शिरूर - माझा बाप - कविता

शेतकरी आत्महत्या या खरं तर चिंताजनक बाब.परंतु यावर प्रकाशझोत टाकलाय कवी अरविंदा भामरे यांनी.बापाने आत्महत्या केल्यानंतर मुलाने व्यक्त केलेल्या भावना त्यांनी त्यांच्या शब्दांत मांडल्या आहेत.

माझा बाप

 बाप झाडावर लटकून
घरात अंधार कोरून गेला
कसायला वावर  आहे
ते ही तारण ठेऊन गेला!!

त्याचा तो उपाशी जन्म
माझ्या गळ्यात टांगून गेला
स्मशानातली  देहाची राख
माझ्या ताटात वाढून गेला!!!

भिंतीच्या कपाळावर बाप
 कसा वणवा पेरून गेला
मायच्या जिंदगीचं तो
पोस्टमार्टम करून गेला!!!

तिरडीच्या झोपाळ्यावर
आनंदाने निजून गेला
कुणब्याचं जगणं नको
पुन्हा पुन्हा सांगून गेला!!!

        - कवी  अरविंदा भामरे

संबंधित लेख

  • 1