शिक्रापूर - शिक्रापूरजवळ शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी 'इडली अॅंड मी'

वयाच्या सतराव्या वर्षी चायनीज पासून सुरुवात केलेल्या व अाज पुण्यापासून कर्नाटक पर्यंत महाराष्ट्रभर हॉटेल्स असणा-या 'इडली अॅंड कामत'चे दिपक थोरात'इडली अॅंड मी'च्या जयश्री तुपे यांच्याशी नुकताच संवाद साधण्यात अाला. हॉटेल व्यवसायात शुन्यातुन विश्व निर्माण करणा-या दिपक थोरात त्यांच्या भगिनी जयश्री तुपे यांचा हॉटेल व्यवसायातील थक्क करणारा प्रवास जाणून घेऊया कार्यकारी संपादक सतीश केदारी यांच्या शब्दांतून...

सुरुवात कशी झाली?
सुरुवातीपासुनच अाम्हा दोघा बहिण भावांना हॉटेल व्यवसायाची अावड निर्माण झाली होती.त्यामुळे नोकरी न करता व्यवसाया करण्याचा निर्णय घेतला.दिपक थोरात यांनी हॉटेल मॅनेजमेंट विषयात पदवी पर्यंत चे शिक्षण घेतले.त्यात त्यांनी गोल्ड मेडल मिळवले. दिपक यांनी अल्पवयात म्हणजेच वयाच्या १९ व्या वर्षी कोथरुड परिसरात चायनीज चे छोटे हॉटेल टाकुन व्यवसायाला सुरुवात केली.याच व्यवसायात  प्रगती करत तीन वर्षांतच मुळशी येथे स्वत:चे हॉटेल सुरु केले.परंतु या वेळी अपयश पदरी पडले.या वेळी जिद्द व चिकाटी न सोडता व्यवसाय सुरुच ठेवला.या अपयशाच्या काळात भगिनी सौ.जयश्री तुपे व विजेंद्र तुपे यांनी पाठीशी राहत खंबीर साथ दिली.

इडली अॅंड मी व इडली अॅंड कामत चा जन्म कसा झाला?
खरंतर याची खुप मजेशीर गोष्ट अाहे. एकदा महाबळेश्वर ला फिरत असताना विठ्ठल कामत यांचे हॉटेल पाहिले.त्यावेळी हॉटेल पाहताच असे हॉटेल जर चालवायला मिळाले तर ? असा विचार मनात अाला. परंतु त्यावेळी अार्थिक अडचणी मोठ्याप्रमाणावर भेडसावत होत्या. सुमारे दोन वर्षानंतर भाउसाहेब भोइर यांच्या सहकार्यामुळे हा ही प्रयत्न यशस्वी झाला.एकाच वर्षात दिपक यांनी हॉटेल कामत च्या तीन शाखा घेतल्या. व त्यांच्या भगिनी सौ.जयश्रीताइ तुपे यांनी खेड शिवापुर येथे कामत ची स्वतंञ शाखा घेउन व्यवसायाला सुरुवात केली. कालांतराने काहि कारणास्तव दिपक व त्यांच्या भगिनी जयश्री तुपे यांना कामत या बड्या ग्रुपमधुन फारकत घ्यावी लागली.दरम्यानच्या काळात मोठा मनस्ताप सहन करावा लागला.परंतु तरीही न डगमगता याही वेळेस पुन्हा भरारी घेण्याचे ठरवत या दोघा भावंडांनी इडली अॅंड कामत व इडली अॅंड मी या नावाने स्वत:च हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला.

इतर हॉटेल्स पेक्षा तुमची खासियत काय ?
इडली अॅंड कामत व इडली अॅंड मी या दोन्हीही हॉटेल ची दक्षिणात्य व पंजाबी शुद्ध शाकाहारी पदार्थ हि  खरी खासियत अाहे.त्याचप्रमाणे सर्वच हॉटेलात खाद्य पदार्थ अगोदरच बनवुन न ठेवता अॉर्डर प्रमाणे बनवले जातात.त्याचप्रमाणे अस्सल खवय्यांसाठी 'जम्बो वडापाव' हा विशेष मेनु उपलब्ध अाहे.

इतर ठिकाणी कुठं कुठं हॉटल्स अाहेत ?
अामचे महाराष्ट्रात पुण्याजवळ भोर, पुणे-बेंगलोर हायवे लगत वरवे (महाबळेश्वर फाटा), सातारा जिल्हयात उंब्रज(मसुर फाटा), कोल्हापुर ला ज्योतिबा रस्तालगत (घाटी दरवाजा), कर्नाटक मध्ये कागल टोलनाका  अादी ठिकाणी 'इडली अॅंड कामत'या नावाने हॉटेल्स अाहेत.तर  इडली अॅंड मी ची पहिली शाखा पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापुर जवळ  सुरु केली अाहे.

याच रस्त्यावर इडली अॅंड मी ची शाखा तुम्ही का सुरु केली?
पुणे-नगर महामार्गालगत भरपुर हॉटेल्स अाहेत.परंतु शुद्ध शाकाहारी,स्वच्छता व  फॅमिलींसाठी ची हॉटेल्स फार कमी असल्याचे जाणवते.त्या मुळे अनेक पर्यटकांची प्रवासात गैरसोय होते. ही गैरसोय सौ.जयश्रीताईंना जानवताच त्यांनी या मार्गावरील अनेकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी इडली अॅंड मी ची शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

प्रतिसाद कसा मिळतो?
अाता  शाकाहारी खवय्यांच्या योग्यतेचे हॉटेल उपलब्ध झाल्याने पर्यटक, भाविक, यांची अाता मोठी गैरसोय थांबली असुन त्यांना एक पर्याय निर्माण होउन हक्काची जागा मिळाली अाहे.त्यामुळे अालेले ग्राहक हे संतुष्ट होउनच परत जातात. त्यामुळे प्रतिसाद चांगला  असल्याचा अनुभव सध्या मिळत अाहे.

इडली ऍण्ड मीचा स्पेशल म्हणून कशाची ओळख आहे?
स्पेशल मेन्यू म्हणून जंबो वडा आहे. याची चव चाखल्यानंतर अन् आकार पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.

हॉटेल्स व्यवसायात वाढलेली स्पर्धा याबाबत तुमचे मत काय?
हो खरे अाहे.परंतु अाम्ही फक्त ग्राहकांचे हित जपतो.अावडी-निवडी यांकडे देखील विशेष लक्ष दिले जाते.त्याचबरोबर हॉटेल मधील स्वच्छता, कामगारांचे अारोग्य अादी गोष्टी बारकाइने पाहिल्या जातात.त्यामुळे महाराष्ट्रभर अामचे हॉटेल्स अाजही मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असुनही दिमाखात उभी अाहे.सर्वांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच कि काय खवय्यांचे देखील हि अावडती ठिकाणे बनली अाहेत.पुणे-बेंगलोर हायवे ने प्रवास केलेला माणुस हॉटेलवर न थांबता निघुन गेला तर नवलच!अगदी शिक्रापुर च्या इडली अॅंड मी या ठिकाणी देखील अस्सल खवय्यांची अाता गर्दी च गर्दी झालेली दिसते.

सगळ्या हॉटेल्स चे कामकाज कसं सांभाळता.?
पुणे बेंगलोर हायवे ते कर्नाटकापर्यंत चे इडली अॅंड कामत चे हॉटेल्स  सर्व मी स्वत: सांभाळतो तर इडली अॅंड कामत चे सर्व कामकाज जयश्रीताइ या सांभाळतात.

भविष्यात काय नियोजन अाहे का ?
अामची तशी कोणाशी ही स्पर्धा नाही.केवळ पुणे-नगर महार्मागाने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी व केवळ शुद्ध शाकाहारी असणा-या अस्सल खवय्यांसाठी ठिकठिकाणी भविष्यात छोटे हॉटेल्स उभारण्याचा मानस अाहे.
सौ. जयश्री तुपे,विजय तुपे
८२३७३६९४५२
७३८५४३९७४६


संपर्क-
इडली ऍण्ड मी
पुणे-नगर रस्ता, 24वा मैल, साई पेट्रोल पंपाजवळ,
शिक्रापूर, ता. शिरूर. जि. पुणे.

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य