रांजणगाव गणपती - मनपा सुरु असणारी पीएमटी सेवा बंद का?

रांजणगाव गणपती हे अष्टविनायकापैकी एक. पुण्यापासून अवघ्या ५० किलोमीटर वर असणारे हे गाव. परंतु, अजूनही या गावातील लोक या विद्यानगरीसाठी जाण्यायेण्यासाठी सुख सुविधांनी वंचित आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी गर्दीने आधीच भरलेली आणि त्यामुळे एकही प्रवाशांना न घेता पुढे जाते. एसटी हेच दुर्भाग्य आजून गावाच्या नशिबी येतंय. एखादे तरी वाहन मिळेल या आशेने तासंतास रस्त्यावर ताटकळत थांबणारे विद्यार्थी, कामगार नोकर-चाकर हे असे चित्र २०१३ मधेही रोजच पाहायला मिळतंय.

पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या गावातील विद्यार्थी, नोकर-चाकर प्रवाशांची गैरसोय. पुण्यात राहणे परवडत नाही म्हणून उच्च शिक्षण आणि पुण्यातली नोकरी नाकारणारे हतबल नागरिक आजही पाहायला मिळतात. खरतर, रांजणगाव प्रमाणेच शिरूर पर्यंतच्या मधल्या लहान-सहान गावांचीही स्थिती काही वेगळी नाही.

पुणे महानगर पालिकेने शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरे पर्यंत PMT बस सुविधा सुरु केलेली आहे. पण येथपर्यंत पोहचायचे साधन म्हणजे परत खाजगी वाहन. ज्यांची मर्यादा दिवसाच्या वेळेवरच अवलंबून असते. संध्याकाळी ठरविक वेळेनंतर नंतर हे लोक आपला दिवसभराचा रोजीरोटी घेऊन घरी परततात. सन २००० पूर्वी रांजणगाव ते मनपा सुरु असणारी PMT सेवा बंद का करण्यात आली याला कुणाकडेच उत्तर नाही.

खरं म्हणजे प्रगतीशील गाव म्हणजे एका ठरावीक परिघात राहून वाढणाऱ्या सिमेंटच्या भिंती आणि जमिनीच्या आणि चारचाकी वाहने यांची होणारी प्रचंड उलाढाल... ही जर प्रगतीची व्याख्या असेल तर २१व्या शतकातही भविष्याला लागलेली यापेक्षा मोठी घरघर दुसरी कोणतीच नाही. आजच्या जगात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आणि दळणवळण ही जरी प्रगतीची द्योतक असली तरी त्याकडे मात्र कुणीही गांभीर्याने पाहताना दिसत नाही. हेच आजच्या नागरिकाचे आणि पर्यायाने मतदाराचे दुर्दैव...!

- अशोक खेडकर

संबंधित लेख

  • 1

वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य