शिरूर - वर्षभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...!

देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी चार दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेतील 'निर्भया' मात्र वर्षभरानतंर ही  न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कधी मिळणार कोपर्डीतील श्रध्दाला न्याय ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात तेरा जूलै हा काळाकुट दिवस आहे. या दिवसाने मराठ्यांना मराठा समाजाला हादरवून टाकले होते आणि संवेदनशिल मनं हेलावून टाकली होती परंतू या ढिम्म सरकारमुळे कोपर्डीतील मराठा ताईला न्याय मिळाला नाही. आज कोपर्डी प्रकरणाला एक वर्ष पुर्ण होत आहे तरी देखील आरोपीना फाशीची शिक्षा झालेली नाही. ज्यावेळी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट दिली होती त्यावेळी फडणवीस म्हणाले होते कि आरोपीना सहा महीन्याच्या आत फाशीची शिक्षा दिली जाईल. परंतू अद्याप ही कोपर्डीतील आरोपीना शिक्षा नाही.

दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणेच कोपर्डीतील घटनाही अत्यंत निर्घृण होती. अल्पवयीन मुलीवर केवळ बलात्कार करून नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली होती.  आणि तिचे हात खांद्यापासून निखळलेले होते. ती विवस्त्रावस्थेत होती आणि देहावर अत्याचाराच्या खुणा होत्या.

कोपर्डीतील निर्दयी घटनेने राज्यसह देशभरात एकच खळबळ उडाली होती.या घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी या सह विविध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यसह देशभरात लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले. आणि मराठा समाजाने हे मुक मोर्चे अत्यंत शांततेत काढले,मोर्चा किवा आदोंलन काय असते हे सार्या जगाला मराठा समाजाने दाखवून दिले. परंतू आज ही वर्षभरानतंरही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत आहे त्यामुळे कधी मिळणार कोपर्डीला न्याय असा सवाल उपस्थित होत आहे.

(निलेश चाळक,बीड)
मो : ९७६७८४६१९

संबंधित लेख

  • 1