शिरूर - मृगजळ

'ती' ने 'त्याला' प्रथम पाहीले  ते एका साहीत्य संमेलनात.त्या अगोदर फक्त त्याच्या कथा कवितांचीं पुस्तकेचं तीने वाचलेली. त्याच्या शी ओळख होतानां का माहीत पण तीच्या -हुदयात उगाचच धडधडलं होतं. त्याच्याच एका कविता संग्रहावर तीने त्याची सही घेतली. With love Anirudh. ते शब्द पुस्तक पर्स मध्ये ठेवल्यावरही तीच्या नजरे समोर ते फिरत राहीले.त्याच धुंदीत ती घरी आली.पटापट काम आवरून निशांत ला झोपवुन ती पुस्तक घेऊन बसली नी लिहीलेल्या त्या तीन अक्षरावरून हात फिरवत राहीली. राजेश आज ही उशीराच आला. बेडरूम मध्ये येताच त्याने तीला जवळ ओढली. नाकाला तिव्र वास येऊनही ती दुर झाली नाही. त्या तीव्र वासातही सही देतानां त्याने लावलेल्या अत्तराचा सुगंध कुठेतरी दरवळला तीच्या मनात नी ती त्याच धुंदित ती राजेश ला बिलगली.

लग्नानंतर संसारात थोडी स्थिरावल्यावर रजनी कडे बराच फावला वेळ राहु लागला. मग तीने मागे ठेवलेली वाचनाची आवड पुन्हा जोपासायला सुरू केली. असाच एकदा लायब्ररीच्या कपाटात 'तो' भेटला तीला "अनिरुद्ध". नी त्याच्या कथा कांदब-या वाचायचं व्यसनच जडलं तिला. त्याचा शब्द नी शब्द तीला कासावीस करायचा. नी त्यानंतर येणारा भावनांचा आवेग ती कागदावर उतरवायची. असा बराच कागदांचा ढीग साठला तीच्याकडे. तो बघून राजेशच म्हणाला" एवढं लिहीतेस ते दाखव तरी तुझ्या त्या लेखकाला. आवडलं तर आपण काढु कि तुझं ही पुस्तक". अर्थात हे थट्टेने म्हटलं त्याने. कारण तो एक ठरावीक चाकोरीत राहणारा,प्रमाणित आयुष्य जगणारा माणुस होता.

हीने ते मनावर घेऊन पुस्तकावरील पत्यावर तो कागदाचा गठ्ठा पाठवुन दिला. ते उत्तराची अपेक्षा न ठेवता. असेच एका दुपारी पोस्टमन ने तीच्या हातात एक पाकीट ठेवलं नी तीला आभाळ ठेंगण झालं. त्याचा तीच्या लेखनावर अभिप्राय आलेला. काही चूका-काही उपदेश, थोडं कौतुक-नी प्रशंसा अशा सरमिसमिसळ अभिप्रायांनी भरलेला तो कागदाचा तुकडा. वारंवारं ती वाचत राहीली. त्या कागदाला येणारा तोच आवडता मंद सुगंध स्वत:त झिरपवत राहीली नी रात्री राजेशच्या मिठीत विरघळत गेली.

तीने असेच काहीतरी लिहुन पाठवाव नी 'अनु' ने, हो 'अनिरुद्ध' चा अाता 'अनु' झाला होता आता नी ती 'अनु' ची 'राणी'. अनु ने ते सविस्तर विश्लेषन करुन पाठवाव, हा सिलसिला कायम सुरू झाला. तिचं जग अाता विस्तारलं होतं. नवरा-मुल या चाकोरीतुन बाहेर निघुन ती अाता साहीत्यसभा,संेलनात जाऊ ला गली.व्यासपीठं गाजवु लागली.तिच्या लेखनाचंही मोठं कौतुक होऊ लागलं. ती आकाशी भरारी मारायची स्वप्न पाहु लागली. मात्र तिचा हा बदल घरात न माणवणारा होऊ लागला. राजेशने तीला दिलेली परवानगी, हो परवानगीचं त्याला खटकु लागली. तिचा अनिरुद्ध शी असलेला पत्रव्यवहार ही खटकु लागला नी सुरू झालं तीच्या येणा-या पत्राचं चोरून वाचन. कुणालाही सहज कळणार होतं की ते फक्त लेखनाशी संबधीत पत्र नव्हतचं तर त्यात प्रेमही होतं. नी त्याही पेक्षा ही खुप काही जे राजेश सारख्या सामान्य नवर्‍याला समजणं अशक्य होतं.


असेच एकदा ती येताच ती च्यावर "ती" पत्रे उधळून राजेश ने फर्माण काढले, "एकतर तुझं लिखाण, नी "तो कींवा मी- नी निशांत". तीने त्याला एकांतात भेटायला बोलवलं.तो आला ही. निवांतपणा हवा म्हणुन एका हॉटेलच्या खोलीत भेटले ते. ती स्वतः ला शांतचं ठेवत होती. तीच्या मनात चालणा-या दंद्वाशी अनभिज्ञ तो त्याचं लिखाण, पारितोषिकं,साहीत्य सभांबद्दलचं बोलत राहीला. तीनेही ते सगळं ऐकुण घेतलं. तिच्यातील बदल काही वेळाने जाणवताच त्याने तीला जवळ घेतली.अाता माञ तीच्या मनाचा बांध फुटला होता. राजेशचे निर्वाणीचे शब्द तीने त्याला सांगितले.अन आशेने त्याच्याकडे पाहत राहीली.

तो हळूहळू तिच्या पासुन लांब गेला नी खिडकीजवळ जाऊन उभा राहीला. "सांग ना रे येऊ न मी तुझ्याकडे?" असे म्हणत ती भावना मोकळ्या करत होती.पण अनिरुद्ध ची पाठच होती तीच्या कडे. " कस शक्य आहे हे रजनी. मला समाजात स्थान आहे. माझा ही संसार अाहे बायको-मुलं आहेत. तु जरी माझी प्रेरणा असलीस तरी मी तुला सगळ्या समोर स्विकारू शकत नाही. पण मी कधीच तुला अंतर देणार नाही. तु नेहमी माझीच राहशिल".असे अनिरुद्ध उत्तरला.
त्याने उच्चारलेला"रजनी" नंतरचा प्रत्येक शब्द तीच्या मनात झिरपत गेला. ती तशीच गप्प बसुन राहीली. मग तोच तीच्या जवळ आला नी तीला मिठीत घेऊ लागला.अाता रजनीला माञ त्याचा तोच अत्तराचा सुगंध पण फार भडक वाटु लागला. तिचं डोकचं गरगरू लागलं त्या वासाने. तशी ती उठली नी पर्स घेतली. " निशु शाळेतुन यायची वेळ झाली रे.अाता मला जायला हवं." असे म्हणत रजनी त्या हाटेलमधुन निघाली घराकडे.

एका खोट्या मृगजळाच्या मोहपाशातुन स्वतः ला सोडवत...
मुळ  लेखिका
प्रिती सनी कातळकर
(शब्दांकन-सतीश केदारी)

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही