शिरसगाव काटा - मी पाहिलेला देव !

वेळ सकाळची. शाळकरी मुले, नोकरदार वर्ग, चाकरमान्यांची वेळेत जाण्यासाठी सकाळच्या एक्सप्रेस गाडीला तुफान गर्दी. त्यात आमची पुण्याला येण्याची पहिलीच वेळ. अहो रेल्वे कधी पाहिलीच नव्हती, त्यामुळे आज रेल्वीत बसायला मिळणार या वेगळ्याच आनंदात. त्यामुळे वेळेअगोदर स्टेशन वर तिकीट काढून हजर. तासाभराने एक पॅसेंजर आली. कसाबसा आत मध्ये डब्यात घुसलो. गाडीने आता चांगलाचं वेग घेतला होता. प्रत्येक स्टेशनागनीक फेरीवाले, फळावाले तर एखादी सासू-सुनेचं उखाणे घेऊन व मध्येच हास्यविनोद करणारी पुस्तक विक्रेती मावशीने एव्हाना चांगलीच करमणूक केली होती.

जसजसे पुणे स्टेशन जवळ येऊ लागले तस तसे प्रवासी उतरू लागले. मीही गर्दीत उभा राहून चालू गाडीतून कसे उतरतात ते पाहू लागलो. आता गाडी फलाटावर आलेली असते. कधीही गर्दीची सवय नसताना आज गर्दीतून प्रवास व तो ही रेल्वेने याचं मनाला एकप्रकारे समाधान वाटतं होतं. पिशवी घेऊन धक्के सहन करत कसाबसा बाहेर पडलो. काही अंतर पार केल्या नंतर मागून कोणीतरी हाक दिल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर सुटाबुटा वरून तिकीट चेकर असावा हे मनाने ताडले. तिकीट आहे म्हटलं मग का भ्यायचं असे म्हणून जवळ गेलो. तिकीट दाखवा असे म्हणताच खिशात हात घातला. पाहतो तर तिकीट गायब. खिसे तपासले, पिशवी तपासली पन गर्दीत तिकीट कोठे तरी पडले. साहेबांना तिकीट पडल्याचे सांगितले. तर त्यांनी बी त्यांच्याच भाषेत खड़े बोल सुनावले. दंड भरावा म्हटले तर घरी जायची पंचाइत. शेवटी महशयांनी तिथेच बसवून ठेवले. इथे ना ओळखीचे ना पाळखीचे मदत कोणाला मागायची.

पण... लांबूनचं एक सद्ग्रहस्थ माझी घालमेल पाहत होते. शेवटी जवळ येऊन आपुलकीने त्यांनी माझी विचारपूस केली. संबधित तपासणीसास दंड भरून माझी सोडवणूक केली. एव्हाना दुपार टळून गेलेली असते. जाम भूक लागल्याचे सांगताच हॉटेलात कोणतीही ओळख नसताना त्या व्यक्तीने जेवण दिले. मीही त्यांचे आभार मानतो. व तो गृहस्थ काळजी घे सांगून मोलाचा सल्ला देऊन निघून जातात. पुढे मीही पुन्हा परतीच्या गाडीने प्रवास करण्यासाठी फलाटावर गाडीची वाट पाहत असतो, आता मनात फक्त विचार चालू असतो. मला अडचणीत मदत करणारा तो मित्र नक्की कोण होता?

मित्र, नाही...नाही देव तर नसेल ना ?!!!
Dedicated :- Unknown friend who help me in bad situation !

- सतीश केदारी
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1