शिरूर - नामदेव ढसाळ यांस काव्यांजली...

‘प्रोजेक्ट’ केलेल्या ढाण्या वाघासारखा तू
कदापि नव्हतास.
चपळाईने नरडीचा घोटा घेणारा
आद्य ‘पँथर’होतास तू
जन्मजात विषमत पोसणा­या
सांस्कॄतीला तू ‘आंधाळयाशतकाची’,रात्र म्हटलेस.

तुझे ‘चित्ते’
चवताळून झेप घ्यायचे इथल्या
रानवट डोक्याच्या मनुष्यरूपी धडांवर म्हणून,
दचकून असायचा सारप्रतिगामी ‘गावं’.
तुझ शब्द भांडार मोठच वैभवी
कुणी म्हटंल
‘मराठीचा दुसरा ज्ञानेश्वर’
जगातल्या सा­या ‘भाषामाऊलींनी’
व्यक्त केलं तुला जगभर
म्हणून तुझ दु:ख समजतं
सातासमुद्र पल्लाड.

‘होय, मी कम्युनिस्ट आहे’ असू सुध्दा म्हणायच धाडस केल होतस तू
पांगुळगाडयावर मी तुला ‘बालगंधर्वात’पाहिले तेव्हा
‘लोकशाही’ नावाची तुझी ‘गाढवी’ आणि तुझी ती
‘महाकायभगोष्ट’ची संस्कॄती
आणखीन बळकट झाली हे आठवलं
भावनांचा आज कल्लोळ उडाला आहे.

तुझ्या प्रतिभेचा वारा या आसमंतात
सदैवत रंगणार आहे.

- डॉ. नितीन पवार, शिरूर.

संबंधित लेख