मलठण - कोणतेही पद नसलेले वीर हनुमान मंडळ!

लठणमधील सुमारे 200 युवकांनी सामाजिक बांधिलकीचा विचार करीत 5 वर्षांपूर्वी एकत्रित येत गावात वीर हनुमान मंडळाची स्थापना केली. मंडळाचे विशेष विशिष्ट म्हणजे मंडळात कुणालाही कुठलीही पदे नाहीत. सर्व सदस्य एकाच विचारसरणीचे असल्याने गावात केवळ लोककल्याणकारी, सामाजिक, धार्मिक व विधायक कामे निःस्वार्थी पणे आजपर्यंत हे मंडळ करीत आले आहे. येथील युवकांच्या या धाडसी प्रयत्नांना साथ मिळालीय ती गावातील ग्रामस्थांची व मंडळाच्या निःस्वार्थी व विधायक काम करण्याच्या मंडळाच्या कामास आर्थिक योगदान देणा-या थोर देणगीदात्यांची.

सन 2009 साली सामाजिक बांधिलकीचा वसा हाती घेत गावात वीर हनुमान मंडळाची स्थापना केली. विधायक उपक्रम राबविण्यास सुरवात केलेल्या या मंडळाने सन 2009 ते 2013 पर्यंत मिळालेल्या लोकवर्गणीतून गावातील पुरातन वीर हनुमान मंदिराचा सुमारे 23 लाख रुपये खर्चून जिर्णोदार केला आहे. मलठणच्या मुख्य बाजार पेठेत प्रवेश करताच जीर्णोद्धार करण्यात आलेले वीर हनुमान मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. कुठल्या ही प्रकारच्या देणगीची सक्ती न करता ग्रामस्थ व इतरांकडून मिळालेल्या आर्थिक योगदानातून या मंडळाने वीर हनुमान मित्र मंडळ, गावातील युवक व तरुणांना आरोग्य मय जीवन जगता यावे व्यायाम शाळेसाठी 97 हजार रुपयांची आधुनिक व्यायामाची साधने उपलब्द्ध करून दिली आहेत.

मंडळातील 30 सदस्यांचे ढोल ताशा पथक तयार केले आहे. गावातील तरुण, युवकांना गाव व परिसरातच रोजगार उपलब्द्ध व्हावा या हेतूने वीर हनुमान स्वयं.सुशिक्षित बेरोजगार संस्था ही स्थापन केली आहे. गावातील विविध कारागीर तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्याचा प्रयत्न ही मंडळाने केला आहे. यंदा नव्यानेच परिसरातील महत्त्वाच्या माहिती सह 1100 सुबक दिनदर्शिका तयार करून त्या ग्रामस्थांना विनामूल्य देण्याचे काम मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. लवकरच येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे म्हणून उच्च प्रतीची आर ओ सिस्टिम वीर हनुमान मंडळाच्या वतीने बसविण्यात येणार असल्याचे ही सदस्यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा हव्यास न धरता किंवा आर्थिक लाभाची अपेक्षा न करता या वीर हनुमान मंडळातील 200 तरुणांनी सुरू केलेला हा सामाजिक बांधिलकीतून विधायक कार्य करण्याचा उपक्रम जिल्ह्यातील इतर तरुणांना निश्‍चितपणे स्फूर्तिदायक व प्रेरणादायी आहे. मलठण गावातील सर्व स्तरातील समविचारी युवक व तरुणांनी एकत्रित येत सुरू केलेल्या समाज उपयोगी उपक्रमास गावचे सरपंच व प्राचार्य आर.आर.पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

- सुभाष शेटे

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही