पारोडी - युवकांनी केली चित्रपटाची निर्मिती...

शिरूर तालुक्यातील पारोडी या अतिशय दुर्गम खेडेगावातील नवनाथ लक्ष्मण टेमगिरे हा पंचवीस वर्षीय तरुण युवक त्याच्या हलाकीच्या परिस्थितीशी झगडत कोणत्याही आधाराविना चित्रपट निर्माता बनत असून, शिरूर तालुक्यातील तरुणांना एक नवा व वेगळा आदर्श असा संदेश देत आहे.


पारोडी येथील नवनाथ टेमगिरे या लहानपणी वडिलांचे छत्र हरपलेल्या युवकाने आपल्या भागात चित्रपटाचे चित्रपटगृह सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी घरच्या गाई व काही जमीन विक्री करून चित्रपटगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर मुलाच्या जिद्धीसाठी अर्धा एकर शेती विक्री करण्याचा निर्णय त्याच्या आईने घेतला व त्यामाध्यमातून मिळालेल्या पैशातून नवनाथने शिक्रापूरात साध्या पद्धतीचे चित्रपटगृह सुरु केले. सुरु करण्यात आलेले चित्रपटगृह चांगले चालू लागले. नवनाथला त्या व्यवसायाचा अंदाज आल्याने चाकण येथे चित्रपटगृह भाडेतत्वाने घेतले.

नवनाथने पुढे चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला आणि कॉलेजचे मित्र रुपेश बोरुडे, आयुब शेख, श्रीकांत धुमाळ, सचिन कांबळे, विक्रम दुपारकुडे, प्रवीण बामणे यांनी सर्वांनी मिळून स्वतः चित्रपट तयार करण्याचा ठरवले. सर्वांनी मिळून चित्रपटाची कहाणी तयार केली व स्वतः कलाकार म्हणून काम करायचे ठरवले. परंतु त्यासाठी लागणारा पैसा हि सर्वात मोठी अडचण होतीच. त्यावेळी चित्रपटगृहातून मिळालेले काही पैसे शिल्लक होते. परंतु, तेवढ्या पैशातून काम होणार नव्हते. त्यामुळे खूप विचार करून करून चित्रपटगृह विक्री करून त्यामाध्यमातून पैसा चित्रपटासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले त्यामध्ये सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, सुनील गोडबोले, मधु कुलकर्णी, दिपक शिर्के यांचा समावेश करण्यात आला. चित्रीकरण नंतर नवनाथ जवळ असलेले पैसे संपून गेले. त्यामुळे चित्रीकरण बंद पडण्याची वेळ आली. चित्रीकरण बंद झाले. परंतु, नवनाथ स्वस्थ बसत नव्हता. नवनाथच्या हातचे सर्व काही संपले होते. वेळप्रसंगी आईचे तसेच बायकोचे दागिने गहाण ठेवले तर अनेक मित्रांनी त्यांच्या जमिनी गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, नवनाथ मागे हटला नाही. काहीना काही प्रयत्न करत राहिला. त्यानंतर काही मित्रांच्या मदतीने नवनाथची उरुळी देवाची येथील उद्योगपती उल्हास शेवाळे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी नवनाथच्या चित्रपटामध्ये भागीदारी करण्याचे ठरविले. त्यामुळे नवनाथच्या चित्रपटाच्या पुढील कामांची सुरवात झाली. लवकरच नवनाथचा कॉलेज जीवनावर आधारित मुलामुलींना आई-वडील काय करून शिकवतात, आई वडिलांचे स्वप्न काय असतात, मुले काय करतात तसेच मुलांनी काय करावे व कसे वागावे हे दाखविणारा चित्रपट जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ मध्ये सर्वांच्या भेटीला येणार आहे.

पुढील काळामध्ये ग्रामीण भागातील मुलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देऊन त्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकार घडविण्याचे तसेच शिरूर तालुक्याचे नाव देशात झळकाविण्याचा नवनाथचा मानस आहे.

- शेरखान शेख

Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही