शिरूर - बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्रा पडतायत ओस...

शासनाने बैलगाडा शर्यती सुरु करण्याची ग्रामीण भागातून मागणी
पुणे जिल्ह्यात होणा-या यात्रा उत्सवात बैलगाडा शर्यत ही जाणकारांच्या माहितीनुसार सुमारे दीडशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. गावोगावच्या कुलदैवतांच्या यात्रेला बैलगाड्यांच्या शर्यतीमुळे मोठीच शोभा येत होती. आज ही केवळ बैलाच्या जिवावर अनेकांची कुटंब चालतात.

गाय व बैलांवर जीवापाड प्रेम करून त्यांचे संगोपन करणारे अनेक शेतकरी जे देशी गाया आपल्या गोठ्यात पाळून त्यांच्या पासून होणारा गावरान जातीचा बैल मोठा करून विकतात. त्यातून मिळणा-या आमदानीतून असे शेतकरी वर्षभारताची शिधासामग्री करून ठेवत असतात. आणि आता तर बैलगाडा शर्यतींवर बंदी असल्याने पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेली बैले ही विकली जात नाहीत. आज अशा प्राणीप्रिय लोकाची कुटंब चालणे अवघड झाले आहे. बैलगाडा शर्यतीनावर बंदी असल्याने यात्रा ओस पडत आहेत. यात्रातून छोटामोठा व्यवसाय करून चरितार्थ चालविना-या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ सध्या आली आहे.

शर्यतीचे बैल सांभाळणा-या एका जाणकार शेतक-याच्या माहितीनुसार, बैलगाडा शर्यती साठी एक बैल हा सरासरी सहा वर्षे धावत असतो आणि एका वर्षात किमान गावच्या यात्रा उत्सवातील बैलगाडा शर्यतीत धावला जातो. एका गावच्या यात्रेतील बैलगाडा शर्यतीचा विचार केल्यास बैल फक्त १५ ते २० सेकंद धावला जातो. तर एका वर्षात शर्यतीचा बैल जेमतेम ५ ते मिनिटे धावला जातो आणि सहा वर्षात जेमतेम ३० ते ४० मिनिटे हा बैल शर्यतीत धावला जातो. बैलगाडा शर्यती साठी धावणार्या बैलाला वेगवेगळ्या खाद्याचा नियमित व वेळेवर खुराक दिला जातो. ज्या शेतक-यांकडे असे बैलगाडा शर्यतींचे बैल असतात ते स्वता:च्या मुलाला जेवढ जपतात ना त्याहून अधिक जीव शर्यतीच्या बैलांना लावता असतात. 

भारत हा शेती प्रधान देश आहे. आपल्या देशात शेती पिकच्या मशागतीसाठी आज ही बैलांचे अनन्य साधारण महत्व आहे. शेतीच्या कामात एका दिवसात बैलाला किमान ८ तास कष्ट असतात तर शर्यतीच्या बैलाला सहा वर्षात फक्त तो फक्त ३० ते ४० मिनिटे धावला जातो. मग प्रश्न हा पडतो कि, बैलगाडा शर्यतींवरच बंदी का?

खरे तर बैलगाडा शर्यत चालू होईल किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण बैलगाडा शर्यतीवरील बंदी मुळे आज महाराष्ट्रातील व खास करून पुणे जिल्हातील शेतकरी बांधवाचा यात्रा महोत्सवासारखा संस्कृतीक सणच जवळपास बंद पडला आहे. अनेक ठिकाणी तर यात्रा ही बंद पडल्या आहेत. ज्या काही गावात ग्रामदेवतांच्या यात्रा भरविण्यात येतात तेथे बैलगाडा शर्यती होत नसल्याने यात्रा ओस पडू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या करीता ग्रामीण भागातील जनतेचा बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा सुरु होण्याचा आग्रह पाहता वर्षातून एकदाच गावच्या यात्रेत यात्रेची शोभा वाढविणा-या बैलगाडा शर्यतींना शासनाने तातडीने परवानगी देण्याची मागणी पूर्ण करावी, अशी आशा बैल प्रेमी शेतकरी व बैलगाडा शौकिनांतून व्यक्त होत आहे.

- प्रा. सुभाष  शेटे
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य