शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज!

शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीत शिवसेनेचे वाढलेले मताधिक्य व या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा सलग तिसरयांदा झालेला पराभव यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे.

मोटी लाट, केंद्र सरकारबदद्ल नागरिकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी व गटातटाचे राजकारण याचा मोठा फटका येथील राष्ट्रवादीचे उमेदवार तथा भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांना बसला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुमारे 3 लक्ष 1 हजारांचे मताधिक्य मिळवून महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग तिसरयांदा राष्ट्रवादीला धोबीपछाड करित विजयी झाले असले तरी त्यांच्या विजयात मोदी लाटेचा मोठा प्रभाव झालेला दिसून येत आहे. या निवडणुकीत जुन्नर, आंबेगाव तालुके वगळता इतर तालुक्यात आढळराव यांना गेल्यानिवडणुकीपेक्षा मोठे मताधिक्य मिळाले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची देशभर मोठी लाट असूनही आढळराव यांचे माञ स्वत:च्या आंबेगाव तालुक्यातील गेल्या निवडणुकीतील असलेले मताधिक्य कमी करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली असली तरी भोसरी, खेड, हडपसर व शिरूर हवेलीतून मोठे मताधिक्य घेण्यात आढळराव यशस्वी ठरले. मोदी लाटेचा मोठा फटका सत्ताधारयांना बसल्यानेच येथे राष्ट्रवादीला मोठया पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या लोकसभा निवडणूकीत आढळराव येथून सुमारे 1 लक्ष 78 हजार मतांनी विजय मिळविला. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर वगळता पाचही मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार विजयी झाले. त्यानंतर या मतदारसंघातील जवळपास सर्वच सत्ताकेंद्रे राष्ट्रवादीच्या ताब्यात असूनही येथून आपला खासदार व्हावा यासाठी यंदा राष्ट्रवादीकडुन येथील जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली गेली होती. माञ, येथून लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एक नवी कोरी पाटी व स्वच्छ प्रतिमा म्हणून निकम यांना उमेदवारी दिली. ते यावेळेला येथील जागा कोणत्याही परिस्थितीत खेचून आणतील, अशी अटकळ येथे बांधली जात होती. माञ, राष्ट्रवादीचा हा खेळ मोदींच्या लाटेमुळे पुर्णत: निष्पभ्र ठरला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर वगळता अन्य पाच तालुके राष्ट्रवादीचे बालेकिल्ले समजले जातात. परंतु, येथील लोकसभेची जागा माञ शिवसेनेने सलग तिसरयांदा आपल्याकडे ठेवत हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याकडे पाऊल ठेवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्तांनी चंग बांधला होता. निकम यांनीही कमी कालावधीत सहाही तालुक्यात प्रचाराचा मोठी राळ उडवून दिली होती. आढळराव व निकम हे दोघेही आंबेगाव तालुक्यातीलच असल्याने या तालुक्याबरोबरच अन्य मतदारसंघात कोणाला किती मते मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु स्वत:च्या वैयक्तिक करिष्यामाबरोबरच नरेंद्र मोदींच्या लाटेचा आढळराव यांना भोसरी, खेड, शिरूर व हडपसर या तालुक्यात मिळालेल्या मताधिक्यावरून दिसून येत असले तरी याचा मोठा फटका निकम यांना बसल्यानेच त्यांचा पराभव करून आढळराव हे शिरूरमधुन सलग दुसरयांदा तर तिसरयांदा खासदार म्हणुन निवडून गेले. मनसेचे अशोक खांडेभराड यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली असली तरी ते तिसरया क्रमांकावर राहिले. गतवेळेप्रेमाणे या वेळेही विधानसभा निवडणुका अवघ्या पाच महिन्यांवर येवुन ठेपल्याने लोकसभा निवडणुकीत एक कौल देणारया या मतदारसंघातील जनतेने माञ विधानसभेला हडपसर वगळता पाच मतदारसंगात वेगळा निर्णय घेतला होता. त्यामुळे याची पुनरावॄत्ती यावेळेला होणार का याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष असले तरी आंबेगाव तालुक्यात माञ लोकसभेला आढळराव व विधानसभेला दिलीप वळसे पाटील ही गेल्या दोन निवडणुकांत स्थिती राहिली आहे.

दरम्यान, या निवडणुकीतील विजयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्तांचा आत्मविश्वास वाढला असला तरी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला सलग तिसरा पराभव याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्तांवर आहे.

नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता....
या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या उमेदवारीमुळेच केवळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते गटतट व मतभेद विसरून एकञ येवुन एकदिलाने काम करित होते. या परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या पक्षाकडून खेड, भोसरी, हडपसर, जुन्नर, शिरूर हवेली व आंबेगाव या मतदारसंघातील आमदार व प्रमुख इच्छुक उमेदवार यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात महायुतीचे उमेदवार आढळराव यांना मतदानाची आघाडी मिळाली किंवा नाही, याचाही विचार राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना लवकरच प्रकर्षाने करावा लागणार आहे. आढळराव यांचा लोकसभा निवडणुकीत मोदींच्या लाटेच्या प्रभावाने झालेला मोठा विजय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या तालुक्यात आमदारकिसाठी लागू पडतो, या विषयी सर्व नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता लागून आहे.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य