शिरूर - शिरूर लोकसभा वार्तापञ

गामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केली असली तरी, अद्यापही या पक्षाकडून उमेदवार जाहिर न झाल्याने कार्यकर्तांमध्ये उमेदवाराबाबत उत्सुकता आहे.

या मतदारसंघात मागील दोन वेळेला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेकडुन निवडून आल्याने पक्षाने गेल्या काही महिन्यांपुर्वीच त्यांना तिसरयांदा उमेदवारी जाहिर केली असुन, ते त्यादॄष्टीने तयारीलादेखील लागले आहेत.  मध्यंतरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंञी अजित पवार यांनी या मतदारसंघात यंदा माञ भाकरी फिरविण्याच्यादॄष्टीने जोरदार तयारी करण्याच्या सुचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मतदारसंघातील कार्यकर्तांना दिल्या असल्याने, तशा प्रकारची राष्ट्रवादीकडून पुर्णपणे तयारी झाली असली तरी माञ, डिसेंबर महिना उजाडला तरी अद्यापही उमेदवार जाहिर न झाल्याने मतदारसंघातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत दिसुन येत आहेत. शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा केव्हाच झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माञ अनेकांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, भोसरीचे विलास लांडे, जुन्नरचे वल्लभ बेनके, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा बँकेचे संचालक निवॄत्तीअण्णा गवारे व शिरूर बाजार समितीचे सभापती मंगलदास बांदल आदींच्या नावांची मतदारसंघातील कार्यकर्तांमध्ये जोरदार चर्चा असली तरी आमदार लांडे, मोहिते, गावडे, निकम व बांदल यांच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.

या मतदारसंघातील ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते पाटील, वल्लभ बेनके यांना चाचपण्याचा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाऊ शकतो. किंवा पुन्हा एकदा भोसरीचे आमदार विलास लांडे यांनाच येथील मैदानात उतरविले जाण्याची दाट शक्यता आहे. स्वत: लांडे हे आपल्या 2009 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयार आहेत. आपल्याला पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्यास ही जागा आपण नक्कीच निवडून दाखवू, असेही लांडे यांनी गेल्या आठवडयात सांगितले आहे. पुन्हा लांडे विरूध्द आढळराव या दोन्ही लांडेवाडीकरांमध्येच ही लढत होणार असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. मागील निवडणुकीत आढळराव यांना 4 लाख 82 हजार 563 तर लांडे यांना 3 लाख 3 हजार 952 एवढे मतदान होवुन त्यात आढळराव यांनी लांडे यांचा जवळपास पावणेदोन लाख मतांनी केले होते. हा पराभव लांडे यांच्या मनात रूचत असल्याने ते मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा निवडणुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आढळरावांनी दोन्ही निवडणुकीत खेड तालुक्यातच मतदानांची आघाडी घेतल्याने त्यांना येथुन होणारे मतदान रोखण्यासाठी व ही जागा खेचण्यासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्या नावाचादेखील राष्ट्रवादीकडून कोणत्याही क्षणी विचार केला जावु शकतो. भीमाशंकर साखर कारखान्याच्या माध्यमातून तळागळातील शेतकरी कुटुंबाशी असलेला थेट संपर्क,  मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेशी असणारा दांडगा जनसंपर्क, स्वच्छ प्रतिमा व एक नवी कोरी पाटी यामुळे भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनादेखील उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. निकम यांना उमेदवारी दिल्यास भीमाशंकर कारखान्याच्या दोन आजी माजी अध्यक्षांमध्ये रंगतदार लढत होणार असल्याची चर्चा आहे. मतदारसंघातील सहाही तालुक्यात दांडगा संपर्क, सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क व आमदारकिच्या दहा वर्षाच्या काळात शिरूर तालुक्यात झालेली कोटयावधी रूपयांची विविध विकासकामे यामुळे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनादेखील उमेदवारी देण्याबाबत पक्षाकडून विचार सुरू आहे.

या मतदारसंघातील हडपसर वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतानादेखील लोकसभेला शिवसेनेचा खासदार निवडून येत असल्याने, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. यावेळेस कोणत्याही परिस्थितीत आपला खासदार झाला पाहिजे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी उमेदवाराची पक्षातील एकनिष्ठता, आजपर्यंतची राजकिय व सामाजिक वाटचाल, सर्वसामन्य जनतेशी असलेला थेट संपर्क व आर्थिक परिस्थिती आदी महत्वपुर्ण निकष विचारात घेवून उमेदवारांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदारपणे तयारी केलेली असली तरी, माञ राष्ट्रवादीचा उमेदवार जाहिर झाल्यावरच निवडणुकीचे खरे चिञ स्पष्ट होईल.

पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य