दहिवडी - शिरूर एसटी सुरू करण्याची मागणी

शिरूर तालुक्‍याच्या दहिवडी, सातकर वाडी, पारोडी, भांबर्डे, गायकवाड वाडी, कळवंतवाडी मदारी मार्गे आंबळे किंवा करडे मार्गे शिरूर अशी एसटी बस सेवा सुरू करावी. या भागातून शिरूर कडे जाणारा रस्ता चांगला झाला असून, या मार्गावरून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे.

शिरूर तालुक्‍यातील दहिवडी, सातकरवाडी, पारोडी, भांबर्डे, गायकवाडवाडी, कळवंतवाडी मदारी म्हाळुंगी तसेच दौंड मधील शिरूर ला जाणाऱ्या प्रवाशांना शिरूर जाण्यासाठी असणारा एकमेव व सोईस्कर असणारा हा मार्ग आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर सध्या एकही एसटी सुरू नाही. यामुळे या मार्गावर नव्याने शटल एसटी सेवा सुरू केल्यास प्रवाशांची सोय होणार असून, अंतर, वेळ व पैशांचीही बचत होऊ शकेल. राज्य परिवहन महामंडळाने या भागातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन एसटी सेवा सुरू करण्याची मागणी वरील गावांचे सरपंच व प्रवाशांनी केली आहे.

या भागातील प्रवाशांना शिरूरला जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोईस्कर आहे. प्रवाशांची या मार्गावर एसटी बस सुरू करण्याच्या मागणीचा निश्‍चितपणे पाठपुरावा करून, या मार्गावर लवकरात-लवकर एसटी सेवा सुरू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे. आमदारांची मदत घेऊन प्रवासी वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे दहिवडी ग्रामपंचायत सदस्य संतोष दौंडकर यांनी सांगितले.

- संतोष दौंडकर, 9850265000

संबंधित लेख

  • 1