मांडवगण फराटा - ऊसतोड मजुरांकडून घडतात गंभीर गुन्हे

पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी साखर कारखान्यांच्या ठेकेदारांकडून उचल घेवून ऊस तोड मजूरी करुन उदरनिर्वाह करण्याचे सोडून काम केल्यानंतर गावठी दारु पिवून आपली हवस भागविण्याचा धंदा गावोगावी ऊसतोड मजुरांकडून होत असल्याचे समोर येत आहे.

अठराविश्व दारिद्रय पदरात पडल्यानंतर मजुरीशिवाय पर्याय नसल्यामुळे साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी दरवर्षी बाहेरील जिल्हयातील मजूर साखर कारखाना परिसरात येत आहेत. दिवसभर भयंकर कष्ट करुन केलेल्या कष्टामुळे शरिराला विश्रांती मिळण्यासाठी बहुसंख्य मजुर दारुच्या आहारी गेलेले दिसतात. दिवसभराचे श्रम आणि तोडलेल्या ऊसाचे वाढे विकून आलेल्या पैशाचा वापर रोजच्या दारुसाठी केला जात असल्यामुळे मुलांबाळांसह पत्नीला वनवासाला सामोरे जावे लागत आहे. नित्याच्या दारुच्या व्यसनामुळे ज्या गावात पांडा किंवा अडडा बसला आहे, तेथील दारुधंदे तेजीत आहेत. गावोगावात यामुळे अशांतताही पसरत आहे.

तात्पुरत्या स्वरुपात पोट भरण्यासाठी आलेले मजूर गावामध्ये राहत असल्यामुळे ठेकेदार सोडून या नांगरिकांची पुरेशी माहितीही कोणाला नसते. वेगवेगळया ठिकाणी कामाचा अनुभव आल्यामुळे प्रत्येक गावामध्ये कसे जिवन जगावयाचे याचे ज्ञान या मजुरांना चांगले प्रात्प झालेले असते. परंतु या मजुरांपैकी पुर्वश्रमीचे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मात्र एखाद्यांवेळेस गुन्हाही घडत असल्याचे समोर येत आहे.

नुकतेचे आंधळगाव (ता.शिरुर) येथे पोटच्या मुलीचा गळा चिरुन तिला विहिरित फेकून देणाऱया बापचे घृणास्पद कृत्य समोर आले असल्यामुळे गावोगावी येणाऱया मजुरांवर कोण नियंत्रण ठेवणार. सहानुभूती व दया दाखविण्याच्या लायक असणारा ऊसतोड मजूर हल्ली आपला गाव सोडल्यानंतर कष्ट आणि दारु यामध्येच वाया जात असल्याचे चित्र समोर येत आहे. एवढे कष्ट करुनही या मजुरांची इंचभर सुधारणा झालेली नाही. ठेंकेदारांकडून उचल घेवून ठेकेदारांनाच चुना लावण्यामध्ये ऊसतोड मुकदाम व मजूर सध्या पटाईत झाले असून, पैसे बुडण्याचे प्रकार दरवर्षी घडताना समोर येत आहे. प्रत्येक साखर कारखान्यामध्ये उचलतोड बुडविल्यामुळे ठेकेदारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मजुरांची बदलती मानसिकतचे धोका येथील समाजव्यवस्थेवर होत असून, याचे दुष्परिणाम सामन्यजीवन जगणाऱया सामन्य नागरिकांवर होत आहे.

- संपत कारकूड
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही