शिरूर - खरंच ! काय असते प्रेम?

काय असते प्रेम?

                प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळीच असते ना? कोण नुसते बघून प्रेमात पडते तर, कोणी विचारांच्या प्रेमात पडतात.कोण सहवासाने प्रेमात पडतात. अशावेळी काही मनातले बोलतात तर कधी कोणी बोलू शकत नाही.फेसबुकचे आभासी जग पण  येथेही न बघता प्रेमात पडणारे काही कमी नाहीत.

असाच तो एक लाजरा,स्वप्नाळू पण सुंदर लिहिणारा.वाचनाची आवड असणारा.एक सुंदर पोस्ट वाचून रिक्वेस्ट पाठवली.कधी कधी बोलणे व्हायचे. ती बोलायची हा शांत पणे वाचायचा.हळूहळू तिच्याशी बोलणे वाढले. अन एक दिवस भेटायचे देखील ठरले.

सायंकाळची वेळ.सुंदर नदी किनारा. तो तिची वाट बघत बसला.थोडा आधीच आला होता.आज तो प्रथमच तिला बघणार होता. तशी दूर वरून ती येताना त्याला दिसली.तो थोडा शॉक झाला.कारण ती साडीत होती.त्याने वेगळी कल्पना केली होती तिच्या बद्दल. ती जसजशी जवळ आली तसतसे त्याच्या लक्षात आले.ती त्याच्या पेक्षा मोठी होती.मग त्याच्या लक्षात आले, अरे आपण तिला कधी विचारले नाही. तिचे वय काय आहे?

 तशातच "हॅल्लो ..... विचारातून बाहेर येऊन त्याने वर बघितले. ती एकदम जवळ येऊन उभी होती. खूप सुंदर होती ती.पण त्याला वाटले तशीच मोठी होती ती. त्याच्या पेक्षा. "बस!" तो बोलला. ती बसली. "ओळखला ना बरोबर तुला? ती बोलली. त्याला काय बोलावे समजले नाही. तो समोर पाण्याकडे बघत बसला.काय बोलावे त्याला समजत नव्हते.ती त्याच्याकडे बघत होती. किती साधा आहे हा,तिच्या मनात आले.स्वप्न बघणारा, स्वप्नात रमणारा,पण याला नाही माहिती अजून स्वप्न आणि सत्य खूप भिन्न असते ते.लहान आहे अजून ना हा! ती स्वत:शीच मनात बोलली. "छान आहे ना हे ठिकाण"? ती बोलली. "आवडले का"? माझे आवडते ठिकाण आहे हे! तो बोलला. जेव्हा मला खूप एकटे वाटते तेव्हा मी येथे येऊन बसतो.अगदी ती गेली तेव्हा देखील. नकळत तो बोलून गेला आणि मग शांत बसला.

तिला माहिती होते,त्याला आवडणारी 'ती' लग्न करून गेली होती.खूप प्रेम करत असूनही तो तिला सांगू शकला नव्हता.त्याच्या बद्दल तिला सगळे माहिती होते.पण स्वत:बद्दल ती कधी काही बोलली नव्हती.तिला त्याच्याशी खोटे नव्हते बोलायचे,पण त्यांने एक दिवस तिला सांगितले.तो तिच्यावर प्रेम करायला लागला आहे.तिने त्याला काही उत्तर नाही दिले.आपण भेटू मग बोलू! असे ती बोलली.आज ती त्याला भेटायला आली होती.
 
खूप वेळ शांतेत गेले. मग ती बोलली, "बोलणार नाहीस का तू काही"? खरे तर त्याला अाज खूप बोलायचे होते. पण काय बोलावे ते समजतही नव्हते.शेवटी तो बोलला, "तुझ्याबद्दल सांग ना काही? तू लग्न का नाही केले? सुंदर तर आहेस ना तु"? ती पुन्हा एकदा उदास हसली. तिला तसे हसताना बघून त्याला खूप वाईट वाटले.दूर वर बघत पाण्यात खडे फेकत ती बोलायला लागली."मी कधी तुझ्या सारखी होती रे! खूप स्वप्न बघणारी, पण आपण जे ठरवतो ते होते का कधी"?

अाता माञ तीच्या  अश्रुंचा बांध फुटला होता. अाता ती खुप काहि बोलु लागली. घरात सगळ्यात लहान मी. सगळ्यांचीच लाडकी होते मी. बारावी पर्यंत शिक्षण झाले.मग घरात लग्नाबद्दल बोलणे सुरु झाले.जवळच्या नातेवाइकांमधील मुलगा होता.आई वडिलांनी आधीच ठरवले होते.मग बोलणे झाले आणि छोटा कार्यक्रम ठरवून आमची अँगेजमेंट ही झाली. अाता घरात लग्नाची तयारी देखील सुरु झाली. आणि एक दिवस होणारा नवरा घरी येत असताना एक छोटा अपघात होऊन त्यात तो थोडा जखमी झाला.काही दिवस दवाखाण्यात राहिला.त्याचे खूप नातेवाईक भेटायला आले.आणि त्यातील एका आज्जीने शंका काढली, "मुलीची पत्रिका बघितली होती का?. झाले पत्रिका बघितली गेली आणि माझ्या पत्रिकेत कडक मंगळ आहे असे समजले. मग काय अपघात झाला तो त्या मुळेच असा ग्रह करून घेतला सगळ्यांनीच. कोणीही विचार न करता लग्न मोडून टाकले.मग काय सगळ्यांना लग्न मोडल्या मुळे माहिती झाले की मला कडक मंगळ आहे. मग राहूनच गेले लग्न. मी पण लग्नाचा विचार सोडून दिला. पुढे शिक्षण पूर्ण केले. आता एका शाळेत शिक्षिका आहे. तू मला प्रपोज केले. पण माझ्या बद्दल तुला काही सांगावे म्हणून आज तुला येथे भेटायला आले.

खूप वेळ दोघे शांत बसले. "चल खूप उशीर झाला. जाऊ या का"? ती उठून उभी राहिली. तो पण उठला आणि तिच्यासमोर आला.माझं  एक ऐकशील? तु माझ्याशी लग्न करशील? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारले. "पण मी तर मंगळीक आहे ना"? ती बोलली.

"ते मी नाही मानत हे काही.तू तयार आहेस का बोल ? तो बोलला. "पण मी तर तुझ्या पेक्षा मोठी आहे रे! ती उत्तरली. "अगं मग काय झालं? काय फरक पडतो? काही वर्षांनीच तर तु मोठी आहेस, बोलना? त्याने तिचा हात हातात घेतला.हा हात आणि तुझी साथ आयुष्यभरासाठी मला देशील ना? तिने नजरेनेच त्याला होकार दिला.आता तिच्या डोळ्यात खूप सारी खुशी होती आणि भावी संसाराचे स्वप्न देखील...


-अाशा नवले,
मुंबई

(शब्दांकन- सतीश केदारीे)


Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य