शिरूर - सोशल मिडिया चा प्रभाव अन येणार अाता महिलाराज

शिरुर तालुक्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीची गट व गणांची नुकतीच अारक्षण सोडत जाहिर झाली.अन गेल्या अनेक दिवसांपासुनची निवडणुकिची प्रतिक्षा अखेर संपली.मिनी अामदारकी समजल्या जाणा-या जिल्हा परिषद निवडणुकिसाठी सर्वच उमेदवार शड्डु ठोकुन उभे राहिले अाहेत.त्याचप्रमाणे पंचायत समिती च्या माध्यमातुन तालुक्याच्या पटलावर येण्यासाठी अनेकजण सज्ज झाले अाहेत.

चक्राकार पद्धतीने निघालेल्या सोडतीत बहुतांश ठिकाणी महिलांनाच अारक्षण मोठ्या प्रमाणावर निघाल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेत महिलांनाच मानाच्या खुर्चिवर बसण्याचा सन्मान मिळणार अाहे.नेहमीच पदासाठी अास लावलेल्या पुरुष मंडळीची यंदाच्या निवडणुकित माञ पुरती गोची होउन बसली अाहे.वास्तविक पाहता महिलांसाठी इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावार प्रथमच संधी निर्माण झाली अाहे.

उमेदवारी चा विचार करता उमेदवारांऐवजी तिकिट देण्यासाठी नेत्यांचीच मोठी दमछाक होणार अाहे.अनेक ठिकाणी अारक्षण व सक्षम उमेदवार शोधणं सध्यातरी नेत्यांच्या मोठ्या कसरतीचे होत असुन उमेदवारांचीच मनधरणी करतानाचा चिञ अागामी काळात पहावयास मिळाल्यास
नवल न वाटो ! 

रंगतदारी लढतीची अपेक्षा
शिरुर तालुक्यातील पंचायत समितीच्या १४ गणांपैकि ७ गणांवर महिलांचं वर्चस्व असेल तर जिल्हा परिषदेच्या ७ गटांपैकि ६ गटांवर 'जिल्हा परिषद सदस्य'  म्हणुन प्रथमच महिला विराजमान होणार अाहे.उरल्या सुरल्या एका गटाची सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली असुन तुल्यबळ उमेदवार उभे ठाकणार का? त्या उमेदवाराने माघार घेतल्यास पर्यायी उमेदवार कोण असणार? त्याचप्रमाणे विद्यमान अामदारांचे सुपुञ याही निवडणुकित लढत देनार का ? अादी चर्चांना त्या गटात मोठी चर्चा रंगु लागली अाहे.पंचायत समितीच्या होना-या गणांसाठी जिल्हा परिषदेपेक्षा मोठी उत्सुकता लागली असुन संमिश्र अारक्षण अाले असल्याने बहुतांश ठिकाणी रंगतदार लढतींची अपेक्षा केली जात अाहे.

सोशल मिडिया चा करा प्रभावी वाप
कोपर्डी घटनेनंतर ते अाता  मराठा क्रांती मोर्चा त वेगळेपण दिसले ते सोशल मिडिया चे ! फेसबुक,व्हॉट्स अप च्या प्रभावी माध्यमातुन सरकारला देखिल सळो कि पळो करण्यात अाले.नेहमीच प्रत्येक कार्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडणा-या नेते व पुढा-यांना देखिल या मोर्चात सामान्यांनी अक्षरश: खडयासारखे बाजुला ठेवले.त्यामुळे गेल्या काहि दिवसांपासुन सोशल मिडियाला दुबळे समजणा-यांना या मोर्चा च्या निमित्ताने सोशल मिडिया चा प्रभाव असेल तर काय होउ शकते याचा प्रत्यय दिसुन अाला.गेल्या लोकसभेत मोदी सरकार ने सोशल मिडिया च्या अाधारे स्पेशल वॉररुम च्या साहाय्याने निवडनुक काबीज केली होती.त्यामुळे सोशल मिडिया चा वाढता  प्रभाव उमेदवारांना थेट सर्वसामान्यांपर्यंत घेउन जाणार अाहे.गेल्या पाच वर्षांत शिरुर तालुक्यात तालुक्याचे महत्त्वाचे संकेतस्थळ www.shirurtaluka.com हे निवडनुकित महत्त्वाची भुमिका बजावत अाहे.अगदी मतदारांची इत्थंबुत माहिती,प्रत्येक घटनेचे अपडेट,निवडनुक निकाल,निवडनुकिची माहिती सर्वसामान्यांपर्यंत काहि क्षणात पोहोचवत अाहे.त्यामुळे सामान्य मतदारांना खाञीशीर माहिती मिळु लागल्याने संकेतस्थळावरील माहितीसाठी नागरिक देखिल वारंवार भेटी देत असतात.त्यामुळे या हि निवडनुकित शिरुरतालुक्याचे संकेतस्थळ या हि निवडणुकितील उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध करुन देनार अाहे.मतदार देखिल सुजाण असल्याने संकेतस्थळाकडे अाशादायी नजरेने पाहतो अाहे.त्यामुळेच कि पाच वर्षानंतरहि संकेतस्थळाची विश्वासार्हता अाज हि टिकुन अाहे.

येणा-या निवडणुकांत सोशल मिडिया महत्त्वाची भुमिका बजावणार असल्याने उमेदवार देखिल अातापासुनच सोशल मिडियावर सक्रिय झाले असुन सोशल मिडिया काबीज करण्यासाठी सज्ज झाले अाहेत.

शिरुर तालुक्यातील पंचायत समितीचे गण व गणांमधील गावे पुढिलप्रमाणे :
१)वडगाव रासाई : नागरगाव,कुरुळी,कोळगांव डोळस, अांधळगाव डोळस, निर्वी,शिरसगाव काटा, वडगाव रासाई,पिंपळसुटी

२)मांडवगण फराटा : मांडवगण फराटा, ईनामगाव,तांदळी, गणेगाव दुमाला,बाभुळसर बु.,सादलगाव

)रांजणगाव सांडस : निमगाव म्हाळुंगी, रांजणगाव सांडस, उरळगाव, अालेगाव पागा,दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी,भांबार्डे, करंजावणे,अारणगाव

)न्हावरा : न्हावरे,अांबळे, करडे, गुनाट, शिंदोडी, चिंचणी,कळवंतवाडी,

५)तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे, टाकळी भिमा, धानोरे, विठठ्लवाडी,दरेकरवाडी

६)कारेगांव : वरुडे, वाघाळे, कारेगाव, सोनेसांगवी, ढोकसांगवी, निमगाव भोगी, मोराची चिंचोली, कान्हुरमेसाई,

७)रांजणगाव गणपती : बुरुंजवाडी, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला,गणेगाव खालसा, खंडाळे, बाभुळसर खुर्द,कोंढापुरी, पिंपळे खालसा,

८)शिरुर ग्रामीण : गोलेगाव, चव्हाणवाडी, निमोणे, अण्णापुर, सरदवाडी, तर्डोबाची वाडी, कर्डेलवाडी, मोटेवाडी,

९)शिक्रापुर : शिक्रापुर राउतवाडी,कासारी

१०)सणसवाडी : कोरेगाव भिमा, वाडा पुनर्वसन, सणसवाडी

११) केंदुर : केंदुर, पिंपळे जगताप, वाजेवाडी, अापटी, वढु बुद्रुक, करंदी

१२) पाबळ : पाबळ, खैरेनगर, खैरेवाडी, धामारी, मुखई,जातेगाव, हिवरे जातेगाव,

१३) कवठे येमाई : कवठे येमाई, संविदने, रावडेवाड़ी, मिडगुलवाड़ी, अामदाबाद, मलठण, निमगांव दुडे,

१४) टाकळी हाजी :टाकळी हाजी, काठापुर, पिंपरखेड, जांबुत, चांडोह, फाकटे, वडनेर

जिल्हा परिषदेचे गट व गटांतील समाविष्ट गावे पुढिलप्रमाणे :
१)वडगाव रासाई- मांडवगण फराटा : नागरगाव,कुरुळी,कोळगांव डोळस, अांधळगाव डोळस, निर्वी,शिरसगाव काटा, वडगाव रासाई, मांडवगण   फराटा, ईनामगाव,तांदळी, गणेगाव दुमाला,बाभुळसर बु.,सादलगाव

२)तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस :तळेगाव ढमढेरे, टाकळी भिमा, धानोरे, विठठ्लवाडी, निमगाव म्हाळुंगी, रांजणगाव सांडस, उरळगाव, अालेगाव    पागा,दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी,भांबार्डे, करंजावणे,

३)न्हावरा- शिरुर ग्रामीण : गोलेगाव, चव्हाणवाडी, निमोणे, अण्णापुर, सरदवाडी, तर्डोबाची वाडी, कर्डेलवाडी, मोटेवाडी,न्हावरे,अांबळे, करडे, गुनाट,    शिंदोडी, चिंचणी,कळवंतवाडी

४)कारेगाव-रांजणगाव गणपती : वरुडे, वाघाळे, कारेगाव, सोनेसांगवी, ढोकसांगवी, निमगाव भोगी, मोराची चिंचोली, कान्हुरमेसाई, बुरुंजवाडी,    रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला,गणेगाव खालसा, खंडाळे, बाभुळसर खुर्द,कोंढापुरी, पिंपळे खालसा

५)पाबळ-केंदुर : पाबळ, खैरेनगर, खैरेवाडी, धामारी, मुखई,जातेगाव, हिवरे जातेगाव,केंदुर, पिंपळे जगताप, वाजेवाडी, अापटी, वढु बुद्रुक, करंदी

६)शिक्रापुर-सणसवाडी : शिक्रापुर, राउतवाडी,कासारी,कोरेगाव भिमा, वाडा पुनर्वसन, सणसवाडी

७)टाकळी हाजी-कवठे येमाई : टाकळी हाजी, काठापुर, पिंपरखेड, जांबुत, चांडोह, फाकटे, वडनेर,कवठे येमाई, संविदने, रावडेवाड़ी, मिडगुलवाड़ी,
  अामदाबाद, मलठण, निमगांव दुडे,

हि संधी पुन्हा नाही...
अाम्हीे उमेदवारांना अावाहन करतो कि, अल्पदरात अापल्या कार्याची माहिती थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहचवु.निवडणुकिपुर्वी पासुन ते निवडणुक होइपर्यंत तुमच्या प्रत्येक कामाची दखल घेऊ.या माध्यमातुन अल्पावधीत प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची मोठी संधी देत अाहोत .त्यामुळे शिरुर तालुक्यातील निवडनुकिच्या प्रत्येक अपडेटसाठी व तुमची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातुन थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अाजच संपर्क साधा व रहा निश्चिंत :
सतीश केदारी : ८८०५०४५४९५
इमेल : shirurtaluka@gmail.com
       kedarisatish546@gmail.com

संबंधित लेख

  • 1