शिरसगाव काटा - शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...

माजात अापल्या अासपास अनेक मुलं हि कुटुंब सुखाला पारखी झालेली असतात. यापैकी लहान वयातच वडिलांच्या मायेला दुरावलेल्या एका मुलाने अाईच्या शब्दांत लिहिलेली  हि एक कविता. अल्पवयातच वडिलांचे छत्र हरपले... अन् या मुलाचा अाजी, अाजोबा, मामा यांनी सांभाळ केला. हा मुलगा मोठा होतो, शिक्षण घेतो परंतु घरची गरीब परिस्थिती मात्र विसरत नाही. याकवितेत मजुरी करणा-या  अाईने मुलाकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, हे जाणून घेऊया याच मुलाच्या शब्दांतून...

शिखरासारखं यश तुला मिळवायचयं...

मरेपर्यंत अविरत कष्ट तुला करायचयं
दिवसाचीरात्र अन रात्रीचा दिवस तुला करायचायं
यशापयशाचे जिणे चढत विजय तुला मिळवायचायं
कुणी हसेल,कुणी रुसेल पण लक्ष देउ नकोस
हसत हसत यश तुला मिळवायचयं
बाळा,शिखरासारखं यश तुला मिळवायचंय !

ज्यांनी केले कष्ट तुजसाठी
त्यांसाठी अत्युच्च्य काम तुला करायचयं
बाळा, शिखरासारखं यश तुला मिळवायचंय !

माय तुझी रोज करी रोजंदारी
मामा तुझा उभा राहिला बापापरि
तु खरंचं कर त्यांची स्वप्न पुरी
अाजी म्हणे कर अभ्यास छान
वाढव अापल्या मामा, अक्का, तात्यांचा मान

माय म्हणे थकले रे अाता कष्ट करुनी
तु अाण माझे डोळे अानंदाश्रुंनी भरुनी
तुला वाढवता वाढवता अरे खाल्ल्यात रे खुप खस्ता
तु कर स्वनं अामची पुरी तुला तुज्या तात्यांचा वास्ता
हसत हसत जग तुला  जिंकायचयं 
म्हणुनच म्हणते बाळा, शिखरासारखं यश तुला मिळवायचंय !

                                 - सचिन मिताजी पांढरे
                                   (७३८७२९८६६९)
(शब्दांकनः
सतीश केदारी)

संबंधित लेख