शिरूर - तरुणांनो...शेअरींग करायला विसरु नका

Image may contain: outdoorकाय सागांवे  माणसाच्या आयुष्यामध्ये काय होईल...नाहीतरी माणूस विचार करतो एक आणि होते प्रत्यक्षात भलतेच. असे झाले की मग मन खूप निराश होते.कधी कधी इतके उदास होते की जणू जगणेच आपणास एक ओझे वाटायला  लागते. वाटते द्याव सगळ संपवून आणि मोकळे व्हावे या जगाच्या रहाटगाडगातून आणि मुक्त व्हावे सर्व तणाव दुख आणि त्रासातून आणि मग सगळ संपलं असे वाटते. अशा वेळी जर मन बेभान झाले आणि ताण असह्य झाला तर अनेक जण जगण्याची उमेदच सोडून देतात आणि सरळ मृत्यूला आलिंगन देतात.सांगा हाच जीवनातील तणाव दुख विसरण्याचा एकमेव मार्ग आहे.विचार करा हा एकमेव मार्ग नाही.जीवन सुंदर आहे आणि ते जगण्यासाठी चे पर्याय खूप आहेत. ते आपण कधी शोधलेत का.

आयुष्यामध्ये जीवन जगण्यासाठी प्रेमाची खूप आवश्यकता आहे. परंतु हे प्रेम मिळवत असताना स्वत:ला सिद्ध करावे लागते. वेळप्रसंगी अनेक परीक्षानाही सामोरे जावे लागेल. परिस्थितीशी झुंजावे लागेल आणि हे करत असताना मानवतेचा आणि स्नेहाचा झरा ही अंत:करणात असावा लागतो.एवढे करून ही प्रेम मिळाले नाही तर पुन्हा नव्याने अंत:करणात जागा मिळविण्यासाठी धडपड करावी लागेल. आयुष्यात प्रेम म्हणजे केवळ प्रियकर-प्रियसी ह्यांच्यातील प्रेम म्हणजे फक्त प्रेम हा प्रेमाचा फार संकुचित अर्थ ठरेल.

आई वडील मित्र,शिक्षक,समाज आणि देश याच्यावरही प्रेम करावे लागते.या सर्वांचे प्रेम ही तुम्हाला जीवनात महत्वाचे आहे.याचा विचार तुम्ही केला आहात की नाही ? एखाद्या तरुणी अथवा तरुणाने प्रेमास नकार दिला की लगेच स्वत:ला संपविण्याचा आत्मघाती विचार करून तो तरुण अथवा तरुणी काय साध्य करते ? याचे उत्तर मिळते की काही नाही.यातून उध्वस्त होतात फक्त त्यांची कुटुंबे याचा विचार का करीत नाही.तुम्ही जीव देऊन मोकळे होतात परंतु आई बापांचा जीव मात्र क्षणाक्षणाला तडफडत असतो तुमच्या आठवणीने. आणि तुम्ही नसल्याचा वास्तवाने त्यांचे जीवनच होते एक वाळवंट.अरे तुम्हाला माहिती असत ना रे की प्रेमात फार ताकद असते. हे माहित असतानाही तुम्ही का रे मृत्यू ला कवटाळता ?

परीक्षेत चांगले मार्क पडले नाही, आई वडिलांनी मना सारखे वागू दिले नाही. काही वस्तू दिल्या नाही.मनासारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही. या पासून ते अगदी फुटकळ कारणावरून या पिढीत आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.अरे whatsapp आणि सोशल मिडीया च्या या आधुनिक युगात पार ऑनलाईन आपण आत्महत्या करू लागलो आहे. अरे काय चालले आहे हे. एकीकडे भौतिक प्रगती आणि सुखे तुमच्या दारा पर्यत आली आहेत. तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत असताना माणसे मात्र दूर चालली आहेत.अरे हे कशाचे लक्षण आहे.सोशल मिडीया वर हजारो फ्रेंड गोळा करणारे आम्ही मात्र आमच्या घराभोवती चार दोन मित्र ही जमवू शकत नाही.किती आम्ही एकलकोंडे अलिप्त बनत चाललो आहोत.सोशल मिडियालाच नका रे मिञ बनवु.

मनातील सुख-दु:ख या  प्रत्येक गोष्टी सोशल मिडीया वर शेअर करतो.परंतु आसपास आपल्याला दररोज भेटणा-या माणसांमध्ये आपण हे सुख-दु:ख शेअर करायला का घाबरतो, की आपण त्यांना आपले मित्र समजत नाही की त्यांना मित्र बनविण्याचा प्रयत्न करत नाही.मनातील दुख, वेदना, अपयश, तणाव दूर होण्याकरिता या गोष्टी जवळच्या मित्रांकडे शेअर करता आल्या पाहिजे.कोठे तरी याचा निचरा झाले की मन दु:ख,वेदनेने आणि नैराश्याने भरून रहात नाही आणि मग मन मोकळे झाले की बरं वाटते.

परंतु आज अनेक जण  मनातील भावना,दुख, वेदना, आपले प्रश्न मनातच दाबून ठेवतात आणि स्वत:चे आयुष्य तणाव पूर्ण बनविण्यास सुरवात करतात.शेवटी व्यक्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रश्नाचे उत्तर,अपयशाकडून यशा कडे जाण्याचा मार्ग लवकर सापडत नाही.

शेवटी ताणतणाव अति झाला की त्याचा मनावर आणि शरीरावर परिणाम होतो.मनावर परिणाम झाला की तो वेळेप्रसंगी मृत्यू ला जवळ करतो.आणि तणावाचा परिणाम शरीरावर होऊन शरीर मृत्यूला जवळ करते. आणि शेवटी घात मानवाचाच होतो.

याकरिता आपणा कडे काही नियोजन आवश्य असले पाहिजे. ताण तणाव निर्माण होण्याची अनेक कारणे असली तरी आपण काही गोष्टी आत्मसात करून त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे.

ताण तणाव निर्माण होऊ नये या करिता आधी स्वत:च्या क्षमता जाणून घ्या आणि त्या क्षमतेनुसार आयुष्याचे नियोजन करून ध्येय ठरवा.परिस्थिती आपल्या हातात नसते परंतु परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे आपल्या हातात असते हे लक्षात घेऊन परिस्थितीला दोष न देता तिच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा.आपल्या संपर्कातील येणारा प्रत्येकाशी स्नेहाने सवांद साधा.इतरांचे ऐकून घ्यायला शिका.आणि मग आपले म्हणणे मांडा.आपल्या कडील ज्ञान अथवा माहिती परिपूर्ण असेलच असे नाही. त्यामुळे एखाद्या ने नवीन माहिती अथवा मुद्दा सांगितलास तो ऐकून घेऊन आणि तो सांगतो आहे ते खरे असेल तर तसे आपल्या ज्ञानात आणि माहितीत बदल करून घ्या.मलाच सर्व काही माहिती आहे असा अहंमभाव धरू नका.

सर्वात महत्वाचे म्हणजे नकारात्मक विचारा पासून दूर रहा. सकारात्मक विचाराने काम करा. अपयश ,दु;खाला आपली प्रेरणा बनवा .परिस्थितीने अथवा अपयशाने एखाद्या मार्ग बंद झाल्यास निराश होऊ नका.कदाचित दुसरा मार्ग तुमच्या प्रतीक्षेत असेल. तो मार्ग शोधा हा मार्ग चा तुम्हाला यशाकडे नेऊन तुमचे अपयश धुवून काढून तुमचा आयुष्याला नवी दिशा ,नवी स्वप्ने आणि नवीन उमेद देईल. एवढे मात्र लक्षात ठेवा की निराश होऊन हताश होऊन आत्महत्या करून जगातील कोणत्याही प्रश्न सुटला नाही.उलट या निराशेवर मात करीत ज्यांनी संघर्ष करून जीवन जगले त्याचाच इतिहास लिहिला गेला.आणि त्याचा मृत्यू नंतर ही ते कर्तुत्वाचा जोरावर अमर झाले.

सतीश धुमाळ, शिरूर
मो. ९०२८३०१४००

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य