वाघाळे - शिरूर तालुका पोवाडा...

ॐ श्री कॄष्णाय
वंदुनी गणराय वंदुनी शिवराय
ढफावर थाप तुणतुण्याचा
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
कवी शंभु गातो शिरूरच गुणगाण जी... जी... जी...
प्रथम वंदन त्या महागणपतीला
त्या सुखकर्ताला , विघ्नहर्ताला जी... जी... जी...
दुसरे वंदन त्या रामलिंगाला
त्या शिवशंभुला , मल्लिकार्जुनाला
ज्यानं पावन केलं या धरणीला जी... जी... जी...
विश्वकर्मा देव किमयागार
घातला तालुक्‍याला तीन नद्यांचा हार
इंद्रायणी भिमा भामा ही नद्यांची नाव जी... जी... जी...
केंदूर गावच्या कान्होबाला
संग ज्ञानेशांचा झाला
ज्ञानियाच्या पावलानं तालुका पावन झाला जी... जी...जी...
इतिहास घडला येथे नेताजी पालकरांचा
तांदळी गावच्या प्रतिशिवाजीचा
वढू गावी समाधिस्थ झाला
त्या धर्मवीर शंभु, पुञ शिवाजीचा जी... जी... जी...
इतिहास घडला येथे मलठणच्या पवार घराण्याचा
बाजीराव मस्तानीच्या प्रेमाचा
विष्णू गणेश पिंगळयांच्या शौर्याचा जी... जी... जी...
इनामगावी उत्खननात सापडली ताम्र संस्कृती
जोडलीया नार एक हो नर मानव जाती
आलेगाव येथे होत्या राजांच्या घोड्यांच्या पागा जी... जी... जी...
सन 1818 सालाला
पेशवा इंग्रजांशी शेवटचा लढला
मराठी साम्राज्याचा पाया येथे खचला
तेथे ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला जी... जी... जी...
आंधळगावचे क्रिकेट महर्षी द. ब. देवधर
खेळ खेळले चौफेर
पद्मश्री किताबान कौतुक करत सरकार जी... जी... जी...
लोकशाहीरी गाजविली हो मोमिन कवठेकर , विठ्ठल मेदंरकर , भरत दौंडकरांनी
आखाड्याचा फड गाजवला महाराष्ट्र केशरी रघुनाथ पवारांनी, शिरूर केसरी अशोक पवारांनी जी... जी... जी...
संगीतरत्न लालजी गंगावणे
संत साहित्य अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे
सातासमुद्रापार नेल शिरूरच नाव
रसिकभाऊ धारिवाल उद्योजकाने जी... जी... जी...
राजकारण इथले कधी ना स्थिरावले
कोणी कायमचे ना टिकले
एक बुडाला एक गळाला
एकच निवडून हो आला. जी... जी... जी...
विशेष येथे खूप वेगळे
जन्मभुमी हो गाव वाघाळे
टाकळीहाजी चे रांजणखळगे
चिंचोलीचे मोरपिसारे
करडयाचे हो झुलते मनोरे जी... जी... जी...
विज्ञानाची धरूया आस
अध्यात्माची पकडू नस
करूनी स्वाध्याय घेऊ ध्यास
निश्‍चित शिरूरचा विकास जी... जी... जी...

-
शाहिर संभाजी गोरडे, ९५५२१२८११७, ९४०४९५९४२९

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही