शिरूर - ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भराल?

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. 13) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. उमेदवारी अर्ज उमेदवाराला संगणकीकृत भरावे लागणार आहेत. अर्जाची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज कसा भराल, याविषयी....

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ-
https://panchayatelection.maharashtra.gov.in/


 • वरील संकेतस्थळावर गेल्यानंतर सुरवातीला वापरकर्ता नाव अर्थात यूजर नेम व पासवर्ड टाकावा.
 • त्यानंतर उमेदवारांची नोंदणी करावी अर्थात क्रियट अ केडिडेड रजिस्टेशन या ठिकाणी क्‍लिक करावे.
 • नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती असे इंग्रजीत पर्याय समोर दिसतील. यापैकी ग्रामपंचायत हा पर्याय निवडावा.
 • येणाऱ्या स्क्रीनवर उमेदवाराना नोंदणी करता येईल. ही नोंदणी करताना
- आपले नाव व वडिलांचे किंवा पतीचे नाव, आडनाव इंग्रजीत भरावे. त्यानंतर
महसूल विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतीचे नाव निवडा
- प्रभाग क्रमांक व जागा निवडा व त्याची खात्री करा.
- आपले यूझर नेम व पासवर्ड भरावे.
- यानंतर सबमिट या बटणावर क्‍लिक करा.
माहिती योग्यरीत्या भरली असल्यास इनफरमेशन सेव्ड सक्‍सेसफुली असा संदेश दिसेल. पुन्हा वर नमूद केलेल्या संकेत स्थळाला भेट द्यावी.

 • पुन्हा आपले यूझर नेम व पासवर्ड टाकावे व लॉगइन या बटनावर क्‍लिक करावे.
 • त्यानंतर उमेदवारांची नोंदणी करणे अर्थात क्रियट अ केडिडेड रजिस्टेशन या ठिकाणी क्‍लिक करावे.
 • यानंतर स्क्रीनवर उमेदवारी अर्ज येईल. हा अर्ज इच्छुक उमेदवाराला इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेतून भरता येणार आहे.
 • उमेदवारी अर्जात महसूल विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतीचे नाव निवडून लिहावे. यानंतर आडनाव, नाव व वडिलांचे किंवा पतीचे नाव, प्रभाग, आरक्षण व इतर सर्व नमूद केलेली माहिती भरावी. घोषणापत्रात योग्य पर्याय निवडावा. कोणताही पर्याय न निवडल्यास नाही हा पर्याय आपोआप निवडला जातो.
 • कॅपचा दर्शविण्यात आलेले आकडे व अक्षर अचूक रीत्या भरा. भरलेली माहिती योग्य भरलेल्याची खात्री करावी. व नंतरच ‘सेव’वर क्‍लिक करावे. यानंतर उमेदवारास नोंदणी क्रमांक मिळेल. या क्रमांकाचा उमेदवाराला निवडणुकीच्या पुढील टप्प्यात उपयोग होणार असल्याने हा नोंदणी क्रमांक उमेदवाराने लक्षात ठेवावा.
 • उमेदवाराला उमेदवारी अर्जासोबतची आवश्‍यक असणारी कागदपत्रेही संगणकावर अपलोड करावीत.
यानंतर उमेदवारी अर्जाची प्रिंट घेण्यासाठी उमेदवाराने डाऊनलोड यावर क्‍लिक करावे व प्रिंट काढावी व उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करावी. या अर्जासोबत स्कॅन केलेली कागदपत्रे जोडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आयोगाने निश्‍चित केलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावीत.

www.shirurtaluka.com या संकेतस्थळावर ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱया इच्छुक उमेदवारांचा अल्पपरिचय ठेवला जाईल, यासाठी संपर्क साधा.
तेजस फडके -
9766117755 / 9049685787

संबंधित लेख

 • 1