शिरूर - डॉ. आंबेडकरांच्या साहीत्य प्रकाशनात दिरंगार्इ

15 मार्च 1976 रोजी महाराष्ट्र सहकारी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर चरीत्र साधने प्रकाशन समितीची स्थापना केली. त्यासाठी ऍड. जे.बी.बनसोडे यांना न्यायालयात केस दाखल करावी लागली या समितीकडून मागील 37 वर्षात 22 खंड व 2 संदर्भग्रंथ प्रकाशीत केले गेले. पंरतु खेदाची बाब ही की सन ­2004 पासुन एकही खंड ही समिती प्रकाशीत करू शकली नाही.

2008 मध्ये बाबासाहेबांच्या पत्रव्यवहारांचा खंड, सन­ 2010 मध्ये बाबासाहेबांच्या छायाचित्रांचा खंड प्रकाशीत केला गेला. त्याचे स्वरूप अल्बम प्रमाणे आहे. या खंडात अनेक चुका आहेत. त्या दुरूस्त करून पुनमुद्रीत करण्याचे आश्वासन दिले गेले.

डॉ. आंबेडकर लिखीत साहित्याला साáया जगात मागणी असते. दरवर्षी नागपुरला धम्मदिक्षा दिनी व 6 डिसेंबर या स्मॄतीदिनी मुंबर्इ येथे लाखोंच्या संख्येने रांगा लावून लोक सरकारी स्टॉलवरून पुस्तके विकत घेत असतात सरकारलाही या प्रकाशनातुन 4 कोटींचा शुद्ध नफा झाला आहे. तरी हे खंड प्रकाशित करण्यामध्ये शासन उदासिन का आहे? या संदर्भात काही विषय प्रकाशित करणे आवश्यक आहे.

तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स (1930 ­ 1932) मधील एकुण 9 समित्यांपैकी 8 समित्यांचे बाबासाहेब सदस्य होते. 1. Member of federal Committee, 2. Member of Provincial committee, 3. Member of Minorities committee, 4. Member of franchiese committee, 5. Member of Defence committee, 6. Member of service committee, 7. Member of General view. या महत्वपूर्ण समित्यांवर बाबासाहेबांनी काम केले होते आणि वेळोवेळी आपले विचार मांडले होते. या विचारांना एकत्रित करून महाराष्ट्र सरकारने आवश्य प्रकाशित केले पाहीजे.

20 जुलै 1942 ते 1946 या चार वर्षात बाबासाहेबांनी श्रम मंत्री म्हणून काम केले. त्याच बरोबर श्रम मंत्रालया सोबतच इतर 11 विभाग, वीज, सिंचन, जल वाहतुक, खनिज, प्रशिक्षण, टेक्निकल ट्रेनिंग, विमान, नोकर भरती आणि पुरातत्व विभाग बाबासाहेबांकडे होते. या काळात बाबासाहेबांनी जे निर्णय घेतले, आदेश दिले आणि जो पत्रव्यवहार वरील कार्यांसंबंधाने केला. त्याचा स्वतंत्र खंड प्रकाशित करणे आवश्यक आहे.

संविधान निर्मितीच्या वेळी बाबासाहेब 1. Constituent assembly, 2. Nation flag committee, 3. Fundamental Right committee, 4. Franchise committee, 5. Constitution committee, 6. Advisory committee, 7. Minorities committee, 8. Ad-Hoc committee of citizens hip, 9. Ad-hop committee of supreme court या समितीच्या कामकाजासंबधी व तेथील बाबासाहेबांच्या कार्यासंबंधी काही खंडामधे निर्मिती होऊ शकते.

गेल्या  37 वर्षांत मुळ इंगजी ग्रंथांचा मराठी अनुवाद इंग्रजी न जाणणाऱया वाचकांना आजपर्यंत सरकार उपलब्ध करू शकलेले नाही. सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाने भारतातील अन्य भाषांत इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित केले आहेत व ते उपलब्ध आहेत. हिंदी मधे 21 खंड, पंजाब मधे 4 खंड, जोडियात 14 खंड , गुजरातीत 20 खंड, मल्ल्याळीत 19 खंड, तमिळमधे 37 खंड, बंगालीत 26 खंड उपलब्ध आहेत.

खेदाची गोष्ट आहे की, बाबासाहेबांच्या इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवाद सरकारकडे उपलब्ध नाहीत. तर बाबासाहेबांच्या मराठी पत्रकारितेची इंग्रजी आवॄती करणे ही आवश्यक आहे. या कार्यात सरकारने दिरंगार्इ करू नये, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. नितीन पवार, 7776010065

संबंधित लेख

  • 1