शिरूर - शिरूर तालुक्यातील महिला, मुली असुरक्षितच?

शिरूर तालुक्यातील महिला व अल्पवयीन मुली या असुरक्षितच असल्याचे पुन्हा एकदा निमगाव म्हाळुंगी येथील चिमुकलीवरील बलात्कारच्या घटनेने समोर आले आहे. तालुक्यातील या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पोलीसपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीत विनयभंग व बलात्काराच्या पाच विदारक घटना घडल्याने संपुर्ण तालुकाच हादरून गेला आहे. या पाशवी घटनांमध्ये सहभागी असणारया नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्वच थरांतून होत आहे.

जातेगाव खुर्द येथे 30 ऑगस्ट रोजी विठ्ठल क्षीरसागर याने एका विवाहीत महिलेला तुझ्या पतीचे दुसरीकडे अनैतिक संबंध असून, तू माझ्याबरोबर संबंध ठेव म्हणत त्या महिलेचा विनयभंग केल्याने त्या  परिसरात एकच खळबळ उडाली. 6 सप्टेंबरला पाबळ येथे एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याचे बहाण्याने येथील एका 51 वर्षीय नराधमानेच तिच्यावर बलात्कार केल्याने पाबळ परिसरात सर्वञ महिलांच्या मनात अक्षरश: भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुसरयाच दिवशी दि.7 सप्टेंबरला सणसवाडी येथे पुणे-नगर महामार्गावर अवैधपणे प्रवासी वाहतुक करणारया दोन तरूणांनी एका अल्पवयीन मुलीवर निर्दयपणे बलात्कार केला. या घटनेमुळे पुणे-नगर रस्त्यावर राञी तर सोडाच पण दिवसा शालेय मुली व महिलांना प्रवास करणे असुरक्षितेचे वाटू लागले आहे.

11 सप्टेंबर रोजीच्या पहाटे धानोरे येथे एका अज्ञात नराधमाने अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून उचलून नेऊन एका शेतात तिच्यावर पाशवी बलात्कार केला. या घटनेवरून आरोपींची किती निर्दयता आहे हे दिसून येते. या घटनेमुळे तालुक्यात अक्षरशः सर्वञ भितीचे वातावरण आहे. या घटनेतील आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत तोच 13 सप्टेंबरला तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे भर दुपारी 3 वाजता येथील श्री म्हसोबा शिक्षण संस्थेचे संचालक गुलाब धोञे या 69 वर्षीय नराधमाने एका 5 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर स्वत:च्या घरात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याने तालुक्यात तर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने तर पुर्ण तालुकाच भयभीत झाला असून, तालुक्यात जर दिवसाढवळया असे प्रकार होत असतील, ते रोखुन अशा घटनेतील सहभागी नराधमांना कठोर व जास्तीची शिक्षा होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शिक्षणासारख्या पविञ क्षेञातील काही नराधमांकडुन असे प्रकार होत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यायचा हा खरा प्रश्नच आहे. अशा वाढत्या घटनांमुळे कुणावर विश्वास ठेवायचा कि नाही हाही प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढत्या घटनां कशा रोखायच्या याचे मोठे आव्हान स्थानिक पोलीसांपुढे आहे. तालुक्यातील या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे तालुक्यातील जनताच पुर्णपणे चक्रावून गेली आहे. यामुळे पोलीसांपुढे महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षितेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.                

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1