कर्डेलवाडी - !!!! ज्ञान पसायदान !!!! - कैलास दसगुडे

झोळी घेऊन ज्ञाना
बसला रूसुन झोपडीत

बहीण मुक्ता काढते त्याची
माऊली सम समजूत

हसला ज्ञान सूर्य
आला झोपडीतून बाहेर

त्याने प्रकाशले जग
दिले ज्ञानेश्वरी भांडार

संपले सात शत
तरीही नाही कधी रित
आनंदले वाचून सगळे
विश्व झाले हर्षभरीत

कैलास म्हणे
बहीण असते भावा मागे
धरून छाया

माझ्या महाराष्ट्रात ज्ञाना मुक्ता देवा घाल
तु जन्माया ॥


विजयी दसरा

सण आलाय दसरा दसरा
जीवनात सुगंधी आनंद पसरा॥

येतात कधी दिवस आणि रात्र
बुरे दिन अवश्य विसरा॥

जीवन सणांचे दुर्मिळ क्षण
पकडण्यास हात उघडून पसरा॥

सोनिया पेक्षा मन हेच सोने
सुवर्ण पेढीचा पत्ता विसरा॥

हार्दिक शुभेच्छा विजयासाठी
चला जपून ठेवण्या ओंजळ पसरा॥

मन मने जोडून आपाट्या पानासम
माणूसकीचा चेहरा ठेवा हसरा॥

लावून मना मनात जीवन-ज्योत
निराशेस लावू जरा कासरा ॥

भादवा पोळा
तापला भादवा मास
बैलपोळा आला अमावसेस
बैल शेतकऱ्यांना अन्
जगाला देतो अन्न घास

घालून अंघोळ पाणी
देऊन पुरण पोळी
दाखवून आधी लाडू
बाजरीचा खास

शिंगे रंगाली बेगडी
गळ्यात शोभे
गुंगरकडी
पायी घालुन नक्षीदार
सोन कडी ॥

देऊ कडाक्यास तेल पाणी
आवाजात गाईल गाणी
धूर अंधार उडविल
पुन्हा पुन्हा फुसडी

नेऊ वाजत गाजत राजा
महादेवाच्या दरवाजा
वर मागु खुशालीचा
मायदाळ पिकू दे गवत अन्न भाज्या

लक्ष्मी घरधन्यास सुख
लाभो भरपूर
येवो धान्य बरकत
अन् माल भाज्या बाजार

नको आत्महत्या नको
जीव कोत्या
रिकाम्या मनात नको
दिशा रित्या
येऊ उधाण आनंदा
दुध दुभत्या॥

गोकूळ हा सारा
वाटो सोन्याहुन प्यारा
सर्वत्र सुख शांतीचा
सुटु दे विश्वासू वारा...

- कैलास दसगुडे, कर्डेलवाडी, शिरुर.
9850374910

Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही