शिरसगाव काटा - डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जिवनपट

अाज डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांची १२५ वी जयंती.भारतीय राज्यघटनेत अतिशय महत्त्वाचे योगदान देणारे व  ख-याअर्थाने दलितांना जगण्याचा हक्क मिळवुन देणारे डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांचा जीवनपट जाणुन घेउया डॉ.किरण सोनवणे,पाटस, दौंड यांच्या लेखनीतुन...

भारतीय संविधानाचे ‘शिल्पकार‘ म्हणून डॉ.आंबेडकरांची संपूर्ण जगात ओळख आहे.डॉ.बाबासाहेब हे बहुआयामी वक्तीमत्व होते.ते चांगले राज्यकर्ते राजकारणी,कायदेपंडित,अर्थशास्त्रज्ञ,समाजसेवक होते.दलितांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी तसेच स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर लढा दिला.आणि दलितांना न्याय मिळवून दिला.ज्यांना डॉ.बाबासाहेबांनी ‘माणूस’ म्हणून जगायला शिकवलं.त्यांच्यासाठी ते आयुष्यभर समाज व्यवस्थे बरोबर लढत-झगडत राहिले.त्यांचे नेतृत्व डॉ.बाबासाहेबांनी केले.दलितांना आरक्षण मिळवून दिले.

स्वतंत्र भारताचे ‘पहिले कायदामंत्री’ म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉ.बाबासाहेबांना स्थान मिळाले.त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या देशासाठी केलेल्या योगदानाचा उचित गौरव म्हणून सन १९९० साली भारत सरकारने मरणौत्तर ‘भारतरत्न’हा सर्वोच्च नागरी किताब देऊन गौरव केला.
डॉ.बाबासाहेबांचे खरे नाव भीमराव .त्यांचा जन्म सौ.भीमाबाई आणि श्री.रामजी आंबेडकर यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेश येथे झाला.भिमरावांचा त्यांच्या भावंडामध्ये १४ वा नंबर होता.मोठे कुटुंब असल्याने घरची परिस्थिती तशी बेताची होती.डॉ.आंबेडकर यांचे वडील भारतीय सुभेदार होते. त्यांची मध्य प्रदेशातील ‘मोह’ छावणीमध्ये बदली झाली.वडिलांच्या निवृत्तीनंतर भीमरावांचे कुटुंब सातारा येथे स्थलांतरित झाले.ते साल होते १८९४.


नंतर काही दिवसातच त्यांच्या पूज्य माताजींचे निधन झाले. चार वर्षानंतर त्यांच्या वडिलांनी पुनर्विवाह केला आणि ते परत मुंबईला स्थलांतरित झाले. मग भीमरावांनी त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण १९०८ मध्ये मुंबईत पूर्ण केले.डॉ.आंबेडकर ‘हिंदू-महार’या जातीत जन्मलेले असल्याने व हि जात नीच जात (शुद्र) समजली जात असल्याने डॉ.आंबेडकर जातीवाद अशा वाईट प्रथांना बळी पडले.त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला. समाजात वागत असताना तर अपमान झालाच पण डॉ.आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्या ‘आर्मी’ स्कूल जी ब्रिटीश सरकार चालवत होते, त्या शाळेतही त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळाली.

ब्राम्हण समाज आणि उच्चवर्णीय समाज यांच्या सांगण्यावरून अनेकदा शाळेत दलितांना (शूद्रांना) वर्गाबाहेर बसून अभ्यास करावा लागला.त्यात डॉ.आबेडकर हि होते.सातारा मुंबई ज्या-ज्या ठिकाणी डॉ.आंबेडकर राहिले,शिकले तेथे-तेथे त्यांना अपमान सहन करावा लागला.सन १९०८ मध्ये मॅट्रिक नंतर त्यांना एलफिन्सटन कॉलेजला प्रवेश मिळाला.त्यावेळी त्यांना गायकवाड राजघराण्याचे बडोद्याचे सयाजी राव (तिसरे) यांच्याकडून दरमहा २५/- रु विद्यावेतन पण मिळाले.कॉलेजला त्यांनी चांगले यश मिळवले.नंतर १९१२ मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी (मुंबई विद्यापीठ) येथून ‘राज्यशास्त्र’ आणि ‘अर्थशास्त्र’ हे विषय घेऊन आपली पदवी प्राप्त केली.

उच्च शिक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले. अमेरीकीतून उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांची निवड बडोद्याचे राजा यांचे दरबारी सुरक्षा सचिव म्हणून झाली.तेथे सुद्धा त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली.त्यानंतर त्यांनी मुंबईत सिडेनहम कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले.पुढील अभ्यासासाठी डॉ.आंबेडकर सन.१९२० मध्ये स्वखर्चाने इंगलंडला गेले.त्यांच्या यशाने प्रभावित होऊन लंडन विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ (D.Sc) हि पदवी बहाल केली.अर्थशास्त्र चा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी बॉन(जर्मनी) येथेही काही महिने वास्तव्य केले.८ जून १९२७ रोजी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टरेट’ हि मोठी पदवी बहाल केली.

दलित चळवळ : -

लहानपणापासूनच डॉ.आंबेडकरांना वाईट वागणूक मिळाली.ठिकठिकाणी ‘दलित’ म्हणून हिणवले गेले होते.आणि म्हणूनच परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतल्यानंतर त्यांनी विखुरलेल्या देशाला एकसंघ करण्यासाठी एक मोहीम उभारली . दलितांसाठी (शुद्रासाठी) काहीतरी भरीव काम करायला हवे,त्यासाठी वेगळी व्यवस्था उभारावी असं त्यांना मनोमन वाटू लागले.मागासवर्गीयांसाठी आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न चालू केले.लोकांना त्यांनी संघटीत व्हायला लावलं.त्यांनी मंत्र दिला “शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा ! “आपले विचार आपल्या समाज बांधवापर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी ‘मूकनायक’ या वर्तमानपत्राची निर्मिती केली.एके दिवशी मोर्चाला संबोधित करताना त्यांचे भाषण ऐकून कोल्हापुरचे शाहू महाराज हि प्रभावित झाले.आणि त्यांनीही आंबेडकरांच्या चळवळीला साथ दिली.

राजकीय कारकीर्द : -

समाजाला सुधरावयाचे असेल तर राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय नाही.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकराणी जाणले.लोक त्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हणत.सन १९३६ मध्ये डॉ.आंबेडकरांनी स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना केली.१९३७ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने १५ सीट्स (जागा) मिळवून चांगलीच मुसंडी मारली.कॉंग्रेस पार्टी तसेच महात्मा गांधीजी शूद्रांना ‘हरिजन’ म्हणून संबोधल्यामुळे डॉ.आंबेडकरांनी त्यावर आक्षेप घेतला आणि शुद्र / दलित हे सुद्धा समाजातील एक घटकच आहेत व त्यांनाही समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे म्हणून आग्रह धरला.डॉ.आंबेडकरांचे कार्य बघून त्यांची कायदेशीर सल्लागार समिती मध्ये निवड करण्यात आली.तसेच त्यांची ‘मजूरमंत्री’ म्हणून निवड करण्यात आली.

सविंधानाचे शिल्पकार : -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान समितीच्या अध्यक्षपदी निवड केली.डॉ.आंबेडकर प्रख्यात कायदेपंडित होते.उच्चवर्णीय आणि नीचवर्णीय यांमधील मुख्य ‘दुवा’ पूल बांधण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब केले. आणि त्यामुळे भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाचे संविधान बनविण्याचे महान कार्य डॉ.आंबेडकरांनी केले.

बौद्ध धर्मांतर : -

सन १९५० मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला गेले.तेथे बौद्ध दीक्षा घेतली.तेथून आल्यानंतर त्यांनी ‘बुद्धीझम’ वर पुस्तक लिहिले आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉ.बाबासाहेबांनी सन १९५५ मध्ये ‘भारतीय बौद्ध महासभेची’ स्थापना केली.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ‘द बुद्धा अॅँड हिज धम्म’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.१४ ऑक्टोंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाच लाख अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.(धर्मांतर) केले.नंतर आंबेडकर ‘चौथी जागतिक बौद्ध महासभेला’ उपस्थित राहण्यासाठी काठमांडू येथे गेले. २ डिसेंबर १९५६ लाच त्यांनी शेवटचे पुस्तक ‘द बुद्धा ऑर कार्ल मार्क्स’ पूर्ण केले.
मृत्यू :-
मधुमेह या आजाराने ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाला.
 या महामानवाला जयंती विनम्र अभिवादन !

                                                                                            डॉ.किरण सोणवणे
                                                                                             पाटस ,ता.दौंड
                                                                                (शब्दांकन :सतीश  केदारी)
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

शिरूर तालुक्यात बाहेरील नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे, असे आपणास वाटते काय?
 होय
 नाही
 माहित नाही