गुनाट - अाम्ही साविञीच्या लेकी(धनश्री अासवले)

आज महिला दिन.माझ्या सगळ्या भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. खरं तर आज स्रीशक्तीचा खरा सन्मान करायचा दिवस आहे.त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा दिवस आहे.

आज महिला प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत.आपल्या कार्याने आणि कर्तत्वाने पुढे जात आहेत.पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती आज यशाच शिखर गाठत आहे.2500 वर्षापूर्वी चाणक्यांनी सांगितलं होत की स्री ही दैवी शक्तीपेक्षाही जास्त शक्तीशाली आहे आणि पुरुषापेक्षाही जास्त कष्ट करणारी आहे.जे 2500 वर्षापूर्वी चाणक्यांनी मान्य केलं तेच आजही समाज मान्य करत नाही. आज महिलांनी गगनभरारी घेतलीय हे जरी खरं असलं तरी आजही कित्येक महिलांना त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. आजही कित्येक महिलांना पुरुषांप्रमाने वागणूक दिली जात नाही आणि महत्वाचे म्हणजे भारत सक्षम होऊन सुद्धा महिलांची अन्यायापासून सुटका झालेली नाही.

सध्या महिलासाठी 50% आरक्षण आहे.अनेक हक्कही दिलेत परंतु याच समाजातील लोक त्यांना त्यांच्या हक्कांपासून, आरक्षणांपासून दूर ठेवत आहे.मग तुम्हीच सांगा 50% आरक्षणाचा काय फायदा ? असा प्रश्न उभा राहतो.सावित्रीबाईंनी अन्याय,कष्ट सहन करून मुलींसाठी शाळा चालू केली आणि त्याच सावित्रीला पाठिंबा देणारे ज्योतिबा फुले या दोघांचेही उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही.परंतु आज स्री शिक्षणाला पाठिंबा देणारे अनेक ज्योतिबा निर्माण होण्याची नितांत गरज आहे.

जागतिक महिला दिन मानाने साजरा करणार्या याच भारतात आज महिला सुरक्षित आहेत का? हा अत्यंत गंभिर प्रश्न आहे आणि त्यांच्या असुरक्षिततेला जबाबदारही हाच समाज आहे.मी तर म्हणेन की, 50% आरक्षण देऊन काय होतं, आता खरी गरज तर संरक्षणाची आहे.

हो, महिलांनी गगनभरारी घेतली आहे हे जरी खर असलं तरी आज कित्येकींना घराचा उंबराही ओलांडायची मुभा नाही. प्रत्येक महिला ही गगनभरारी घेऊ शकते फक्त तिला आधार आणि पाठिंबा द्या. मग पहा ती एवढं मोठं यशाच शिखर गाठेल की वर्णन करायला शब्दही कमी पडतील.
महिलांनाफक्त 'आधारच' नका देऊ
        थोडी चालायला 'वाटही' द्या,
पेटून उठेल ती आपोआपच
फक्त पाठीवर 'आधाराची' थाप द्या..!

खरं ज्या दिवशी महिला 100%  सुरक्षित होतील, ज्या दिवशी अन्याय, अत्याचार मुळासकट उपटून फेकला जाईल तोच दिवस आंम्हा महिलांसाठी खरा जागतिक महिला दिन होईल.

     (धनश्री भिवाजी आसवले..
   मु.पो-गुनाट, ता-शिरूर, जि-पुणे
  मो.नं-9172389548
Email-dhanashriasavale10@gmail. com )
 

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही