मांडवगण फराटा - निवडणुकितील ‘व्हाॅटस्अप’चे वार्ताहार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची निवडणुक ख-या अर्थाने जास्त प्रभावित झाली असेल तर ती ‘व्हाॅटस्अप’च्या प्रचाराने असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

नुकतीच पार पडलेली निवडणुक‘डिजिटल निवडणुक’ म्हणावी लागेल. कारण या निवडणुकीमध्ये सुरवातीपासुनच मोठया प्रमाणावर ‘व्हाॅटेस्अप’द्वारे सर्व उमेदवारांनी आपला प्रचार जोरात केला. तालुक्यातील एकही उमेदवार असा सापडणार नाही की, त्याने या माध्यमाचा वापर केला नाही. प्रत्येक राजकीय व्यक्तींने आपल्या अनुयामार्फत आपली माहिती पोचविण्याचे काम ‘व्हाॅटस्अप’च्या माध्यमांतून घराघरांपर्यंत पोचविले. अाचारसंहितेमध्ये ‘व्हाॅटस्अपवर’ही लक्ष ठेवणार असे म्हंटले होते परंतु त्याचे फारसे गांभीर्य कोणी घेतले नाही. मुळातच या माध्यामांवरही बंधन लादणे हे न पटणारे म्हणुन की काय सर्वच कार्यकर्त्यांनी आपला स्वैर ‘घोडा दामटुन’ प्रचार केलाच.

अर्थात आपली चांगली ओळख करुन देवून मत मागणे, मीच कसा सरस आहे, निवडून आल्यावर भविश्यात कोणती कामे करणार, तसेच काही खोचक टिपा -टिपणीचाही वापर करण्यातआला. आणि या सर्व कमेंटस् ग्रुपमधील समर्थकांनी ‘काॅपी पेस्ट’ करुन प्रसारित केल्या. हल्ली ‘काॅपी पेस्ट’मुळे माहिती तत्काळ इतरांना उपलब्ध होवू शकते.

त्यामुळे ब्रेकिंगसाठी आता फार काळ प्रतिक्षा करावी लागत नाही. काही क्षणांत तालुक्यातील एका कोप-यातील घडलेली घडना तालुकाभर काही क्षणांत पोचते. इतके जलद माध्यम सध्या नागरिकांच्या हाती आले असल्यामुळे या माध्यमांचा सगळीकडे खुबीने वापर होत असल्याचे दिसून येते. लग्नकार्य, वाढदिवस, वास्तुशांती, दशक्रिया, सभा इतर कोणतेही कार्यक्रम असुद्या अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्या सर्व पै-पाहुण्यांना, मित्रांना ताजीमाहिती पाठविण्यासाठी अत्यंत म्हत्वाची भुमिका ‘व्हाॅटस्अप’ सध्या बजावत आहे. माहिती आल्यानंतर तत्काळ एखांद्या तरी ग्रुपला ‘काॅपी पेस्ट’ करुन पाठविल्यामुळे सगळेच आता ‘वार्ताहार’ची भुमिका बजावित असल्याचे चित्र आहे.

-संपत कारकुड
सादलगांव

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही