शिरसगाव काटा - वंचित मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी जगावेगळी माणसं

वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणुन दिशा देणा-या तसेच समाजात अागळंवेगळं कार्य करत असलेल्या महेश निंबाळकर,नितेश बनसोडे, दिपककाका  नागरगोजे,दिक्षा दिंडे, राणीताई चोरे, अादी सर्जनशील व्यक्तिंच्या कार्याचा लेखाद्वारे कार्यकारी संपादक सतीश केदारी यांनी बालदिनानिमित्त केलेला अल्पसा परिचय या लेखातुन प्रत्येकाने अावर्जुन वाचाच...

गेली काहि वर्षात पञकारिता करत असताना, करिअर म्हणजे नेमकं काय? याच प्रश्नाचं कोडं अलिकडे काहि दिवस माझ्या मनाला पडलेलं होतं.त्याचं कारण हि तसचं होतं.समाजकार्याची ओढ हि जन्मजात परंतु पञकारितेत अाल्यानंतर डोक्यात माञ भलतीच हवा शिरली अन अवास्तव अपेक्षा घेउन जगत होतो.दरम्यान मध्यंतरी च्या काळात सामाजिक क्षेञात काम करणा-या मंडळीशी थेट संपर्क अाला अन डोक्यात शिरलेली हवा अन जडलेला अहंकार कुठंच्या कुठं गळुन पडला.त्यातील काहि असामान्य कार्य करणा-या व वंचित मुलांसाठी अायुष्य वेचुन काम करणा-या मंडळींचा हा अल्पसा परिचय.

महेशदादा निंबाळकर. हा मुळचा बार्शी चा तरुण.शिक्षकाची नोकरी लागल्यानंतर तिचा राजीनामा देउन पारधी समाजातील शाळाबाह्य मुलांना एकञित करुन पालावरची शाळा लोकांच्या सहकार्याने स्नेहग्राम हि संस्था चालवितो.कोणतंहि मुल शिक्षणापासुन वंचित राहु नये,उपाशी पोटी झोपु नये म्हणुन जिद्दीने परिस्थितीशी लढा देत फक्त पालातील विद्यार्थ्यांसाठीच कार्य करत नसुन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी देखिल मोठे प्रयत्न करत असतो. पालातील लोकांना ज्यांना रेशनकाार्ड कसलं असतं ते माहित नसताना,घरात अन्नाचा कण नाही याची जान ठेवत उपाशी मुल राहु  नये यासाठी समाजातील लोकांशी व प्रशासनाशी लढा देत पालातील मजुरांनाच नव्हे तर वेश्या व्यवसाय करणा-या महिलांना देखिल रेशनकार्ड मिळविण्यासाठी केलेला अाटापिटा याची माहिती थेट महेशदादांकडुनच ऐकलेली बरी.

दुसरे अाहेत ते नितेशदादा बनसोडे. हे अापुलिची सावली या त्यांच्या ब्रिदवाक्याप्रमाणे निराधार,अाईवडील नसलेली मुलं, रस्त्यावर भटकणारी व कौंटुंबिक सुखाला पारखी झालेली  अशा मुलांसाठी नगरमध्ये गेल्या १५ वर्षांपासुन काम करत अाहेत.अाता नुकतेच लोणिकंद, पुणे येथे अशा मुलांसाठी पसायदान हि संस्था सुरु केली अाहे.तर पुणे जिल्हयातील शिरुर मध्ये देखिल वंचित मुलांसाठी प्रकल्प उभा करु पाहत अाहेत.

ब-याच दिवसांपासुन एका  व्यक्तीविषयी नेहमी अाकर्षण वाटायचे ते म्हणजे दिपक काका नागरगोजे.मुळचे मराठवाड्यातील बीड जिल्हयातील अार्वी(ता.शिरुर कासार) येथील.त्यांच्या सहचारिणी कावेरीताई व दिपककाका यांनी २००१ ला सुमारे २९ उसतोड कामगारांची,चार उपेक्षित महिला व २२ अनाथ मुले यांच्यासाठी शांतिवन हि संस्था सुरु केली.परंतु त्यांना प्रेरणा व पाठबळ माञ कावेरीताईंचेच.समाजातील निराधार,वंचित,उसतोड कामगारांची,वेश्या व्यवसाय करणारांची, तमाशात काम करणा-या स्ञियांची मुले शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हनुन तळमळ असणारे दांपत्य अाज हजारो मुलांना शिक्षण देत असुन उच्चशिक्षणासाठी देखिल नेहमी अाग्रही असतात.

लहाणपासुन ज्या समाजात मोठा होत होतो.त्याच काळात विशेष मुलांचं जीवन मी लहानपणासुन अनुभवत होतो.विशेषत: मुलगी असेल तर त्या कुटुंबाची मानसिकता,त्या पाल्याची जडणघडन हि जवळुन अभ्यासली असताना ओळख झाली ती माझ्या ताईची.राणीताई चोरे यांना स्वत: च्या दोन्ही मुली विशेष मतिमंद असल्याने समाजातील अशी मुले शिक्षणासाठी वंचितच राहु नये,असामान्य विशेष मुलांच्या गरजा ओळखुन त्यांना सोप्या पद्धतीने दैनंदिन कौशल्य देणे,किमान त्यांना व्यवस्थित जगता यावे,शिक्षण घेता यावे यासाठी प्रयत्नशील असुन  अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनच्या माध्यमातुन कार्य करत असुन अाज सुमारे १६ विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत.भविष्यात केवळ डे-केअर सेंटर न राहता निवासी प्रकल्प तसेच सोबतीला वृद्धाश्रम सुरु करण्याचा देखिल मानस असल्याचे ते सांगतात.छोटया छोट्या गोष्टीतुन या विशेष मुलांना अानंद देण्याचे काम या संस्थेत पहायला मिळते.

राणीताई हि केवळ बहिणचं नाही तर ती विशेष मुलांची अाई अाहे हे जेव्हा कळलं अगदी त्याच क्षणापासुन मला अशा मुलांसाठी काम करण्याचं ठरवलं होतं.त्यामुळे तेव्हा पासुन ते अाजतागायत संस्थेत काम करण्याची मला संधी मिळत अाहे.या विशेष मुलांसोबत काम करतानाचा  अानंद हा वेगळाच.त्यातुन जगण्याची प्रेरणा मिळते.सुख अाणि दु:ख म्हणजे काय ? हे या ठिकाणीच अाल्यावर  कळते.


गेल्या महिन्यात पुण्यात 'संवाद कट्टा' या सामाजिक कार्य करणा-या व्यक्तिंसाठी अायोजित कार्यक्रमास जाण्याचा योग अाला.त्या वेळी
सायली धनाबाई व दिक्षा दिंडे या असामान्य परंतु जिद्दी भगिनींच्या कार्याची ओळख झाली.
दिक्षाताई हि जन्मजात अपंग असुन अपंगत्वार मात करत नेहमीच समाजासाठी प्रयत्नशील असते. रोशनी संस्था व अजित फौंडेशन च्या माध्यमातुन वंचित, भटक्या,५ ते १५ वयोगटातल्या रस्त्यावर खेळणी, फुले विकणा-या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणण्यासाठी प्रयत्नशील असुन नुकतंच ७ नोव्हेंबर ला डेक्कन ला दिक्षाताई ने झेड ब्रीज जवळ अशा मुलांसाठी शाळा सुरु केली अाहे. स्वत:ला  ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्या समस्या इतरांच्या वाट्याला येउ नये म्हणुन दिक्षा हि कार्य करत अाहे.मार्च २०१६ मध्ये दिक्षाताई हि वर्ड अार्ट स्कुल या उपक्रमाची भारतीय शिक्षण राजदुत बनली असुन याच महिन्यात नोव्हेंबर मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे शिक्षण परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे.

अशाच पद्धतीने तरुण मुलांसाठी व महिलांसाठी काम करणा-या सायली ताईंचे विचार अनुभवयास मिळाले. नावासोबत अाडनाव न लावता अाइ  धनाबाई चे नाव जोडते .संवाद कट्ट्यात  या विषयी छेडले असता अाई  चे श्रम मोठे असल्याचे अभिमानाने सांगते.सायली ताई देखिल विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्याचे काम करत असुन महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते. त्याचबरोबर समाज कार्याचा ख-या अर्थाने अर्थ समजावुन सांगणारे गणेश सातव व सत्तार शेख अादींच्या सहवासात चांगल्या व्यक्तींशी भेट घडल्याने मनातील माञ करिअर म्हणजे नेमकं काय ? या सर्वच प्रश्नाविषयीची उत्तरे अापोअाप मिळत गेली.

या बालदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वंचित मुलांच्या जीवनात अशा व्यक्तींच्या माध्यमातुन अाशेचा प्रकाश निर्माण होत असुन समाजातील सर्जनशील व्यक्तींना एकच अावाहन करावेसे वाटत असुन एकहि मुल शिक्षणापासुन वंचित राहु नये यासाठी सर्वांनी असामान्य काम करणा-या संस्थांना साथ देउयात... या व्यक्तींना मदतीचा एक हात देउयात....वंचितांचे अायुष्य फुलवुयात...!
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1