सादलगाव - शिक्षक ते धाडशी पत्रकार...

प्रा. सुखदेव मोटे ( शिक्षक-वाघेश्वर विद्यालय मांडवगण फराटा, ता. शिरुर) यांचे शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2016 रोजी अपघाती निधन झाले. गेली नऊ वर्षे मांडवगण फराटा येथे अध्यापकाचे काम करत असताना माझया संर्पकात आले ते शिरुर तालुका डॉट कॉमच्या विभागीय कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी. त्यांची तेव्हा प्रथमच भेट झाली.

त्यावेळी पत्रकारितेमध्ये येण्याचा मनोदय त्यांनी त्यावेळी बोलून दाखविला. मांडवगण फराटा येथे ‘लोकमत’ची जागा रिक्त होती. त्यांनी लोकमतकडे अर्ज करुन आपण काम करण्यास इच्छुक असल्याचे कळविले. ‘लोकमत’नेही त्यांची मुलाखत घेवून त्यांच्यावर मांडवगण फराटा येथील जबाबदारी सोपविली.

मोटे सरांची ख-या समाजसेवेला येथूनच सुरवात झाली. एक माध्यमिक शाळेतील चित्रकलेचे शिक्षक आणि वार्ताहर या दोन्ही जबाबदा-या पेलविताना त्यांनी घराकडे व कुटुंबियांकडे दुर्लक्ष माञ कधी केले नाही.एखांद्या विषयावर बातमी करावयाची म्हटल्यावर ते स्वतः त्या ठिकाणी पोचत होते. सविस्तर विषय ऐकुन घेतल्याशिवाय त्यांनी बातमी कधी केली नाही.

घडलेला असाच एक प्रसंग
 एका  मोठ्या गावात तेथील एका महिला सरपंचांचा अनादर प्रसंगी बातमी तयार करण्यास आम्ही दोघे एकत्र बसलो. फक्त घटना त्यांच्या डोळयासमोर घडलेली होती. प्रत्यक्ष पुरावा काहीच नव्हता. परंतु विषय मात्र बातमीसारखा होता. ऑंखो देखा हालवर बातमी तयार करुन दोघांनीही पाठविली. दुस-याच दिवशी बातमी फक्त माझीच लागली. बातमी समजताच ज्यांच्याकडुन अनादर झाला होता ती व्यक्ती आमच्या मांडवगण फराटा कार्यालयात हजर. ही व्यक्ती समाजात प्रतिष्ठित होती. त्यांचा सवाल आम्हांला पुरावे दाखवा नाहीतर अब्रु नुकसानीला तयार रहा, असा सज्जड दम आम्हा दोघांना दिला.

परंतु सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार होते आणि बातमी माझी प्रसिध्द झाली होती. मी कात्रीत सापडलो होतो. प्रसंग मोठा बाका होता. सर या विशयावर ठाम होते की, मी स्वतः तेथे उपस्थित होतो. मी या घटनेचा साक्षीदार आहे. आपणास जेथे जायचे आहे तिथे जावू शकता. बातमी दिल्यानंतरही येणा-या प्रसंगावर ठाम असणा-या सरांमुळे मी सावरलो होतो. व माझे धाडस ही मोठे झाले आणि त्या प्रसंगाला आम्ही दोघेही धिरोदात्तपणे सामोरे गेलो.

सरळ आणि सोप्या भाषेमध्ये वृत्तांकन करुन त्यांनी अनेक विषयांना वाचा फोडली. त्यांची पत्रकारिता चांगलीच बाळशे धरु लागली होती. सर्व विषयांमध्ये बातमी तयार करुन ती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असत.

कोणाच्याही लाचेला भिक न मागणारा पत्रकार, स्वाभिमानी पत्रकार, बोलका पत्रकार स्वतः भुर्दंड खावुन पत्रकारिता चालविणारा पत्रकार एक नव्हे अनेक नामावली कमी पडतील असा सच्चा मित्र आमच्यातुन निघुन गेला.

आयुष्यामध्ये कोणता क्षण शेवटचा ठरेल हे सांगता येत नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की सांगता येते ते म्हणजे त्या व्यक्तीचे नाव. ...

सुखदेव मोटे सरांनी ते कमी वेळेत शक्य केले असे मला वाटते. माझ्या या लाडक्या मित्राला संकेतस्थळ ‘शिरुर तालुका डॉट’कॉमच्या सर्व टिमच्या वतीने !! भावपुर्ण श्रध्दांजली. !!

पञकार संपत कारकुड
सादलगाव,ता.शिरुर

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही