उद्योग व व्यवसायांना ग्रामिण भागात चालणा देऊन गाव तिथे उद्योग संकल्पना आमलात आणने गरजेचे असते. गाव तिथं बॅंक, पतसंस्था असणे तितकेच महात्वाचे आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे शेती मालाला योग्य बाजारपेठ निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

नेते गावात‚ वाडी-वस्तीवर येत नसतील तर आशा नेत्यांना तूम्ही निवडून देणार का?  मोबाईला कॅमेरा‚ इंटरनेट‚ फेसबुक सुविधा आहे तर समस्यांचे शूटींग करा व मांडा समाजासमोर. नेत्यांचा नाकर्तेपणा दया पाठवून मिडीयाला. लेख वाचल्यानंतर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच इरतांना पाठवा.

- सत्यजित संपतराव जाधव, शिरूर.
9890016919

संबंधित लेख


वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य