शिरूर - " खरंचं आमचं काय चुकलं?"

"ताई ब-या आहात का?"दारातील तुळशीला पाणी घालुन नमस्कार करत असताना आवाजाकडे मी पाहीलं. समोर एक क्रुष रया गेलेला 35-40 च्या आसपासचा माणुस उभा होता. ओळखीच्या खुणा जाणवत असल्या तरी ओळख पटत नव्हती.


तसा नवर्‍याच्या प्रेमाचा 'विस्तार' बर्यापैकी वाढुन माझ्या शरीरावर जागो जागी दिसत असल्याने चारपाच वर्षा नंतर माहेरी आलेल्या मला कुणी ओळखील ही खात्री नव्हती पण बहुतेक येण्याआधी आमच्या आईने कॉलनीभर दंवडी दिल्याचा परीणाम असावा किंवा अजुनही तितकासा बदल झालेला नसावा म्हणून त्याने मला ओळखलेलं. मी खुप आठवुनही मला तो कोण हे काही आठवेना नी जुजबी विचारपुस करून तो निघुन गेला. आमचं हे बोलणं बघत असलेला शेजारचा रवी जवळ आला नी म्हणाला " ताई ओळखलं का ह्याला" मी नकारार्थी मान हलवली."

पाटील आहे" माझा त्या शब्दांवर विश्वासच बसेना. चारपाच वर्षा पुर्वी मी पाहीलेला पाटील शरीराने मजबूत सुद्रुढ नी देखना होता. अंगावर रोज इस्त्रीचे कडक कपडे घालायचा. छाती पुढे काढुन जग जिंकलयं याच अविर्भावात टेचात चालायचा. समोर गेला तरी त्याने लावलेल्या अत्तराचा वास नाकात घुसायचा. असा ह्या पाटीलची आज पार रया गेली होती.

 " काय झालं रे याला. आजारी आहे का" मी रवीला विचारलं. " हो! आजारीच आहे. लास्ट स्टेज ला आहे तो आता. एड्स झालाय त्याला" मी ऐकुन सुन्न झाले. रवी परत गेला नी मी घरात येऊन बसली. लहानग्या बहीनीने मी पाटीलशी बोललेलं बघीतलं होतं नी घरात आल्यावर मी एकदम शांत बसलेलं ही ती पहात होती. " तु कशाला एवढा विचार करतेस?जे केलयं तो भोगतोय पाटील." तीच्या स्वरात एक चिड जाणवत होती.


साधारण सात आठ वर्षांपुर्वी पाटील कॉलनीत रहायला आला होता तो. काळ्यांचं घर त्याने विकत घेतलेलं. बायको ही गोरीपान देखनी शोभेलशी होती. एक तीन वर्षाचा मुलगा ही होता त्या दोघांना. बोलका स्वभाव होता दोघांचा. कॉलनीत लवकरच सर्वांची ओळख झाली म्हणुन दारावरून जाताना बाहेर कुणी असलं कि त्याला हाक मारायची नी जुजबी विचारपुस करून पुढे जायचं ही त्याची नेहमीची सवय. गावी शेतीवाडी असल्याने इथे तेलमिठा पुरतचं कमवावं लागायचं म्हणुन त्याने कन्सल्टंसीचं ऑफीस टाकलं. बोलघेवड्या स्वभावा मुळे चांगला प्रतीसादही भेटला त्याच्या कामाला. त्याचं ऑफीस व्यवस्थित चालु लागलं. पण हा स्वच्छंदी माणुस घरात बायको असुनही ऑफीस मध्ये नोकरी मागायला आलेल्या पोरी-बायांना पटवायचा नी मजा करायचा. त्यातुनच हा रोग कुणीतरी त्याला दिला असावा.

नवर्‍याची बदली झालेली नी माझी नवी नोकरी यामुळे माझ्या मुलीला सांभाळायला मला आईच्या घराजवळच घर घ्यावं लागलं नी माझं बस्तान बसलं. पुढे सहा महीन्यांनी पाटील घाटीत च मेला. बायको काही दिवस गावी सासरी जाऊन राहीली पण सासरच्यांशी पटेना म्हणुन परत पोरा ला घेऊन इथेच आली. हळुहळु पाटीलने केलेल्या आर्थिक उलाढाली बाहेर पडु लागल्या. त्याचा तो ऐशआराम हा केवळ कर्जाच्या पैशावर चाललेला होता. तो मेला पण लोकांची देणी  माञ तशीच बाकी राहीली. देणी देणार तरी कोण? आता कर्जावाले बायकोच्या मागे कर्जासाठी तगादा लावु लागले. ती बिचारी पैसे आणनार तरी कुठुन? सासरच्या मंडळींनी  हात वर केले.माहेरच्यानींही संबध तोडले. शेवटी तीला स्वत:चं घर विकावं लागलं. कसंतरी देणं काही प्रमाणात चुकतं करून ती एका भाड्याच्या खोलीत दुसरीकडे राहु लागली. अाता पोराला मुन्सीपालटीच्या शाळेत टाकला होता. लोकांची धुणीभांडी करून स्वतःचं नी पोराचं पोट  अाता ती भरत होती. पण एका सुदंर तरूण बेसहारा बाईला जग असचं एकटं कसं सोडणार?काही लांडग्यांची नजर तीच्यावर पडली नी हीने ही परीस्थिती पुढे शरणागती पत्करली.

अाता रोज तीच्या घरी कुणी ना कुणी यायचा. तीने धुणंभांडी करणं केव्हाचं सोडलं होतं. पहिल्या पेक्षा राहणीमान ब-यापैकी सुधारलं होतं पण आधी सारखा मान समाजात कुणी देत नव्हतं. पण तीने माञ समाजा ची परवा करणं कधीच सोडलेलं. रोज कुणाच्या तरी गाडीवर जातानां दिसायची नाही तर कुणी तीच्या घरी आलेलं असायचं. काही दिवसांनी तीला ही 'एड्स ' झालाय असं कळलं. तीने लपवायचा केविलवाना प्रयत्न केला पण बातमी गावभर पसरलीच. घरी येणा-यांचीं वर्दळ  पुर्वीपेक्षा कमी झाली पण एकजण यायचाचं सारखा. बहुतेक तो तीथेच राहायचा ही. काही दिवसांनी त्या दोघात भांडणं नी मारझोडीचे आवाज घरातुन येऊ लागले. पण कुणीचं मधी पडायचं नाही.घरमालकाने घर खाली करायला सांगितलं . घरमालक बाहेरगावी राहायचा त्यामुळे तीचे हे प्रकार फार  उशीरा त्याच्या कानावर गेले.पण तीला सगळे ओळखत असल्याने घर कुणीच द्यायला तयार नव्हते.

एका मध्य रात्री तीच्या घरातुन मोठमोठ्याने आरडाआरड ऐकु येऊ लागली. म्हणुन सगळे तीकडे धावले. घराला बाहेरून कडी लावलेली. ती कुणीतरी उघडली तर आत ती नी तीचं मुलं जळतं होतं.  ती दोघं जिवांच्या आकांताने ओरडत होती. लोकांनी अतोनात प्रयत्न करूनही ती वाचली नाही नी तीचा मुलगाही.पंचनामा करून पोलीस बाॅडी घेऊन गेले. त्यांची बॉडी ताब्यात घ्यायला माहेर-सासरच्यानीं नकार दिल्यावर लावारीस नोंद करून पोलीसांनी चं तीला अग्नी दिला.पुढे तीचा तो यार ही सापडला.हिच्यामुळे त्यालाही 'एड्स' झाला होता.त्याच्यावरूनच त्याच्यात भांडणं व्हायची नी त्या रात्री घरातील रॉकेल तीच्या नी मुलाच्या अंगावर ओतुन आग लावुन दाराला कडी घालुन तो फरार झालेला.
पाटीलच्या करणीची शिक्षा त्याच्या बायको अन पोराने भोगली. तिने शेवटी सुटका करून घेतली  ती कायमचीचं.. अाता हि दोघं वर जाऊन पाटील ला जाब विचारत असतील " खरंचं आमचं काय चुकलं?"
*समाप्त*
लेखिका :
 प्रिती सनी कातळकर
शब्दांकन:
सतीश केदारी
 
Comment Box is loading comments...

संबंधित लेख


वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य