सादलगाव - असा गांव.. अशी माणसं...(संपत कारकूड)

गेली अनेक वर्षांपासुन ग्रामीण भागातील गरीब माणुस ते श्रीमंत व्यक्तींपर्यंत वेगवेगळया बातम्या करताना सवांद साधण्याचा प्रसंग आला. वार्ताहर म्हंटल तर राजकारण बाजुला ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तरी नाही म्हणता कोणीतरी आपल्या विचाराचे भेटले रे भेटले की त्यांच्या प्रामाणिक कामासाठी सहकार्याची भावना ठेवून सहकार्य केले असता अशाच कामांमध्ये नको ते राजकारण आडवे आले. गावामधील कोणत्याही घटनेची बातमी केली की, त्यामध्ये राजकारण येणार नाही, अशी शाश्वती सध्यातरी देता येणार नाही.

 ‘माझा गाव सुधारला तर माझा देश सुधारेल’ या उक्तीप्रमाणे गावातुनच काही महत्वाच्या घडामोडीचे वार्तांकन करुन प्रथम गाव तरी नीट करावा अशी मनाशी खुणगाठ बांधली. गावच्या गेली चाळीस वर्शांपासुनच्या वास्तव्यामध्ये गावामधील काही समस्या आजही जशाच्यातशा आहेत. ‘गावच्या राजकारणातून सामान्यांचा विकास हरविलेला’ असताना तो शोधून त्याचे वास्तव्य दाखविताना मात्र खुप रोषाला समोरे जावे लागले. खरे बोलले तर सख्या आईलाही राग येतो, याची प्रचितीही मला पदोपदी आली. गावातील दबलेल्या आणि दाबलेल्या घडामोडी जेव्हा माझ्या बातमीद्वारे बाहेर येवू लागल्या तेव्हा मात्र स्वतःला सुज्ञ आणि सुजाण नागरिक समजणा-यांची मोठी पंचाईत झाली.

 गेली चार दशकात कोणी साधा जबाबही विचारला नाही? की काय झाले गावच्या विकासाचे? मात्र जन्मभुमीच्या कर्तव्यातुनच जागृत झालेली नैतिक भावना कोणत्याही विरोधाला न जुमानता गावचा विकासासाठी आपले योगदान देण्यास तयार झाली. यातून  विकासासाठी वेळप्रसंगी उठाव आणि चळवळ करावयाचे मनस्वी ठरविले. गाव आणि सामान्य नागरिक विकासाचा केंद्रबिंदु ठरवून त्यादृष्टीने सध्यातरी योग्य पावले पडत असताना माणसा-माणसात एकोपा राहिला नाही, तर विकास कसा करायाचा? विकासाला आडव्या येणा-या विघ्नसंतोषींचा मुकाबला करुनच काम करावे लागत असल्यामुळे समाज कसा वागतो, याचे चांगले दर्षण झाले. गावचे सार्वजनिक काम करताना पोलिस प्रशासन ते सामान्य प्रशासन ग्रामपंचायतीशी काम करताना कसे संबंध ठेवते. जो तो खुर्चीवर बसल्यानंतर स्वतःला भगवान समजून काम करतो. आपण जनतेचा सेवक आहे, ही भावना आजही सरकारी कर्मचा-यांमध्ये नाही. हीच तर मोठी गोची आहे.


गावचे सरकारी काम शासनाकडे करतेवेळी आपण फार मोठे काही तरी करतो आहे, माझ्या शिवाय गाव काय, पण देशही चालु शकत नाही, अशी काय भावना शासकीय कर्मचा-यांच्या मनात रुजली आहे. याचा अनुभव मला एका सार्वजनिक जागेचा निवाडा शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षकांकडे घेवून गेलो असता आला. तो एका बातमीद्वारे प्रसिध्द केला. परंतु गावातीलच काहींना मात्र तो रुचला नाही. यावरच प्रतिबातमी करुन पोलिस निरिक्षकच कसे कर्तव्यनिष्ठ आहेत, हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. गाव तसे चांगले पण.... वेषीला टांगल्याचा अनुभव मी रोजच्या बातमीमध्ये घेत असतो. गावचे अतिक्रमण तर फारच कळीचा मुद्दा होऊन बसला आहे. संपुर्ण गाव अतिक्रमणामध्ये असल्यामुळे उठ कोणाला म्हणावे? अशी भावना सरपंचासह सदस्यांना पडल्यामुळे झालेले अतिक्रमण आता गळयापर्यंत आल्यामुळे नाइलाज झाला. गावामध्ये जे काय शिल्लक गायरान राहिले होते ते मोकळे करण्याचे ठरावाद्वारे ठरले. गावच्या जुन्या हागणदा-या, नदीचे रस्ते, नाले सुशोभिकरण करण्यासाठी अडथळा ठरणा-या काटेरी बाभुळी काढुन जवळपास 10 एकर जागा मोकळी केली. सार्वजनिक प्रयोजनासाठी मोकळया झालेल्या जागेवर पुन्हा ग्रामस्थांनी भुखंड दान केल्यासारखे काटेरी झुडपे टाकुन जागा अडविल्या. गावची शोकांतिका.

जे वळण गेली अनेक वर्शांपासुन लागले त्यामध्ये काही बदल होईना. सत्ता कोणती येवू. परंतु ग्रामस्थांनी काही केल्या गायरान बळकविण्याचे प्रकार थांबविले नाही. गावामध्ये रस्त्यांची तर फारच वाट लागली आहे. रस्त्यावर ‘उकिरडयाचे गाव’ म्हणुन सादलगाव म्हणावे लागेल. गावठाण आणि गायरानामध्ये वाटेल तसे उकिरडे केले असून याचा सामान्यांना त्रास होत आहे, याची साधी जाणीवसुध्दा होत नाही. काय म्हणावे याला. समाज प्रबोध करुन झाले, गावामध्ये अखंड हरिनामाचे 40 वर्शे यावर्शी पुर्ण होत आहे.


एका सप्ताहात सात किर्तने म्हणजे 40 वर्शात 280 किर्तन ऐकूनही समाज सुधाराला नाही तर दोष कुणाला द्यायचा?.. समाज बदलो अथवा न बदलो मला माझा समाज बदलण्याचा ध्यास व माझे प्रयत्न कायम ठेवावयचे आहेत.
संपत करकुड
सादलगांव

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही