गुनाट - आत्महत्या (कविता)

राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना विदर्भ,मराठवाड्यातील शेतक-यांच्या अात्महत्या सुरु अाहेत.या शेतक-यांच्या  कुटुंबांवर अात्महत्या केल्यावर कशी वेळ येते जाणुन घेउया धनश्री अासवले यांच्या भावनांतुन थेट गावातुन या सदरात  ...

आत्महत्या

 गळफास घेतलेल्या शेतक-याचं
 स्मशानात सरान पेटलं
पोरांकडे पाहून बायकोनं
दुख काळजात रेटलं !

आधार गेला धन्याचा
घर पडलं ओसाड
 व्याजासाठी दारात त्याच्या
 सावकार येई दिसाड !

बारमध्ये हे राजकारणी
उधळतात रूपये लाखो
पैशावाचून मरणा-या शेतक-याचा
दिसत नाही का त्यांना टाहो ?

कर्जमाफीची आश्वासने
फक्त पांढर्या कागदावरच
साहेब दुष्काळग्रस्तांना भेट देतात
फक्त सावकाराच्या दारावरच !

नाश होईल त्यांचाही
ज्यांनी प्रवृत्त केलयं मरायला
देवही राहायचा नाही
माथा देवळात टेकायला !

बिनबापाची लेकरं अन
मोकळं कपाळ असलेल्या बायका                               
कृषीप्रधान देशाच्या बाता करणा-यांत
या  शेतक-याची  हाय का काळजी कुणाला ????       

             धनश्री भिवाजी आसवले
  (मु.पो.गुनाट, ता-शिरूर, जि-पुणे
      मो.नं.9172389548)

 
Comment Box is loading comments...

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही