शिरसगाव काटा - आभास..चकवा कि आणखीन काय?...(भयकथा)

तसं आज इतर कामे लवकर आटोपुन घराकडे जाण्याचं मनोमन ठरवत नियोजन करत होतो.सगळी कामे वेळेत आटोपलेली.परंतु तरीदेखिल उशिर झालेला.सायंकाळ झाली तशी नेहमीपेक्षा आज जरा जास्तच ओढ वाटु लागलेली.

सकाळपासुन काहितरी वेगळंचं मनोमन वाटु लागलेलं.परंतु तरीदेखिल छे ! काहितरीच काय ? असं म्हणत वेळोवेळी मनाला समजावत होतो. अनेकदा मसनवाट्यात उशिरा गेलेलो तर कित्येकदा एकटा गेलेलो त्यामुळे इतर भिती कधीच बाळगण्याचा प्रश्नच नाय ओ.तसा तरी नास्तिक असल्याने कसलाही विचार मनाला शिवणे अघडचं.पण तरीही आज अनामिक भिती मनाला का जाणवत होती याचं पुसटसं उत्तर शोधत बसलेलो.आता तसा बराचसा उशिर झालेला.रस्त्यावरुन निघाल्यावर कंटेनर, वाहने अशी बरीचशी वाहने ये-जा करत होती.दुचाकीवर प्रवास करताना नेहमी हेल्मेट डोक्यावर घातल्याशिवाय बाहेर पडायचंचं नाही असं रोज ठरवलेलं त्यामुळे त्याही दिवशी हेल्मेट घालुन प्रवास सुरु केलेला.

अंधार खुप कारण आमावश्येची ती राञ असावी.वाहनाचा वेग तसा जेमतेम होता.अशा शांत परंतु तितक्याच धिरगंभीरतेने वाहन चालवत अंतर कापायाचा प्रयत्न करत होतो.तसा गेल्या कित्येक महिने दररोज उशिर हा व्हायचाच. तसा हा आजचा दिवस होता.परंतु तरीही काहितरी चुकल्यासारखं वाटत होतं.अंतर कापत मनात आवडती गजल गुनगुनत असताना झुडुपे सुरु झाली.पुढे काही अंतर जात नाही तोच काही तरी चिञ-विचिञ आवाज कानी पडला.भास झाला असेल समजुन दुर्लक्ष केलं अन प्रवास सुरु केला.पुढे गेल्यानंतर अचानक एक वाहन गाडीला घासुन गेलं या वेळी सावरत वेग कमी करत मनोमन दोन शिव्या हासडल्या अन पुन्हा मुळ स्थितीत प्रवास सुरु ठेवला.परंतु न जानो अचानक आरश्याकडे लक्ष गेलं तसा सर्रर्रकन अंगावर शहारे आला. कोणीतरी आकृती अन दुचाकी पाठलाग करतयं याची जाणीव झाली.आता माञ थोडी भिती वाटु लागली.गाडीचा मंद वेग हळुहळु वाढवायला सुरुवात केली फुल्ल स्पिड कसे झाले ते कळलेच नाही.सुसाट वेगाने अंतर कापु लागलो.कधी आरशाकडे पाहत होतो तर कधी एकटक समोर.मागील आकृती माञ पिच्छा सोडायला तयार नाही असे दिसत असताना आता काय करायचं असे म्हणत एक कच्ची वाट दिसली.या वेळी कुठलाही विचार न करता त्याच गतीने कच्च्या रस्त्याने धावु लागलो.मनात प्रचंड घाबरलेलो असताना मागे पाहिलंचं नाही. काही अंतर गेल्यावर अरे पेट्रोल तर टाकायचं विसरलोच होतो हे ध्यानात येताच संपलं तर आता काय करायचं या प्रश्नानं संकटात भर पडली.तरीही वेगाने गाडी पळविणे सुरुचं ठेवले.आता निर्मनुष्य रस्त्याला लागलेलो असताना केवळ काळाकुट्ट अंधार..मिनमिनता अधेमधे दिसणारा उजेड इकतकंच काय ते.दहा- वीस किलोमीटर अंतर पार केल्यावर एक दाढी वाढलेला इसम गाडीला लिफ्ट मागु लागला. नको डोक्याला झंझट म्हणत पुढे प्रवास सुरु ठेवला.बरेचसे अंतर पार केल्यावर अचानक रस्ता बंद अवस्थेत.आता माञ एकट्याला रडु कोसळले.पुन्हा गाडीला वळण घेत रस्ता शोधु लागलो.

काळ्याकुट्ट अंधारात वळने घेत-गचक्या खात भितभित प्रवास सुरु केलेला.काही अंतर पार केल्यावर पुन्हा जाताना दिसलेला इसम नजरेला भिडला.थोडी भिती सोडत त्या व्यक्तीला रस्ता विचारायचाचं असं ठरवलं अन "बाबा..मला त्या गावाला जायचंय पण रस्ता हुकलाय जरा सांगताय का ? असा प्रश्न केला अन राकट व भेसुर आवाजात "पोरा इतक्या उशिरा या रस्त्यानं नगं जाउ, पुढं रस्ता नाय असं मला तुला सांगायचं होतं.सातच्या नंतर या रस्त्याने कोण बी जात नाय तु कुठं चालला ?" असं सांगत अन समजावत त्या माणसानं कसं जायचं सांगत इशारा केला.

मी माञ आभार न मानताच पुन्हा जोरात गाडी दामटत रस्ता शोधु लागलो.अर्धा किलोमीटर गेलोअसेल कि पुन्हा भला मोठा साप रस्त्याने जाताना दिसला.पाहताच क्षणी डोळ्यावरची झोप उडाली.सापाला वळण घेत गाडी जोरात दामटली.बरेचसे अंतर आता कापलेले होते अन पुढे घरे,माणसे दिसु लागली होती.ऐन थंडीत प्रचंड घामाघुम झालेलो होतो.आता प्रचंड भुक लागलेली होती.एव्हाना राञीचे ११ वाजुन गेले होते. पेट्रोल संपत आल्याने गाडी केव्हाही बंद पडेल याचीही भिती वाटत असताना अचानक पंप समोर दिसला.तेव्हा जरा हायसे वाटले.पेट्रोल भरले अन प्रवास सुरु केला.

भुक अन तहान लागलेली परंतु रस्त्याने चिटपाखरुही नसल्याने सर्व हॉटेल बंद झाल्याने नकोच म्हणत घर कधी पाहायला मिळेल.याची ओढ लागल्याने ओळखीचा रस्ता मिळाल्याने आता जरा भितीही कमी झालेली होती.शेवटी एकदा घरी पोहोचल्यानंतर संकटातुन सुटकेचा नि:श्वास सोडला. जेवलो अन झोपी जाणार म्हणुन घड्याळात पाहिले.अरेच्चा ! जेवढा वेळ इतर वेळी लागतो तेवढ्याच वेळात घरी कसे काय ? हा पुन्हा नवा प्रश्न पडलेला.परंतु प्रचंड दमलेलो असताना अखेर त्या राञी बरेच काही आठवत झोपी गेलो.

तो राकट दाढी वाढवलेला इसम...ते भेसुर शब्द..संपलेला रस्ता...कितीही पळालेलो तरी न संपलेले गाडीतील पेट्रोल..आरशात दिसलेली ती आकृती..अन सर्वात शेवटी घड्याळात १२ वर थांबलेले काटे...सर्व काही अनाकलनीय !
(लेखन- सतीश केदारी)

संबंधित लेख

  • 1

शिरूर तालुक्यात बाहेरील नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे, असे आपणास वाटते काय?
 होय
 नाही
 माहित नाही