शिरूर - ‘मतदारसंघ कुणाची जहागिरी नसते’

नेहमीच दिसते की तालुक्याचे नेते, पहिल्या, दुसऱया क्रमाचे नेते मतदार संघाला ग्रहित धरत असतात. मतदारसंघ म्हणजे आपली जहागिरी समजतात. त्यांचे चमचेही त्याच थाटाने वागत असतात आपण जनतेचे सेवक, नोकर आहोत असे न समजता लोकच आपली चालती-बोलती मालमत्ता आहे असे, समजतात. शिरूर काही यास अपवाद नाही.

लोकही याला जबाबदार असतात. आमुक एक नेता म्हणजे तो आयुष्यभर आपला नेता आहे, असे मानतात. लोकशाहीत असे चालत नाही. वेगवेगळया लोकांना संधी देवून त्यांच्याकडून कामे करून द्यायची असतात. पहिल्याला निवडले की दुसऱयाला, नंतर परत दुसऱयाला निवडून दिले की परत पहिल्याला निवडून देतात. ‘साप’ झाला की ‘नाग’ आणि ‘नाग’ झाला की ‘साप’. दोन्हीही चावणारच असतात. पण जात, नाते संबध, धर्म, क्षेत्र, पैसा, दादागिरी अशा गोष्टींवर लोक मतदानाचा निर्णय ठरवतात. इथं लोकशाहीचा विचार रूजणे गरजेचे आहे. मतदान करणे म्हणजे मुर्खपणा शिवाय दुसरे काही नाही, त्याचे दुरगामी दुष्परिणाम होणार. मी सांगतो 1 ते 10 क्रमांच्या उमेद्वारांमध्ये खाली क्रमांकावर जरूर एखादा योग्य लायक उमेदवार असतो पण सांगितलेल्या गोष्टी त्याच्याकडे नसतात म्हणून लोक त्याची टिंगल उडवतात, कारण त्याचे उभे राहणे हाच लोकांना विनोद वाटतो.

'ते कुणाचंही काम नाही त्याला पैसाच लागतो' असा ठाम समज लोक करून घेतात. ही जी नवीन आर्थिक धोरणांनतर जी मूल्ये समाजात, रूजू पहात आहोत. ती पुढे जावून घातक ठरणार आहे. लोकशाहीचा पायाच त्यातून निळखून पडणार आहे.  नंतर पस्तावून काही उपयोग होणार नाही. गुलामीच समोर येवून उभी राहील.

शिरूर-हवेली मतदारसंघातही अशीच स्थिती आहे. सर्व उमेदवारांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक चारिञ्य कायआहे, यांचे विश्लेषण करून मतदारांनी आपले प्रतिनिधी निवडुन द्यावेत. येत्या काळात आपली कसोटी असणार आहे.

- श्री. माणिक भडंगे, शिरूर.
(शब्दांकन-
डॉ. नितीन पवार)

संबंधित लेख

  • 1