शिरूर - रक्ताची नाती

रक्ताची नाती, तलवारीची पाती
काहीही केलं तरी लढणारच
कौरव-पांडव असो या भाऊबंदकी
डोळ्यात डोले घालून नडणारच

रक्ताच्या नात्याला कारण नाही लागत
रक्त रक्ताशी रक्तासारखं नाही वागत
समजून घेणाऱ्याला  मिळत फळ
आपली माणस म्हणजे हत्तीच बळ

जगाशी लढू आपल्यांशी कस लढायचं
आपल्याच माणसांशी सार आयुष्य काढायचं
सुईच्या कामाला नको तलवारीची पाती
वेळेला कामी येतात फक्त रक्ताची नाती

थोडा रुसवा थोडा फुगवा काढून टाका
अहंकाराचा पडदा आता कायमचा झाका
दिव्या विना राहू शकतील का वाती?
मायेचा पदरातली ऊब रक्ताची नाती...


गावगावच राजकारण...

जस जस निवडणुकीचं
वार फिरू लागलं
गावगावच चक्र पार
उलट फिरू लागलं

दिवसरात्र सोबत राहणारे
विरोधात दिसू लागले
शिव्या घालणारे एकमेकांना
मांडीला मांडी लावून बसू लागले

कुठली युती कुठली आघाडी
एक असत गाव पंचवीस फळ्या
राजकारण राहत बाजूला
नुसत्या एरंडाच्या नळ्या

मतलबाचा असला तर आपला
नाहीतर परका होऊन जातो
तुझा माझा करता करता
उमेदवार निवडून येतो

राजकारण काहीही असू द्या
कधी आपली माणसं तोडू नये
दुसऱ्याच्या बापासाठी
आपण मिशा काढू नये...


कवी : अरुण महादेव वाळुंज
मु. पो. पिंपळगाव तुर्क,
ता. पारनेर, जि. अहमदनगर
मो.९६२३८६८३७२
ई मेल : arunwalunj08@yahoo.co.in
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1