शिक्रापूर - असा मी घडलो – शेरखान शेख

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवस कंपनीत नोकरी केल्यानंतर स्वतःचे मोबाईल चे दुकान टाकण्याचा निर्णय घेतला. मोबाईल दुकान चालू करून त्यातून उपजीविका सुरु केली.नवीनच दुकान चालू केलेले असल्याने सुरवातीला दुकानाच्या प्रसिद्धीस आणि मित्रांच्या संपर्कास जास्त प्राधान्य दिले.सुरवातीपासून वाचन आणि काही समाजकार्याची आवड असल्याने त्या पद्धतीने काम सुरु होते. अशातच माजी ओळख नुकतीच युवक क्रांती दलाचे संघटक विकास लवांडे यांचेशी झाली.याच ओळखीतुन त्यांनी प्रेरणा देत  तू फक्त पत्रकार बनण्याची जिद्द ठेव आणि बघ मला खात्री आहे तू नक्कीच एक आदर्श पत्रकार झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले आणि डिसेंबर २०११ मध्ये सुरु करण्यात आलेल्या साप्ताहिक मध्ये सुरवातीपासून काम करण्याची संधी मला मिळाली.अन इथेच खरा अायुष्याचा प्रवास सुरु झाला.

पत्रकारीतेचा काडीचा अनुभव नसताना देखील समाजसत्ता चे संपादक विकास लवांडे यांनी मला काम करण्याची संधी दिलेली असल्यामुळे आता जोमाने सुरवात केली. तोडकीमोडकी बातमी करण्यास सुरवात करू लागलो यावेळी अनेक चुका होत असताना देखील माझ्या चुका मला समजावून सांगून त्या सुधारण्यासाठी मला लवांडे सहकार्य करू लागले आणि काही दिवसातच मी स्वतः वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या करू लागलो.आणि सर्वत्र माझी ओळख समाजसत्ता चा पत्रकार अशी झाली.गावातील अनेक समस्या समाजसत्ताच्या माध्यमातून सोडवीत असल्याने महात्मा गांधी तंटामुक्ती समिती शिक्रापूर च्या पत्रकार प्रतिनिधी पदी काम करण्याची संधी देखील मला मिळाली.

या दरम्यान समाजसत्ता आणि www.shirurtaluka.com चे कामकाज काही काळ एकत्रित चालू लागले.यावेळी www.shirurtaluka.com चे संस्थापक आणि ई संतोष धायबर यांचेशी फक्त फोनवर संपर्क आला आणि सरांनी मला सांगितले कि तुमच्या बातम्या देखील चांगल्या व वस्तुस्थितीला धरून असतात त्यामुळे तुम्ही वेबसाईट वर सुद्धा बातम्या देत चला.यावेळी कोणीतरी आपल्या बातम्यांना चांगले म्हटल्याचा खूप आनंद मला झाला होता.आणि मग मी www.shirurtaluka.com या वेबसाईट वर देखील बातम्या देऊ लागलो. यानंतर whatsaap ग्रुप सुरु केलेला होता त्यामध्ये आम्ही सर्व तालुक्यातील मान्यवर चर्चा करू लागलो आणि मला सुरवातीपासूनच अपडेट राहण्याची सवय होती ती देखील सर्वांना आवडत होती. यानंतर काही वर्षापूर्वी फेसबुक झालेली शिवाजी महाराजांची विटंबना त्यावेळी सर्वत्र दंगल होऊन रस्ते बंद झालेले असताना मी ग्रूप वर शिक्रापूर येथील सर्व घडामोडी टाकत होतो. यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांना मी सर्व घडामोडी टाकत असल्याचे पाहून मी कोण आहे हे माहित नसताना देखील माझ्याशी वैयक्तिक चर्चा करू लागले.

दरम्यान च्या काळात मिञांच्या  ओळखीने पुण्यनगरी या दैनिकात  काम करण्याची संधी चालुन अाली. आणि मी देखील लगेचच कामाससुरवात करून वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या देऊ लागलो. पुण्यनगरी चा पत्रकार म्हणून माझी नवीन ओळख तयार झाली. विविध स्वरूपाच्या मोठमोठ्या बातम्या आणि त्यातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करत असताना  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिरूर तालुका उपाध्यक्ष पदासाठी काम  करण्याची संधी देखील मिळाली.त्या माध्यमातून देखील अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावलेली असून पत्रकारितेच्या माध्यमातून विविध गावांमध्ये अनेक कार्यकर्ते, पुढारी, यांसह अनेकांशी आज मैत्रीचे नाते निर्माण झालेले आहे. आज संपूर्ण तालुक्यामध्ये एक पत्रकार म्हणून माझी निर्माण झालेली ओळख हि माझ्यासाठी एक आदर्श आहे. परंतु आज या माध्यमातून अजुनहि पुढे जाण्याचे माझे स्वप्न आहे.
                                                                              -शेरखान शेख , शिक्रापुर

संबंधित लेख

  • 1

शिरूर तालुक्यात बाहेरील नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे, असे आपणास वाटते काय?
 होय
 नाही
 माहित नाही