शिरूर - सोशल मिडियाचं 'वास्तव अन विस्तव'

फेसबुक लाइव्ह वर असताना स्वत:च्या मुलीची हत्या करुन स्वत: ही संपवले जीवन...सोशल मिडिया मुळे झाली अाई अन मुलीची भेट...
या दोन अत्यंत वेगवेगळ्या घटना नुकत्याच वाचनात अालेल्या...दिवसेंदिवस अशा घडणा-या घटनांमुळे या समाजमाध्यमांचं 'वास्तव अन विस्तव' देखिल समोर येत अाहे.


सोशल मिडिया हे सध्या संवादाचे प्रभावी माध्यम म्हणुन संबोधले जाते.काहि वर्षांपुर्वी संवादाची साधने फारशी उपलब्ध होत नव्हती तेव्हा माञ बोटावर मोजता येतील इतकेच दुरध्वनी असायचे.गावां-गावांमध्ये अडचणीच्या वेळी भ्रमनध्वनी नसल्याने थेट दुचाकी अथवा बैलगाडीने प्रवास करत निरोप पोहोचवला जाई. हळहळु यात ही बदल होत गेले अन गावोगावी पीसीओ बुथ दिसु लागले.दुरचे नातेवाईक असो,विवाहित मुलगी असो कि दुर शिकणारा मुलगा  असो यांच्याशी बोलायला पीसीओ बुथवर सायंकाळी थोरा-मोठ्यांच्या लांबच्या लांब रांगाच लागलेल्या असायच्या.त्या वेळी माञ रुपयाची अन वेळेच्या किंमतीचे मोल फक्त बोलणाराच जाणे.काहि दिवसांनंतर गावाकडील हेही चिञ बदलत गेले अन पीसीओ बुथ गायब झाले.त्यांची जागा भ्रमणध्वनींनी घेतली.किमान सर्वसाधारण परीस्थिती असणारे गावचे पुढारी, शिक्षक, व्यापारी, बडे जमीनदार यांच्याच हातात फोन दिसायला लागले. तेव्हा माञ त्यांचा फोनसोबत गांवभर होत असलेला रुबाब वेगळाच.त्या नंतर माञ परिस्थितीत ब-यापैकी फरक पडुन अनेकांच्या हातात फोन दिसु लागले.त्यानंतर झपाट्याने झालेल्या मोबाईल क्रांती ने शहरी भागासह ग्रामीण भागात देखिल अमुलाग्र बदल घडुन अाला.स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ, साठ सत्तर च्या दशकात दूरदर्शन, ऐंशीच्या दशकात संगणक, नव्वदच्या दशकात केबल नेटवर्क, मोबाईल आणि एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग अशी विविध माध्यमे माणसांच्या हातात आली. तंत्रज्ञान क्षेत्रात झालेले हे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात आमूलाग्र अश्या पद्धतीचेच आहेत. 1991 ला भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यांनतर संपूर्ण जग हीच भारतासाठी एक बाजारपेठ निर्माण झाली. तशी आज या सर्व सोशल मीडियाच्या प्रगतीने संपूर्ण जग हे तुमच्या एका क्लीक वर संपर्कात आले आहे. आज शेतीपासून उद्योगधंद्यापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, विज्ञापासून शिक्षणापर्यंत सगळीच क्षेत्रे सोशल मीडियाच्या कल्पनाविष्काराने बहरली आहेत. तरुणाईसह इतर वर्गाची सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. या तरुणाईला सोशल मीडिया च्या माध्यमातून वैचारिक आणि तांत्रिक पाया असणारा तत्वांचा एक गट आहे.लाईफटाइम रिचार्ज साठी कधी काळी ९९९ चे मारावे लागणारे रिचार्ज अवघ्या ९९ रुपयांत होउ लागल्याने घर तिथं मोबाईल दिसु लागले अन जोरा-जोरात वाजणारे मोबाईल वाजु लागले.सध्या अपवाद वगळता ग्रामीण भागात २जी,३जी सह अाता ४ जी फोन प्रत्येकाच्या खिशात दिसु लागले असुन फेसबुक अन व्हॉट्स अप वर तासनंतास चॅटिंग करणारे चिञ पहायला मिळते.

फेसबुक हे जगभर वापरले जाणारे सर्वात मोठे समाजमाध्यम.व्हॉट्स अप चा प्रसार होण्यापुर्वी तरुणाई सगळ्यात जास्त वापर ही फेसबुकचाच करत असे.लग्न असो कि कोणताही अानंदाचा क्षण फोटो काढायचा अन फेसबुक वर टाकायचा व त्यातुन अनेकांना चांगल्या अन वाईट घटना कळत असायच्या.या भन्नाट माध्यमामुळे अगदी देशात असो कि परदेशात न बोलता संवाद झाला कि खुप समाधान मिळे.त्यातुनच दुर गेलेले मिञ भेटले.ओळखी होत गेल्या.त्यामुळेच सोशल मिडिया हा अनेकांना जवळचा मिञच वाटु लागलाय.

अलिकडे सगळ्यांना भलताच अाल्हाददायक वाटणारा सेल्फी चा झालेला जन्म माञ ञासदायक ठरलेला दिसतो.अानंदाच्या क्षणी कोठेही एकटे असो वा ग्रुप ने सेल्फी न काढणारी तरुणाई विरळीच.परंतु सेल्फी च्या नादापायी कित्येकांना अायुष्याला मुकावे लागले असल्याची उदाहरणे सर्वांनाच ज्ञात अाहे.फेसबुक मुळे अनेकांना अार्थिक मदत झाल्याची देखिल उदाहरणे असली तरी महिलांसाठी माञ फेसबुक हे डोकेदुखीच ठरत अाहे.फेसबुक ला जोडणा-या प्रत्येक महिलेला इनबॉक्सात विकृतांकडुन ञास न झालाय याचं उदाहरण मिळणं दुर्मिळचं. गुड नाइट,जेवल्या का,कुठे राहता याही पलिकडुन फेसबुक च्या फोटोचा केलेला गैरवापर यामुळं स्क्रिनशॉट काढुन वॉल वर जाहिर प्रदर्शन केल्याचे अनेकदा पहायला मिळत अाहे.

सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे, ग्रामीण भागात  मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. क्षणाक्षणाला आपल्या भोवतालच्या घटना वेगवेगळी मोबाईल वरून काढलेली आणि मोबाईल वर शेअर केलेली छायाचित्रे,वैयक्तिक माहिती,अशी इत्यंभूत माहिती ग्रामीण भागातही फेसबुक, व्हॉट्स अप ,ट्वीटर आदी. सारख्या सोशल नेटवर्किंग वर हजारो –लाखो युवक मंडळी अपडेट करताना सर्रास  दिसत आहेत.त्यामुळेच इंटरनेट ही अन्न, वस्त्र,निवारा याप्रमाणे अाणखीन एक महत्वाची गरज होऊन बसली आहे.सोशल वेबसाईटचा आणि वॉट्सअपचा वापर हा मानवाच्या जीवनशैलीवर कळत नकळत दुष्परिणाम करतोय. या नेटवर्किंगच्या वापरामुळे माणसं एकमेकांपासून दुरावतात आणि संवादाचा अतिरिक्त वापर केल्यामुळे नाती तुटतात. पण काही व्यक्तींना जणू याचं व्यसनच जडलंय. त्यामुळे सामाजिक नैराश्येचं प्रमाण देखिल मोठ्या प्रमाणावर वाढलंय.

फेसबुक प्रमाणे संवादाला अधिक प्रभावी करणारे म्हणुन व्हॉट्सअप कडे पाहिले जाते.सुरक्षित परंतु तितकेच संवेदनशील असणारे हे समाजमाध्यम म्हणुन सर्वांनाच परिचित अाहे. अमुक तमुकाची महत्वाची निधनाची चुकिची बातमी जेव्हा व्हॉट्सअप वर शेअर होत  असते.तेव्हा माञ विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.अनेक ग्रुपवर पडणारे चुकीचे मेसेज,अश्लिलता या मुळे हे माध्यम चांगले असुन ही बदनामच झाले अाहे.व्हॉट्सअप ग्रुप मुळे विधायक कामे करणारे ग्रुप गावोगावी निर्माण झाले असुन एक तरुणांची तशी जागरुकता देखिल या निमित्त प्रकर्षाने दिसुन येते अाहे.

चांगल्या पेक्षा वाईट गोष्टीकडे जास्त लवकर अाकृष्ट होणा-या सृष्टीच्या नियमाप्रमाणे याचा दुरुपयोग करणारी मंडळी देखिल थोडी नाहीत.अलिकडेच महाराष्ट्रात उभारलेले एक-मराठा लाख मराठा अांदोलन असो कि कोपर्डी प्रकरण हे केवळ व्हॉटस अप च्या प्रभावी माध्यमातुनच जनतेसमोर येउ शकले हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल.त्याचप्रमाणे राजकिय,सामाजिक,कृषी,व्यावसायिक अशा सर्वच पातळीवर बहुमुल्य असुन कोणी कसा व किती वापर हे माञ ज्याचे त्यानेच ठरवावे.

सोशल मिडिया वापरताना काय काळजी घ्याल?
*फेसबुक वर वादग्रस्त फोटो अपलोड करु नका.
*फेसबुकवर कमेंट करण्याचे शक्यतो टाळाच.
*महिलांनी गरज असेल तरच फोन नंबर प्रोफाईल मध्ये समाविष्ट करावा.
*पासवर्ड व लॉगिन अायडी गुप्त ठेवावा अथवा प्रत्येक सहा महिन्यांनी बदलावा.
*फेक लिंक क्लिक करु नका.अथवा त्या लिंकमध्ये कोणतीही माहिती देउ नका.
*शक्यतो इमेल अायडीचाच फेसबुक वर वापर करावा.
*व्हॉट्सअप वर खाञी असेल तरच माहिती शेअर करा.
*अनोळखी ग्रुपला शकयतो अॅड होणे टाळाच.
*अनोळखी व्यक्तींना नंबर देताना काळजी घ्यावी.(विशेषत: महिलांनी)
*तीच तीच माहिती वारंवार शेअर करु नका.
*अपघाताचे चिञ-विचिञ अथवा बिभित्स फोटो शेअर करणे टाळा.
*वादग्रस्त विषयावर बोलणे अथवा कमेंट करणे टाळाच.
*सामाजिक व जनहिताची माहिती अवश्य शेअर करा. 

-सतीश केदारी
(कार्यकारी संपादक)

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही