सादलगाव - लग्नकार्य अन बदलती अामंञणे...

गावोगावी, घरोघरी जावून शुभकार्याचे अथवा कोणत्याही कार्यक्रमाचे आंमत्रणे पुर्वीच्या काळी पारंपारिक पध्दतीने दिले जात असे. यामध्ये अक्षदा व तांदुळ वाटुन दिले जाणारे आमंत्रण, टपाल पाठवून दिलेले आमंत्रण, सुपारी देवून दिलेले आमंत्रण, हळदी.कुंकु घरी देवून दिलेले आमंत्रण, हल्लीच्या काळातील लग्नपत्रिकाद्वारे दिले जाणारे आमंत्रण यांचा समावेश होतो.या मिळणा-या आमंञणाचं त्याकाळी चांगलंचं अप्रुप वाटे.

इतिहासकालापासून ते अगदी अलिकडे आमंत्रण देण्याच्या पध्दतीमध्ये आमुलाग्र बदल आणि त्याचे अनुकरणही होत आहे. बदलत्या काळाबरोबर आमंत्रणेही बदलत असल्याचे चित्र समोर येत  आहे. विशेष करुन लग्न म्हंटल तर आमंत्रणासाठी लग्नपत्रिका हमखास ठरलेली. लग्नामध्ये पै-पाहुण्यांना मित्रांना आमंत्रणासाठी वापरलेल्या लग्नपत्रिका इतक्या आकर्षक आणि सुबक तयार करुन विक्रीची थाटलेली दुकाने आजही शहरामध्ये पाहवयास मिळतात.

लग्नपत्रिका नमुन्यांमध्ये देव-देवतांची चित्र नसेल तर ती लग्नपत्रिका नव्हे.कोणत्याही शुभ कार्यास प्रारंभ करण्यापुर्वी आपण श्री गणेशास प्रथम वंदीतो.तसे प्रत्येक लग्नपत्रिकेमध्ये गणपतीचे स्थान हे अढळ आहे. अत्यंत आकर्षक रंगामध्ये तसेच घरामध्ये अगदी फ्रेम तयार करुन ठेवावी अशा पत्रिकासुध्दा आपणास पाहण्यास मिळतात.लग्नासाठी या पत्रिका छपाईपासून ते आमंत्रण देईपर्यंत खर्चाचा आणि जिवाचा आटापिटा करताना नागरिकांची दमछाक होते.परंतु शुभकार्य पार पडल्यानंतर मात्र याच पत्रिका अडगळीला जावून पडतात. म्हणजे यावर सुबक छापलेले देव-देवतांचे फोटो अक्षरश: धुळ खात तर काही ठिकाणी कचराकुंडीतही पाहण्यास मिळतात. कचरा म्हणुन याच पत्रिका जाळुनही टाकल्या जातात. फक्त आमंत्रणासाठी वापरलेल्या सुबक पत्रिका फार अल्पायुशी ठरतात.अशा आकर्षक पत्रिका मोठा खर्च करुन वाटून झाल्यानंतर वाटलेल्या सर्वच पत्रिकांचे स्थान एखांद्या टेबल अथवा अलमारीत असेल असे नाही, यातील काही पत्रिका तर घरातील अडगळीची जागा घेतात.

लग्न येईपर्यंत त्याकडे कोणी ढुंकुनही पाहत नाही. ज्या भावनेने त्या दिल्या गेल्या आहेत त्याची जाणीव सर्वांकडे असेलच असे नाही.अगदी लग्नाच्या दिवशीही पत्रिका देवूनही त्यावरील कार्यक्रमाची कसलीही माहिती लक्षात न ठेवता काही महाभाग तर इतरांनाच विचारतात की अरे अमुक तमुक याचे लग्न नेमके किती वाचता आहे रे... एवढा खटाटोप करुन केलेली आमंत्रणे आपल्या शुभकार्यास यशस्वी होतीलच असे नाही. त्यापेक्षा आता काळ बदलत चालला आहे, तशी आमंत्रणेही बदलताना दिसत आहेत.

गावोगावी सध्या लग्नांचा धुमधडाका चालू आहे. गावातील लग्न असले की, इतर कार्यक्रम. या आमंत्रणाचा एक मोठा फ्लेक्स बनवुन त्यावरच कार्यक्रम अथवा लग्नपत्रिका सारखा मजकुर तयार करुन याद्वारेच सर्वांना सामुहिक आमंत्रित केले जात आहे. गावामधील अत्यंत मोक्याच्या व वर्दळीच्या ठिकणी असा बोर्ड लावला तर हेच आमंत्रण समजुन नागरिक हल्ली लग्नकार्यास आवर्जुन उपिस्थत राहत आहेत.रंगसंगती वापरुन आकर्षकरित्या तयार केलेले होर्डिंग्ज सध्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहेत.

काही मिनिटांत सर्वांना आमंत्रण देणारे मॅसेजचाही वापर सध्या आमंत्रण देण्यासाठी खुबीने वापरला जात आहे. लग्नपित्रकेला होणारा मोठा खर्च टाळुन आमंत्रणासाठी अत्यंत जवळचा मार्ग म्हणुन याकडे आता समाज चांगला वापर करताना दिसून येत आहे. व्हाॅट्सअप सारख्या सोशल मिडियाच्याच्या माध्यमांमधुनही आमंत्रण देण्याची नवी पध्दत सध्या चांगलीच भाव खात आहे. धावत्या युगामध्ये सध्या होर्डिंग्जद्वारे षुभकार्यास दिली जाणारी आमंत्रणे मोठी परिणामकारक होत असल्याचे चित्र प्रत्यक्ष लग्नांमधील उपस्थितीवरुन अनुभवयास येत आहे. म्हणजेच आमंत्रणे सध्या बदलत आहे.
-संपत कारकुड
(विशेष संपादकिय)

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य