शिरूर - शेवटी नशीबचं ना...(थेट गावातुन)

वेळ तशी दुपारची.दिवस उन्हं खाउन उतरणीकडे चाललेला.स्टेशनवर गर्दी तशी ब-यापैकी.जाणेयेणे नेहमीचे असल्याने अनेळखी चेहरे असले तरी काही चेहरे माञ ओळख नसतानाही ब-यापैकी ओळख भासवणारे.ती अंध महिला हातात पुस्तके घेउन ओव्या गावुन दाखवायची तर मध्येच पाककृतीचे धडे शिकवायची अन जवळील वस्तु विकण्यासाठी धडपड करणारी ती.डोक्यावर प्रचंड ओझे घेउन कितीही गर्दी असली तरी वाट काढत मधाळ बोलत जवळची फळे स्वस्तात प्रवाशांना द्यायचा.दुरवर प्रवासाला निघणा-या सर्वांना फळे देता देता काही भन्नाट अनुभव शेअर करणारा तो नेहमी या प्रवासात भेटायचाच.तारुण्यातुन वार्धक्याकडे झुकत चाललेली ती माञ कॉलेजच्या मुलांपासुन नेहमी फटकुन वागायची.वेळप्रसंगी डब्यात धिंगाणा घालणा-यांना चांगलीच फैलावर घ्यायची.त्यामुळे अनेक मुलींना या मावशींचा आधार वाटायचा.असे एक ना अनेक पाञं दररोजच्या प्रवासात भेटणारे.ओळखी नसतानाही जवळची वाटणारी.

तसा तो दिवसही इतर दिवसांप्रमाणेच.दररोजची बसण्याची जागा, ठरलेली बोगी, त्यातील माणसं ही ओळखीची असायची.त्यामुळे अनेकांशी छानशी गट्टी जमलेली.कितीही गर्दी असो एकमेकांना जागा ठेवणे,डब्यात गप्पांचं शेअरींग, दिवसभरातल्या घडामोडी, यांचं कॉम्बिनेशन ऐकायला जाम मजाच असायची.परंतु कित्येक दिवसा, वर्षांच्या खंडानंतर पुन्हा त्याच बोगीत जाण्याचा प्रसंग आला.आता तसं ओळखीचे एक दोन चेहरे सोडले तर फारसं कोणीच बोलत नसायचं.आपल्याला तरी होउन बोलायचं काय पडलयं असे म्हणत जो तो अंग चोरुन एकमेकांच्या मोबाईल मध्ये डोकं खुपसुन बसलेला.मी माञ कधी इकडे तर कधी बाहेर पाहत अनेक विचार करत होतो.एक स्टेशन जाउन आता दुसरे स्टेशन आलं होतं.गाडी थांबल्यानंतर डब्यातील काही खाली उतरली तर काही पटकन चढु लागली.गाडीने हळुहळु प्लॅटफॉर्म सोडत वेग घ्यायला सुरुवात केली.इतक्यात एक घाई घाईत व्यक्ती जागा शोधत जवळ येउन बसली.या व्यक्तीला पाहताच जरा काहीसं मन गोंधळलं.समोर बसणारी व्यक्ती काहीतरी ओळखीची वाटत होती.परंतु नेमकं माञ आठवत नव्हतं.शेवटी धाडस करुन मीच विचारल्यावर हळु हळु तो बोलता झाला.

शाळेत असतानापासुन तो ओळखीचा.नेहमी इतरांना मदत करणारा.खोडकरही तितकाच.कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याहुन सतत अॅक्टिव्ह असायचा.कोणाचा कसलाही कार्यक्रम असला तरी सर्वात पुढे असायचा तोच.माञ अलिकडे गप्प असायचा.कालांतराने अनेक घडामोडी घडत गेल्या अन जीवनाला कलाटनी मिळत गेली.मजेत दिवस असताना अचानक आईला कॅन्सर झाला.वाचवता वाचवता अनेक पैसे खर्च झाले.त्यातच आई वाचु शकली नाही अन बापावर कर्जाच्या विळख्यात डुबुन गेल्याने अखेर त्यांनीही स्वत:चं जीवन स्वत: संपवुन टाकलं.याच धक्कयाने काही दिवस गावात राहिलो.अखेर उपासमार होउ लागल्याने गाव सोडलं अन शहराचा रस्ता धरला.अनोळखी शहरात कामधंदा शोधताना गुन्हेगारांच्या तावडीत सापडलो अन अखेर एका गुन्हयात पोलीसांच्या तावडीत सापडलो.अखेर एका अधिका-याला दया येउन जामीनावर सोडुन देण्यात आले.तेव्हापासुन पुन्हा शहराकडचा रस्ता नको म्हणत गाव गाठलं अन तिथंही लोकं नावं ठेवु लागली.त्यामुळे जमीनजुमला, सगळं सोडुन दाढी वाढवुन मंदिरात भिक मागु लागलो.यातच एक भिकारी चांगले मिञ भेटले.त्यांना मी चांगली कमाई करुन देत असल्याने त्यांनीच आसरा दिला.एक दिवस एकेठिकाणी भीक मागायला गेलेलो असताना एका सद्गृहस्थाने माझी हकिकत ऐकली अन स्वत:च्या फॅक्टरीत नोकरी दिली.काही दिवसांनी तो सद्गृस्थही वार्धक्याने गेला अन फॅक्टरीत चांगल्या पदावर काम करण्याची जबाबदारी देउन गेला.आज त्याच व्यक्तीमुळे मोठी स्वप्ने पाहता आली.परंतु प्रत्येकाच्या प्रेमाला मी पारखा राहिलो.इतक्यात स्टेशन आलं म्हणुन तो जातो असे म्हणाला अन जितकया वेगाने आला तितक्याच वेगाने गेलाही...मी माञ कित्येक वेळ तो प्रसंग पाहतच होतो....


तो गेला अनेक अनुत्तरीत प्रश्नांची सल मनात ठेवुन.प्रत्येकाच्या आयुष्याच्या खाचखळगे येतच असतात.त्यात कोणाला कसं वळण मिळत असतं परंतु अशीही काही व्यक्ती असतात की जे संपुर्ण आयुष्यच पालटुन टाकतात.ज्यांचं ऋण आपण कधीच विसरु शकत नाही.काही व्यक्तींना समजणं खुप अवघड असतं जे शब्दांत कधीच व्यक्त करता येत नाही.प्रत्येकाच्या बाबतीत कधी तरी अशी भली माणसं तर नक्की भेटत असतील ना ?....
(लेखक-सतीश केदारी,
शिरुर ८८०५०४५४९५)

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही