शिरूर - बैलगाडामालक झाले नाराज...

र्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्याने शिरूर तालुक्यातील बैलगाडामालक नाराज झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हयातील शिरूर, आंबेगाव, हवेली, खेड व जुन्नर या तालुक्यात गावोगावी होणारया याञांच्या हंगामात बैलगाडा शर्यती हया जोरदारपणे होत असल्या तरी, याञेत होणारया या बैलगाडा शर्यती आजही प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. ग्रामीण भागात फार पुर्वीच्या काळापासून या शर्यतींना सुरूवात झाल्याचे सांगितले जात असले तरी शर्यतीतील बैल हा अनेक शेतकरयांसाठी अविभाज्य घटक मानला जात होता. अगदी घरातील सदस्यांप्रमाणे शेतकरी शर्यतींच्या बैलाची काळजी घेत असल्याचे चिञ पहावयास मिळत होते. बैलांसाठी सुसज्ज मांडव केले जात आहेत. काही ठिकाणी तर बैलांसाठी वातानुकुलीत यंञणा उभारल्याचे तर स्वच्छता ठेवल्याचे दिसून येत आहे. अनेक बैलगाडा मालकांनी बैलांच्या देखभालीसाठी स्वतंञ माणसे नेमली जात आहेत .एवढेच नाही तर जनावरांसाठी एक डॉक्टर नेमला असल्याचे चिञ आहे. या शर्यतीतून गाडाशौकिनांचे व गाडामालकांचे जरी मनोरंजन होत असले तरी, शर्यतीत आपलाच गाडा पहिला यावा म्हणून शर्यतीच्या बैलांवर शर्यतींपुर्वी वारेमाप खर्च केला जातो.

बैलगाडामालक एकवेळ कुंटुंबासाठी खर्च करताना मागे पुढे पाहिल, माञ बैलांना तो जाणीवपूर्वक जीव लावत असल्याचे चिञ आहे. या बैलांवर सर्वाधिक खर्च हा खुराकावर केला जात आहे. त्यात या बैलांना खुराक म्हणुन सफरचंद, खजुर, नेल आदींवर खर्च केला जात आहे .केवळ ‘प्रसिध्द बैलगाडामालक’ ही पदवी मिळविण्यासाठी अनेक जण या बैलजोडींवर लाखो रूपये खर्च करतात. याञेत होणारया या शर्यतीत अनेक बैलगाडे भाग घेतात. परंतु, हा गाडे बक्षिसास पाञ ठरल्यास बक्षिसाची रक्कम त्यांना विभागुन द्यावी लागते. त्यामुळे मिळणारे बक्षीस हे तुटपुंजे व बैलांना सांभाळण्याचा खर्च माञ लाखात, अशी परिस्थिती असली तरी हा खेळ केवळ हौस म्हणुनच खेळला जात आहे. बैलगाडयांच्या शर्यतींमुळेच जिल्हयात एका बैलाची किंमत कमीत कमी 40 हजार रूपयांपासुन ते सुमारे 45 लाख रूपयांपर्यत आहे.

दरम्यान, बैलांवर जीवापाड प्रेम करणारे शेतकरी न्यायलयाच्या निकालाने निराशा झाले आहेत. शर्यतीवर बंदी आली असली तरी तालुक्यातील बैलगाडामालकांनी अजून आशा सोडली नसल्याचे दिसत आहे.

बैलगाडा शर्यती म्हणजे घर जाळून कोळश्याचा धंदा...
गा
वोगावी जञा व याञा यांचा हंगाम जोरात सुरू असून, याञेतील बैलगाडा शर्यती आज प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहे. जिल्ह्यात शिरूर, हवेली, आंबेगाव, जुन्नर व खेड या तालुक्यात या शर्यतींना चांगलीच प्रतिष्ठा व प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा हा खेळ म्हणजे ‘घर जाळून कोळश्याचा धंदा’ आहे.


जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये बहुतांश गावात या शर्यती केवळ याञेलाच होतात. तर काही ठिकाणी या शर्यती लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाला होत असल्याचे चिञ अलिकडच्या काळात पहावयास मिळत आहे. या शर्यतीतून गाडाशौकिनांचे व गाडामालकांचे जरी मनोरंजन होत असले तरी, शर्यतीत आपलाच गाडा पहिला यावा म्हणून शर्यतीच्या बैलांवर शर्यतींपुर्वी वारेमाप खर्च केला जातो. या बैलांवर सर्वाधिक खर्च हा खुराकावर केला जात आहे. केवळ ‘प्रसिध्द बैलगाडामालक’ ही पदवी मिळविण्यासाठी अनेक जण या बैलजोडींवर लाखो रूपये खर्च करतात. याञेत होणारया या शर्यतीत अनेक बैलगाडे भाग घेतात. परंतु हा गाडे बक्षिसास पाञ ठरल्यास बक्षिसाची रक्कम त्यांना विभागून द्यावी लागते. त्यामुळे मिळणारे बक्षीस हे तुटपुंजे व बैलांना सांभाळण्याचा खर्च माञ लाखात, अशी परिस्थिती असली तरी हा खेळ केवळ हौस म्हणुनच खेळला जात आहे. कोणत्याही हौसेला मोल नाही याप्रमाणेच यावर कितीही पैसे खर्च होतो याचा साधा हिशेबही कोणत्याही गाडामालकाकडे कधीही सापडुन येत नाही. केवळ बैलगाडयांच्या शर्यतींमुळेच जिल्हयात एका बैलाची किंमत कमीत कमी 40 हजार रूपयांपासुन ते सुमारे 40 आणि 45 लाख रूपयांपर्यत आहे. परंतु बैलगाडयाचा विषय आला कि, सर्वसामान्य शेतकरी लाखोंच्याच गप्पा मारतात. एवढे प्रेम शेतकरयांचे या खेळावर असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हयातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, पाबळ, सणसवाडी, रामलिंग व, कान्हुर मेसार्इ, आंबेगाव तालुक्यातील थापलिंग, थोरांदळे, पारगाव, निरगुडसर, पिंपळगाव खडकी, वडगाव काशिबेंग, चांडोली, हवेलीतील वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, लोणीकंद, तुळापुर, खेड तालुक्यातील निमगाव दावडी, शेलपिंपळगाव, कन्हेरसर, वाफगाव पार्इट, व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी, वडगाव कांदळी, निमगाव सावा, खोडद येथील घाट बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हयात प्रसिध्द आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी बैलं सांभाळणे, गाडा तयार करणे यासाठी आता महागार्इच्या काळात मोठा खर्च असल्याने हा पुर्वीपासूनचा खेळ हा सर्वसामान्यांचा राहिला नसून, तो आता उद्योजक शेतकरयांचा असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. गावोगावच्या याञेत बक्षिसापेक्षा किती बैलगाडे धावले, यावरच बैलगाडा शर्यती भर दिला जात आहे.

घर जाळून कोळश्याचा धंदा...

बैलगाडा शर्यतीत ज्यांचे गाडे सहभागी होतात त्यांची आर्थिक परिस्थती पाहीली असता बहुतांश गाडामालक हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. केवळ प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा हा खेळ म्हणजे ‘घर जाळून कोळश्याचा धंदा ’करण्यासारखे असले तरी जिल्हयातील अनेक जण हा खेळ एक छंद म्हणून व प्रतिष्ठेसाठीच बैलगाडा पळवित असल्याचे चिञ आहे. काहीही असले तरी बैलगाडा हा विषय सर्वसामान्य शेतकरयांच्या जिव्हाळयाचा असल्यानेच या शर्यतींवरील बंदीचा लढा मागील वर्षीच यशस्वी झाला आहे.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही