शिरूर - जगणं एक अाव्हाण स्विकारलं म्हणूनच...

डॉक्टरांनी ती "अॅबनॉर्मल" असल्याचे सांगितले. हा शब्द कानावर पडला अन क्षणभर पायाखालची वाळूच सरकली.काहिक्षण काय करावं ते सुचेना. त्या क्षणी खुप रडून घेतलं अन मनाला सावरण्याचा समजावण्याचा प्रयत्न केला. पुन्हा उभी राहिले जगण्याशी लढायला. यावेळी एक अाशा म्हणुन छोट्या मुलीकडे पाहिलं अन वेगळ्या जीवनाला सुरुवात करत नव्याने प्रवास करु लागले.

सुरवातीपासुन मला नेहमी वाटायचं जीवनातील प्रत्येक गोष्ट चॅलेंज म्हणूनच स्विकारेल अाणि विजयी होईल. हारणं तर मला कधी माहितच नव्हतं! कदाचित माझी हिच जिद्द माझ्या जिवनात चॅलेंज म्हणून येईल अन् अायुष्याचा व जगण्याचा भागच बनून जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. हिच जिद्द मला चॅलेंज बनली अन मीही यशाच्या शिखराकडे धाव घेत लढले अन विजयी हि होऊन दाखविले.

हे चॅलेंज सुरु झालं तेच मुळी मोठ्या मानसिक धक्कयाने ! मोठी कन्या अाकांक्षा ही सहा वर्षाची झाली तेव्हाच तिच्या वागण्यातील इतर मुलांप्रमाणे असणारा बदल समोर येऊ लागले. ती इतर मुलांप्रमाणे वागत नाहीत म्हणून जवळच्या डॉक्टरांकडे तपासणी करायल्या गेल्यानंतर डॉक्टरांनी ती "अॅबनॉर्मल" असल्याचे सांगितले. हा शब्द कानावर पडला अन क्षणभर पायाखालची वाळूच सरकली. काहीक्षण काय करावं ते सुचेना. त्या क्षणी खुप रडून घेतलं... अन मनाला सावरण्याचा समजावण्याचा प्रयत्न केला. पुन्हा उभी राहिले जगण्याशी लढायला. यावेळी एक अाशा म्हणून छोट्या मुलीकडे पाहिलं अन वेगळ्या जीवनाला सुरुवात करत नव्याने प्रवास करु लागले.

अाता पहिला प्रश्न या मुलीसाठी काय करु? कसं करु? हा पडलेला. यातच कोणीतरी सांगितले अशा मुलांसाठी अहमदनगरला शाळा अाहे. या प्राथमिक माहितीनंतर मोठ्या मुलीला घेउन प्रवास सुरु केला. राहण्याची सोय नसल्याने शिरुर-अहमदनगर चा प्रवास सुरु केला. रोज येणं-जाणं होऊ लागलं. हळूहळू मुलीचेही प्रोब्लेम वाढू लागले. या मध्ये त्रास होउ लागल्याने अनेकदा खोली घेउन राहण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या वागण्याला व  त्रासाला कंटाळून अनेक घरमालक घर अल्पावधीतच घर खाली करायला लावीत. या अशा होणा-या त्रासामुळे अनेकवेळा स्वत:चं खूप रडत बसायचे. पण अापले दु:ख सांगणार कोणाला?

असाच प्रवास अनेक दिवस सुरु होता. विशेष मुलांच्या शाळेत अनेकदा घातलं. परंतु, अशा एकाही संस्थेने या मुलीला संपुर्ण वर्षभर सांभाळलं नाही. शारिरिक व मानसिक कसलेचं संतुलन नसल्याने सहा-सहा महिन्यातच वेगवेगळ्या संस्थेत या मुलीला दाखल करावे लागत असे. यात तिचा काय दोष? ती जगाला ओरडून सांगणार तरी कसं? हळूहळू या मुलीचे शारीरिक समस्या वाढू लागल्या. या जगण्याचा प्रवासात कोणी सहानुभुती तर कोणी दयेची भिक घालायचा. कधी संपुर्ण प्रवास मुलीचा रडुनचं होई. अहमदनगर नंतर कोणी सांगितलं म्हणून मोरगाव-सुपा येथील शाळेचा अनुभव घेतला तर पुण्यातील एका  नामांकित संस्थेत देखील प्रवेश घेऊन नशीब अाजमावण्याचा प्रयत्न केला.  दुसरीकडे कोणी सांगायचं शहरातल्या चांगल्या डॉक्टरांकडे पहा,कोणी म्हणायचे अायुर्वेदीक अमुक-तमुक अाहे. त्याच्याकडे जा. मी ही हार न मानता वेड लागल्यागत धावत जाई. तिथे हि नशीब अजमावून पाही. परंतु, एकमात्र गुण कुठं अाला नाही. अनेकदा मुलीला प्रवासात टॉयलेटला अाली तर धावती गाडी सोडून उतरावे लागे. प्रवासात असताना मुली मोठ मोठ्याने रडायच्या, किंचाळायच्या त्या वेळी चाललेल्या वाहनातून खाली उतरायला लागे. इतर प्रवाशांनी माझ्याकडे अशा अवस्थेत पाहिलं तर मुली पेक्षा अाईचं विमनस्क अाहे का असे वाटे. अनेकजण हसायचे तर कोणी त्रासल्या स्वरात "ए बाइ त्रास देऊ नकोस, मुलीला घेऊन खाली उतर" असे सांगायचे, ते ही सर्व प्रवाशांसमोर. त्यावेळी मनात खुप चिड अन खुप रडू येई. परंतु, त्याच क्षणी पुन्हा मनाचा निश्चय करत असे अन पुढल्या प्रवासाला लागत असे.

असाच एक प्रसंग. मुलीला पुण्याच्या नामांकित संस्थेत दाखल करायचे होते. एसटी बसले. प्रवास सुरु असताना दोन्ही मुली मोठ्याने ओरडू लागल्या. किंचाळू लागल्या... शेवटी गाडी थांबवावी लागली तेही मध्येच. अासपास साधी चहाची टपरी देखील नव्हती. उन्हाची काहीली झालेली.... मुली रस्त्याने मोठ मोठ्याने ओरडतायत. तहानेने व्याकुळ झाल्यात... अशातच पायी प्रवास सुरु केला. चप्पल तुटली... उन्हाचे चटके पायाला अन मनाला देखील बसत होते. सुमारे दोन किलेमीटर पाय-पीट केल्यानंतर एक छोटी टपरी दिसली. इतक्यावेळ तहाणेने व्याकुळ झालेल्या मुली अाता पाणी पिल्यानंतर शांत झाल्या होत्या. अाता पुढला प्रवास पु्न्हा सुरु केला. उन्हात झालेली पायपीट, तुटलेली चप्पल, विस्कटलेले केस अशी अवस्था पाहून मात्र प्रत्येकजण कुतुहलाने पहात होता. अाता पुणे जवळ जवळ अालेले असते. हि अवस्था पाहून अॅडमिशन होणारच नाही ह्याची खात्री झाली. पण हार न मानता प्रयत्न करुन तर पाहू असे म्हणत विशेष मुलांच्या शाळेत पाउल ठेवले. परंतु, मुलींनी लगेच तिथे हि मुख्य कार्यालयातच त्रास देण्यास सुरुवात केली. हि अवस्था पाहून लगेचच शिक्षकांनी दाखल करुन घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. या वेळी खुप विनंती करावी लागली तेव्हा कुठे दाखल करण्यास तयार झाले. या वेळी झालेला अानंद अवर्णनिय होता.

अाता सुरु झाला फक्त एका तासासाठी शिरुर-पुणे प्रवास. या एका तासात या मुलीचे मेडीकल ट्रेनिंग करावे लागत असल्याने रोज जावेच लागत असे. या प्रवासात एक गोष्ट ध्यानात अाली. अापण इतकी धावपळ करेपर्यंत अापणचं अशा मुलांसाठी वेगळं काही केलं तर....! अन् शिकण्याच्या उमेदीने मुलीच्याच विशेष संस्थेत "विशेष शिक्षिका"म्हणून स्वत:च अॅडमिशन घेतलं. स्वत:च्या मुलीसाठी काहीतरी करेल हा अात्मविश्वास वाढला. अाता मुलीचे शिक्षण अन स्वत:चे प्रशिक्षण असा दुहेरी प्रवास सकाळी ९ ते रात्री ९ असा सुरु झाला. दरम्यानच्या काळात खंबीर साथ दिली ती पती नितीन अन कुटुंबीयांनी. यांनी मोठं पाठबळ दिले अन अाणखी लढण्याची उमेद देखील दिली. दोन वर्ष कसे पूर्ण झाले ते कळलेच नाही. अन् ज्या संस्थेने सुरुवातीला प्रवेश नाकारला होत्या त्याच संस्थेत प्रेरणा घेऊन "विशेष शिक्षिका " म्हणून सन्मान मिळविला. याच संस्थेने स्वप्नांना उभारी दिली. तसेच  वेळी झालेला अानंद खुपच अविस्मरणीय  अप्रतिम  असाच होता.

यातुनच धडा  घेत अापल्या मुलांची झालेली फरफट इतर मुलांची होऊ नये. या ही मुलांना सन्मानाने  जगता यावे. पालकांना अात्मविश्वासाने जगता यावे यासाठी. स्वखर्चाने  स्वत: पुढाकार  घेत  विशेष मुलांसाठी वेगळा अाशेचा किरण म्हणून स्वत:ची नुकतीच विशेष मुलांसाठी आकांक्षा स्पेशल चाइल्ड एज्युकेशन स्कूल  हि संस्था शिरुर शहरातच सुरु केली अाहे.

जाताजाता सुज्ञ पालकांना एकच अावाहन करेल की, जीवनात कितीही दु:खाचा क्षण अाला असेल तर चिडू नका, हिरमुसु नका. जीवन हे एक अाव्हाण म्हणून स्विकारा! पु्न्हा जगण्याची उमेद नक्कीच मिळेल हे नक्की!
                                                                           - सौ. राणी नितीन चोरे, शिरुर
                             (संस्थापिका- आकांक्षा स्पेशल चाइल्ड एज्युकेशन स्कूल )
                             मो.नं : ८६०५१८२१००
(शब्दांकन-  सतीश केदारी)
 
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही