शिरूर - या पंखांवरती, मी नभ पांघरती...

ती करारी..कणखर..अल्लड..अवखळ तरीही कायम मनातुन गोंधळलेली ती..अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत बसणारी ती.. इतरांना नेहमीच प्रेरणा देणारी..कोण होती ती ? होय तीच ती स्मिता पाटील.स्मिताच्या निधनानंतर सुमारे ३० वर्षांनंतर अाजदेखिल रसिकांच्या मनावर स्मिताचे गारुड कायम  अाहे...

गेल्या अाठवड्यात सोशल मिडिया वरील फेसबुक,व्हॉट्सअप वर श्रद्धांजली अर्पण करत अनेकांनी स्मिता च्या अाठवणी पुन्हा एकदा जागा केल्या अन पुन्हा स्मिता च्या अायुष्यावर थोडंसं लिहावेसे वाटले.

17 ऑक्‍टोंबर 1955 ला पुण्यात जन्मलेली ती अन 13 डिसेंबर 1986 ला मुंबईत तिचा शेवट झाला.या मिळालेल्या ३१ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दित तमाम रसिकांच्या काळजावर घर करुन गेली.ती होतीच तशी.स्मिता पाटील  एक मराठी मुलगी.दुरदर्शनवर वृत्तनिवेदिकेच्या भुमिकेपासुनच तिची सुरुवात झालेली.पुढे अभिनय क्षेञातच ख-या अर्थाने करिअर सुरु झाले अन परत मागे वळली नाही.मराठी चिञपटसृष्टीत जैत रे जैत, उंबरठा,सर्वसाक्षी,सामना या दर्जेदार मराठी चिञपटांबरोबर  आखिर क्‍यों, अमृत, नझराना,निशांत, मंथन, भूमिका, गमन, आक्रोश, चक्र, अर्थ, अर्धसत्य, मंडी, सुबह, मिर्च मसाला या हिंदी चिञपटात वेगळीच अभिनयाची छाप उमटवली.

अाजच्या ग्लॅमर च्या चंदेरी सोनेरी दुनियेत कित्येक नवनवीन तारे येतात.काळानुरुप रसिक देखिल त्या चेह-याला विसरुन जातात.परंतु स्मिता  होतीच विलक्षन.तिच्या अाखिर क्यों मधील राजेश खन्नांबरोबर 'दुश्मन ना करे' या गाण्याने अन भुमिकेने तर समस्त तरुणाईला अाजही भुरळ घातली अाहे.त्या चिञपटातील स्मिताची भुमिका वास्तविकतेची असल्याचा अनेकदा भास होतो.तर भरपावसात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर भिजत 'आज रपट जाये तो हमे ना उठई यो' हे गाणे अाठवले कि क्षणभर मोहरुन न गेले तर नवलच !

प्रसिद्धीच्या झोतात कायम वावरत असलेली ती माञ नेहमी गोंधळुन गेलेली असायची.सर्वसाधारण चेहरा होता पण त्या चेह-यामागचं गुढ हे कायम गुढच होतं.'सगळ्यात असून देखिल कायम नसल्यासारखा वाटावा असाच तिचा कायम वावर असायचा. अतिशय निर्विकारपणे एखादा योगी संसारात वावरावा तशीच भासायची ती कायम.त्या गुढ चेह-यात कायम खुप काहि दडलयं असेच पाहणा-याला वाटे.परंतु याच चेह-याने अनेकांना अाजही मोहिनी घातली अाहे. अाजही अनेकांच्या फेसबुक अन व्हॉटसअप वर तिचा फोटो ठेवलेला अाढळतो.

वास्तविक जीवनात तिची बंडखोर वृत्ती तिच्या कामातूनही व्यक्त झालीच पण दुर्दैव असं की तिच्या बोल्डपणाची चर्चा प्रमाणापेक्षा जास्त झाली. राज बब्बरशी लग्न झाल्यावर ती त्याला म्हणायची "आपलं लग्न तर झालं, पण मी तुझी फार काळ साथ नाही देऊ शकणार." अाणि झालंही तसंच. प्रतिकच्या जन्मानंतर १३ अवघ्या काही दिवसांनी, १३ डिसेंबर १९८६ ला स्मिताचं अपघाताने निधन झाले.ती निघुन गेली कायमचीच पडद्याअाड अनेक प्रश्न ठेवुन.अभिनयाबरोबर डायरी लिखानाचा देखिल छंद असलेली स्मिता  चंदेरी दुनियेत केवळ १० वर्षांच्या काळात राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त करत जाताना एक गुढ अन वलय कायमचीच ठेवुन गेली.


एक माञ नक्की अंगी विशेष कला असेल तर जाण्यानंतर देखिल वर्षानुवर्षे जगाच्या पाठीवर अन रसिकांच्या ह्रद्यावर अनभिषिक्तपणे राज्य करता येते हेच खरे...
-सतीश केदारी

संबंधित लेख

  • 1